मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2017 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नागरिकांनो महाराष्ट्र पोलीस सिटीझन पोर्टल ॲपचा वापर करा - धबडगे

बिलोली :- वैभव घाटे ‘महाराष्ट्र पोलीस सिटीझन पोर्टल ॲप’ मुळे सामान्य नागरिक अधिक सक्षम तर पोलीस प्रशासनास काम करण्यास मोठी मदत मिळणार आहे त्यामुळे नागरिकांनी आपल्या स्मार्ट फोनमध्ये हा अँप डाऊनलोड करून या अँपच्या माध्यमातून गुन्हे विषयक कोणताही रेकार्ड ऑनलाईन पाहणे, ऑनलाईन तक्रार दाखल करणे, तपासाची स्थिती जाणून घेणे या बाबी सहज उपलब्ध होणार आहेत त्यामुळे या अँप चा मोठ्या प्रमाणात प्रसार करावे असे आदेश पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मिना यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय  पोलिस कार्यालय व पोलिस ठाणे यांना पत्रकाद्वारे कळविले होते. पोलिस अधिक्षकांनी दिलेल्या आदेशाचे पालन करत बिलोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे व पोलिस अधिक्षक यांनी या अँपचे जास्तीतजास्त नागरिकांनी "महाराष्ट्र पोलिस सिटीझन पोर्टल अँप" चा वापर करावे असे अवाहन केले आहे. महाराष्ट्रात गुन्ह्यांचा आलेख कमी करण्यासाठी पोलीस प्रशासन वेगवेगळया उपाययोजना राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे मोबाईल ॲप पोलीस विभागाने विकसित केले आहे. महाराष्ट्र सारख्या मोठया राज्यासाठी हे काम अतिशय कठीण होते. मात्र पोलीस विभागाच

बिलोली तहसिल कार्यालयात मौखिक आरोग्य तपासणी शिबीर संपन्न बिलोलीच्या ग्रामीण रूग्णालयना राबविली मोहीम

  बिलोली :- वैभव घाटे तालुक्यातील ग्रामीण रूग्णालय बिलोलीच्या वतिने आज शुक्रवार दि २९ डिसेंबर रोजी बिलीली तहसिल कार्यालयात मौखिक आरोग्य तपासणी शिबीर राबविण्यात आली. या शिबीरात तहसिल कार्यालयात सर्व कर्मचा-यांची दंत तपासणी सह इतर आजारांची तपासणी करण्यात आली. मौखिक आरोग्य तपासणीतून पुढील उपचाराची गरज भासणऱ्यांची स्वतंत्र यादी करून संदर्भसेवा उपलब्ध करून दिली जाणार असून अशा रूग्णांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात येणार असल्याचे डाँ पुजा भाकरे यांनी यावेळी सांगितले. तर शासकिय अधिकारी व्यसनापासून दूर राहिल्यास कर्मचा-यांवर प्रभाव असू शकतो त्यामुळे शक्यतो शासकिय कर्मचा-यांनी धुम्रपान करू नये अशी सुचना करत तहसिल कार्यालय परिसरात धुम्रपान जनजागृती चे फलक लावले जावे असे बिलोली ग्रामीण रूग्णालयाचे अधिक्षक डाँ नागेश लखमावाड यांनी सुचविले. यावेळी उपविभागीय अधिकारी निवृत्ती गायकवाड , तहसिलदार विनोद गुंडमवार , नायब तहसिलदार नागमवाड ,  ओमप्रकाश गौड , चव्हाण साहेब , नरावाड साहेब ,  डाँ शामला ढवळे , दिनेश तळणे यांच्यासह अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते.

नुसत्या मुरुमावरुनच चालतोय रोडरोलर

 *बिलोली - वैभव घाटे*  बिलोली तालुक्यातील कासराळी ते रुद्रापुर रस्त्याची दुरुस्ती गेल्या चार दिवसांपासून सुरू असून रस्त्याचे काम करतांना ना पाणी,ना गिट्टीचा वापर करता फक्त मुरुमाचा वापर करुनर खड्डे बुजवण्याचे काम सुरु असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.”आवो चोरो बांधो भारा आधा तुम्हारा आधा हमारा” या म्हणीप्रमाणे सध्या मुरुमावरच रोडरोलर चालवून रस्ता दाबण्याचे काम सुरु असल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. जिल्हा परिषद सदस्याचा गावातुन 4 कि.मी,अंतरावर रुद्रापुर हे गाव असून देखील या रोडच्या कामाकडे लक्ष न ठेवने म्हणजे मिलीभगत नव्हे काय ? अशीही चर्चा बिलोली व बिलोली तालुक्यात होत असली तरीही प्रसाशन माञ संबंधीत गुतेदारांना पाठीशी घालुन “तेरीभी चुप मेरी भी चुप” ची भुमीका प्रशासन घेत असल्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने याकडे लक्ष देण्याची मागणी पञकार संरक्षण समिती बिलोली ने बांधकाम विभागाकडे केली आहे . पञकार संरक्षण समिती चे कार्याध्यक्ष संजय पोवाडे , अध्यक्ष ए.जी.कुरेशी , सचिव सय्यद रियाज , प्रकाश फुगारे , गणेश गिरगावकर ,इलियास फारुखी,गणपत धर्मापुरे आदिच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत .

