मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर २४, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नागरिकांनो महाराष्ट्र पोलीस सिटीझन पोर्टल ॲपचा वापर करा - धबडगे

बिलोली :- वैभव घाटे ‘महाराष्ट्र पोलीस सिटीझन पोर्टल ॲप’ मुळे सामान्य नागरिक अधिक सक्षम तर पोलीस प्रशासनास काम करण्यास मोठी मदत मिळणार आहे त्यामुळे नागरिकांनी आपल्या स्मार्ट फोनमध्ये हा अँप डाऊनलोड करून या अँपच्या माध्यमातून गुन्हे विषयक कोणताही रेकार्ड ऑनलाईन पाहणे, ऑनलाईन तक्रार दाखल करणे, तपासाची स्थिती जाणून घेणे या बाबी सहज उपलब्ध होणार आहेत त्यामुळे या अँप चा मोठ्या प्रमाणात प्रसार करावे असे आदेश पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मिना यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय  पोलिस कार्यालय व पोलिस ठाणे यांना पत्रकाद्वारे कळविले होते. पोलिस अधिक्षकांनी दिलेल्या आदेशाचे पालन करत बिलोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे व पोलिस अधिक्षक यांनी या अँपचे जास्तीतजास्त नागरिकांनी "महाराष्ट्र पोलिस सिटीझन पोर्टल अँप" चा वापर करावे असे अवाहन केले आहे. महाराष्ट्रात गुन्ह्यांचा आलेख कमी करण्यासाठी पोलीस प्रशासन वेगवेगळया उपाययोजना राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे मोबाईल ॲप पोलीस विभागाने विकसित केले आहे. महाराष्ट्र सारख्या मोठया राज्यासाठी हे काम अतिशय कठीण होते. मात्र पोलीस विभागाच

बिलोली तहसिल कार्यालयात मौखिक आरोग्य तपासणी शिबीर संपन्न बिलोलीच्या ग्रामीण रूग्णालयना राबविली मोहीम

  बिलोली :- वैभव घाटे तालुक्यातील ग्रामीण रूग्णालय बिलोलीच्या वतिने आज शुक्रवार दि २९ डिसेंबर रोजी बिलीली तहसिल कार्यालयात मौखिक आरोग्य तपासणी शिबीर राबविण्यात आली. या शिबीरात तहसिल कार्यालयात सर्व कर्मचा-यांची दंत तपासणी सह इतर आजारांची तपासणी करण्यात आली. मौखिक आरोग्य तपासणीतून पुढील उपचाराची गरज भासणऱ्यांची स्वतंत्र यादी करून संदर्भसेवा उपलब्ध करून दिली जाणार असून अशा रूग्णांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात येणार असल्याचे डाँ पुजा भाकरे यांनी यावेळी सांगितले. तर शासकिय अधिकारी व्यसनापासून दूर राहिल्यास कर्मचा-यांवर प्रभाव असू शकतो त्यामुळे शक्यतो शासकिय कर्मचा-यांनी धुम्रपान करू नये अशी सुचना करत तहसिल कार्यालय परिसरात धुम्रपान जनजागृती चे फलक लावले जावे असे बिलोली ग्रामीण रूग्णालयाचे अधिक्षक डाँ नागेश लखमावाड यांनी सुचविले. यावेळी उपविभागीय अधिकारी निवृत्ती गायकवाड , तहसिलदार विनोद गुंडमवार , नायब तहसिलदार नागमवाड ,  ओमप्रकाश गौड , चव्हाण साहेब , नरावाड साहेब ,  डाँ शामला ढवळे , दिनेश तळणे यांच्यासह अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते.