मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर ५, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बिलोली-देगलूर मार्गावरील लक्ष्मी कन्स्ट्रक्शन चे काम त्वरीत थांबविन्याची मागणी....! 13 नोव्हेंबर पासून बेमूदत आमरण उपोषण.. 🏻बिलोली प्रतिनिधी- वैभव घाटे

बिलोली-देगलूर मार्गावरील लक्ष्मी कन्स्ट्रक्शन चे काम त्वरीत थांबविन्याची मागणी....! 13 नोव्हेंबर पासून बेमूदत आमरण उपोषण.. 🏻बिलोली प्रतिनिधी- वैभव घाटे महाराष्ट्र कर्नाटक या दोन राज्यांना जोडणाऱ्या बिलोली देगलूर मार्गावर लक्ष्मी कन्स्ट्रक्शन अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण व पूल बांधणी चे काम 16 किमी अंतरावर बऱ्याच दिवसापासून चालू आहे.पण हे काम एकदम निकृष्ट पद्धतीचे होत असून रस्त्याच्या रुंदीकरनासाठी मुरुमाएवजी काळी मातीचा तसेच डष्टरहित गिट्टिचा वापर मोठ्याप्रमात केला जात आहे.तर पूलाच्या कामासाठी सीमेंट कोन्क्रेट ऐवजी मोठ-मोठ्या दगडांचा वापर करून वर-वरून सीमेंट चा लेप देऊन पुलाचे काम पूर्ण करत असल्याचे निदर्शनास आल्याने वारणेचा वाघ सामाजिक संघटनेच्या संविधान दुगाने यांनी दि.13/7/2017 रोजी बिलोली तहसीलदार विनोद गुंडमवार यांना लेखी तक्रार देऊन रस्त्याच्या कामांची चौकशी करण्याची  मागणी केली होती.निवेदनाची दखल घेत  तहसीलदारानी चौकशीसाठी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग नांदेड यांना पत्र पाठविले खरे पण आम्हाला पत्रच मिळाले नाही,तुम्ही देगलूर बांधकाम विभागाकडे जाऊन विचारपूस करा तिथे पत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा विशेष उपक्रम - बार्टी तर्फे चितोडिया समाजातील शाळाबाह्य मुलांना शाळेत प्रवेश देऊन कृतिशील पद्धतीने विद्यार्थी दिवस साजरा ...प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा विशेष उपक्रम - बार्टी तर्फे चितोडिया समाजातील शाळाबाह्य मुलांना शाळेत प्रवेश देऊन कृतिशील पद्धतीने विद्यार्थी दिवस साजरा ...प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे  बिलोली प्रतिनिधी  डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेच्या समतादूत प्रकल्पातर्फे शासन निर्णयानुसार जि.प.हायस्कूल,लोहगाव येथे विद्यार्थी दिवस साजरा करण्यात आला. सविस्तर वृत्त असे कि राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन म्हणजे ०७ नोव्हेंबर १९०० असून या दिवशी खऱ्या अर्थाने माणसाला माणूस म्हणून जगता यावे यासाठी माणसाच्या प्रतिष्ठेकरता लढणार्या एका क्रांतीची,युगांतराची सुरुवात  झाली.याअनुषंगाने त्यांचा शाळा प्रवेश दिन हा विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात आला. याचाच एक भाग म्हणून लोहगाव परिसरात बऱ्याच वर्षांपासून चितोडिया समाज वास्तव्यास आहे पण शिक्षण प्रवाहापासून वंचित आहे असे बार्टीतर्फे समतादूत इर्शाद शेख आणि समतादूत पांडुरंग मामीडवार यांनी  केलेल्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणांती  निदर्शनास आले व या शाळाबाह्य मुलांना शिक्षणप्रवाहा

बिलोली तहसिलचा सैराट कारभार सुरुच.

बिलोली तहसिलचा सैराट कारभार सुरुच.  बिलोली प्रतिनिधी- वैभव घाटे  गेल्या अनेक दिवसांपासून बिलोली तहसिल कार्यालयातील कर्मचारी निवासी न राहता नांदेड सारख्या शहरात राहून येजा करीत असल्याने तहसिल कार्यालयाचे अनेक कामे वेळेत होत नसल्यामुळे जनतेची कामे खोळंबत असल्याने पत्रकार  संरक्षण समिती  बिलोली च्या वतिने विभागीय अधिकारी बिलोली यांना निवेदन देण्यात आले. बिलोली तहसिल कार्यालयाचे तहसिलदार विनोद गुंडमवार हे बिलोली तहसिल येथे रुजू झाल्यापासून आजतागायत तहसील कार्यालयात नांदेड येथून ये-जा करीत आहेत. याचेच अनुकरण नायब तहसीलदार हे देखील नांदेड येथून ये-जा करित असुन मुख्यालया राहत नसूनही शासनाकडून घरभाडे उचल करीत शासनाची दिशाभूल करीत आहेत याचाच अर्थ उंटावरुन शेळ्या हाकण्यासारखा कारभार सदरील तहसील कर्मच्यार्यांचा झाला आहे. यामुळे तालुक्यातील निराधार, विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर व बिलोली तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीचा प्रसंग उद्भवल्यास याला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न तहसिलदार ये-जा करीत आसल्या कारणांमुळे अनेक कामे खोळंबत असल्याने जनतेची गैरसोय होत आहे.  बिलोली तालुक्यातील जनतेची गैरसोय दुर क