नुसत्या मुरुमावरुनच चालतोय रोडरोलर

.  * बिलोली - वैभव घाटे*  19 बिलोली तालुक्यातील कासराळी ते रुद्रापुर रस्त्याची दुरुस्ती गेल्या चार दिवसांपासून सुरू असून रस्त्याचे काम करतांना ना पाणी,ना गिट्टीचा वापर करता फक्त मुरुमाचा वापर करुनर खड्डे बुजवण्याचे काम सुरु असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.”आवो चोरो बांधो भारा आधा तुम्हारा आधा हमारा” या म्हणीप्रमाणे सध्या मुरुमावरच रोडरोलर चालवून रस्ता दाबण्याचे काम सुरु असल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. जिल्हा परिषद सदस्याचा गावातुन 4 कि.मी,अंतरावर रुद्रापुर हे गाव असून देखील या रोडच्या कामाकडे लक्ष न ठेवने म्हणजे मिलीभगत नव्हे काय ? अशीही चर्चा बिलोली व बिलोली तालुक्यात होत असली तरीही प्रसाशन माञ संबंधीत गुतेदारांना पाठीशी घालुन “तेरीभी चुप मेरी भी चुप” ची भुमीका प्रशासन घेत असल्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने याकडे लक्ष देण्याची मागणी पञकार संरक्षण समिती बिलोली ने बांधकाम विभागाकडे केली आहे . पञकार संरक्षण समिती चे कार्याध्यक्ष संजय पोवाडे , अध्यक्ष ए.जी.कुरेशी , सचिव सय्यद रियाज , प्रकाश फुगारे , गणेश गिरगावकर ,इलियास फारुखी,गणपत धर्मापुरे आदिच्या निवेदनावर सह्या आहेत .

माचनुर येथील पाच दिवसीय योग विज्ञान शिबीरास भरगोस प्रतिसाद

बिलोली :-  शिवराज भायनुरे माचनुर ता बिलोली येथील पंतजली योगपीठ हरिद्वार यांच्या संयुक्त विद्यमाने इंदिरा गांधी विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित योग शिबीरास उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे          बुधवारपासून पंतजलीचे योगपीठ हरिद्वार प्रशिक्षक सुरेश लंगडापुरे यांनी पहाटे 5 ते 7 या दोन तासात योगाचे धडे देत आहेत महिला व पुरुषांकरीता स्वतंत्र योगासाठी आसनाची व्यवस्था करण्यात आली आहे पाच वाजता नागनाथ पाटील (तं मुक्ती अध्यक्ष माचनुर ), दिगांबराव पा फडसे (माजी पं समिती सदस्य ), माधवराव हाणमंतराव पाटील (सेवा निवृत्त प्राध्यापक ), शंकरराव परसुरे (माजी पं समिती उपसभापती ) यांच्या उपस्थितीत योग शिबीराचे उद्घाटन झाले        योगसाधक महिलांचाही मोठा सहभाग आहे 17 डिसेंबर पर्यंत दररोज पहाटे 2 तास वेगवेगळी आसने व योगाचे प्रकार व रात्री 8 ते 10 पर्यंत आरोग्य शिबीराच्या माध्यमातून दैनंदिन आहार-विहार पद्धती, घरगुती उपचार पद्धती व इतर प्राचीन उपचार पद्धतीने शरीर निरोगी व स्वस्त होण्यासाठी प्रशिक्षण सुरेश लंगडापुरे यांनी यानी देणार असल्याचे सांगितले व शिबीरा दरम्यान जनजागरण रॅली, स्वच्छता अभियान, व होम हव

आरोग्य कर्मचाऱ्यांची प्रश्न सोडण्यासाठी वज्रमुठ राज्य समन्वय समिती स्थापन आरोग्य विभागातील २२ कर्मचारी संघटना एकत्रित राज्य समन्वय समिती स्थापन आरोग्य विभागातील २२ कर्मचारी संघटना एकत्रित

आरोग्य कर्मचाऱ्यांची प्रश्न सोडण्यासाठी वज्रमुठ राज्य समन्वय समिती स्थाप जिल्हा प्रतिनिधी नांदेड वारंवार पाठपुरावा करुनही प्रश्न सुटत सुटत नसल्यामुळे व मागण्या प्रलंबित मान्य करुन घेण्यासाठी राज्यातील सर्व आरोग्य कर्मचारी संघटना यांचा एकञित मेळावा घेवुन या सर्व संघटना एकञीतपणे येवुन महाराष्ट्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांची एक समिती स्थापन करण्यात आली.आता या सर्व संघटना एकञितपणे *शासकीय निमशासकीय आरोग्य सेवा कर्मचारी समन्वय समिती* या समिती अंतर्गत काम करण्याचे एकमताने ठरण्यात आले. याबाबतीत सविस्तर वृत्त असे कि महाराष्ट्रातील आरोग्य सेवेतील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संघटना या वेगवेगळ्या पद्धतीने शासनाकडे  कर्मचाऱ्यांच्या  विविध प्रश्न मांडले पण शासन यास काहीही प्रतिसाद देत नव्हते.या सर्व बाबी पाहुन अशोक जयसिंगपुरे यांनी सर्व आरोग्य कर्मचारी संघटनाना बोलुन एकञीकरणासाठी पाठपुरावा करत होते. व यासाठी दि.२६ नोव्हेंबर रोजी मुंबईला बैठक ठेवली.सर्व संघटना यांनी सकारात्मक प्रतिसाद देत एकञित येत राज्य आरोग्य कर्मचारी समन्वय समिती स्थापन करण्यात आली.  यावेळी अशोक जयसिंगपुरे यांनी सर्व कर्मचा

माचनुर येथे पंतजली योगपीठ, हरिद्वार यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवसीय योग विज्ञान शिबीराचे आयोजन* बिलोली प्रतिनिधी

बिलोली प्रतिनिधी (शिवराज भायनुरे )  मौजे माचनुर ता बिलोली येथिल इंदिरा गांधी विद्यालयाच्या मैदानात भव्य योग विज्ञान शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन नाव नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे     माचनुर ता बिलोली येथे दि 13 डिसेंबर ते 17 डिसेंबर या पाच दिवसीय योग विज्ञान शिबीरात प्राणायामचे आठ प्रकार विविध 12 प्रकाराचे मुळ व्यायाम मुलांसाठी व महिलांसाठी विशेष प्राणायामची माहिती योग प्रशिक्षक व मार्गदर्शक श्री सुरेश लंगडापुरे (जिल्हा योग प्रचारक /शिक्षक) यांच्या मार्फत घेण्यात येणार आहे       सदरील योग विज्ञान शिबीर निशुल्क असुन या शिबिराचा माचनुर व परिसरातील नागरिकांनी मोठय़ा संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे या शिबिराची वेळ पहाटे 5 ते 7 असा राहणार आहे व वेळेला महत्त्व दिल्या जाईल व तसेच सोबत वहीपेन, चटई सतरंजी घेवुन यावे या शिबिराची नाव नोंदणी शिबीराच्या आयोजन समिती मार्फत करण्यात येत आहे तरी नाव नोंदणी करीता नागनाथराव पाटील, जगदीश फडसे, सचिन पाटील व बालाजी कुंभारे यांच्यासह आयोजन समितीकडे संपर्क करावा

सलग चार वर्षापासुन बामणी बु शाळेचे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात यश

बिलोली प्रतिनिधी गटसाधन केंद्र बिलोली यांच्या वतीने आंतरभारती माध्यमिक विद्यालय बिलोली येथे 43 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन बिलोली येथे आयोजन करण्यात आले होते तालुक्यातील 31 शाळेनी यात सहभागी घेतला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा आमदार श्री पटणे साहेब प्रमुख पाहुणे श्री लखमावाड साहेब(वैद्यकीय अधीक्षक बिलोली)श्री कुलकर्णी साहेब(गटशिक्षणाधिकारी  बिलोली)सौ पटणे मॅडम(मु अ)आणि परीक्षक  म्हणून श्री शेख सर, आणि सहकारी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण म्हणजे ग्रामीण भागातून आलेले जी प प्रा शाळा बामणी बु चे विद्यार्थी सायकल वर चालणारी इको फ्रेंडली वाशिंग मशीन या प्रयोगाचे सादरीकरण  श्री बरबडे सर यांच्या मार्गदर्शनाने  भूषण दुधारे,पांडुरंग धानके, मुस्कान सय्यद, सुदर्शन बत्तुलवार,महेश्वरी बिरकुरे या विद्यार्थिनी अतिशय उकृष्ट पणे केले आणि या उपक्रमाला प्राथमिक विभागात  प्रथम क्रमांक  तसेच लोकसंख्या शिक्षण या विषयामध्ये आपली चूक सुधारा  या विषयाचे सादरीकरण  श्री बरबडे सर यांनी केले त्यांचे पण प्रथम क्रमांक विज्ञान प्रदर्शनात निघाले,,,, जि प प्रा शाळेचे असे दुहेरी यश सर्वांच

सगरोळी फाटा ते टाकळी फाटा रस्त्यावरील खड्डे* बुजविण्याचे काम निकृष्ठ.

नांदेड - वैभव घाटे रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे आदेश शासनाने जाहीर करताच सगरोळी फटा ते टाकळी फाटा देगलुर रोड वरील खड्डे बुजविण्याचे काम सुरु केले आहे. सद्या रस्त्यावरील खड्ड्याचा प्रश्न चर्चीला जात आहे.राज्यमार्ग व जिल्हा मार्ग व अन्य रस्त्याची दैनीय आवस्था झाल्याच्या तक्ररी मोठया प्रमानात केल्या गेल्या होत्या. खड्ड्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या बाबीचे गांभिर्याने घेत शासनाने 15 डिसेंबर पर्यंत रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे आदेश दिले. सगरोळी फटा हा तेलंगाणा व महाराष्ट राज्याला जोडनारा रस्ता आगदी सिमे लगद असुन तो देगलुर मार्ग कर्नाटक , बिदर कडे जणारा राज्य क्रंमाकाचा रस्ता असुन खड्डे बुजविण्याचे काम मोठ्या प्रमानात सुरु आहे. मात्र हे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे करण्यात येत असल्याने या कामाकडे वरिष्ठानी लक्ष देउन रस्त्याचे काम दर्जेदार करावे अशी मागणी सगरोळी परिसरातील जनतेतुन होत आहे. या रस्त्याच्या  अनेकदा संबधिताचे लक्ष वेधले आहे. परिणामी रानवळकरानी या रस्त्याचे काम हाती घेतले आहे. काम चांगले करुन घेन्यात त्यांचा हात खंड असतानही आज हे काम अत्यंत निकृष्ठ प्रतीचे होत असल्याने स
महाराट्र व तेलंगाणा चे आर.टी.ओ.चे उपकेंद्र बणले हाप्ते वसुलीचे केंद्र   बिलोली- वैभव घाटे           महाराट्र व तेलंगाणाच्या सिमेवर असलेले आर. टी. ओ. चे उपकेंद्र बनले हाप्ते  वसुचे केंद्र,        सगरोळी गाव हे तेलंगाणा राज्याच्या सिमेवर वसलेले गाव आहे. सगरोळी या गावावरूण बिलोली, देगलुर, बोधण. निझामाबाद अशी वहातुकीची  नेहमीच वर्दळ असते. बोधण देगलुर बसेस हे महाराट्र च्या बसेस पेक्षा तेलंगाणाचे बसेस जास्त ये जा करतात.       महाराष्ट्रतील  देशी दारू तेलंगाणात सहज व तेलंगाणातील शिंदी ही महाराट्रात सहज दोन्ही राज्या च्या आर. टी. ओ, उपकेद्रातील अधिकारी  यांणा हताशी धरूण तेलंगाणातील शिंदी महाराष्ट्रत सहज वहातुक करूण अणली जात आहे, या कडे येथील अधिकारी अर्थपुर्ण संबंधातुण दोन्ही राज्याचे आर, टी. ओ. चे अधिकारी  निक्रीय ठरत आहेत.       महाराट्रातील देशी दारूला  तेलंगाणात बोधण मंडल मधील बोधण, सालुरा, पोतंगल, मंधरणा, हुस्सा, झाडी, निळा, बडदेपुर, कादेपुर,  आदी ठिकाणी देशी दारूची मागणी असुण चढ्या दराने विक्री केली जाते अशी खुली चरच्या सगरोळी येसगी अदी सीमावरती गावात करत आहेत,      तेलंगाणाती

चिटमोगरा येथील मातंग समाजातील पिराजी जळबा शेळके या शेतकरी तरुणाला साहेबराव जाधव पाटील यांच्याकडून जबर मारहाण, वारणेचा वाघ सामाजिक संघटनेच्या पुढाकाराने अखेर अट्रोसिटी एक्ट नुसार गुन्हा दाखल

बिलोली प्रतिनिधी बिलोली तालुक्यातील मौजे चिटमोगरा येथील रहिवासी पिराजी शेळके या शेतकरी तरुणास शेताच्या धुऱ्याच्या  भांडणावरून जबर मारहाण व जातिवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याचि धमकी दिल्याने घाबरलेल्या फीर्यादीने रामतीर्थ पोलीस स्टेशनला धाव घेऊन गुन्हा दाखल करून घेण्याची विनवणी केली. मात्र काल पासून गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ होत असल्याचे समजताच वारणेचा वाघ सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौतम भालेराव,संस्थापक सचिव संविधान दुगाने यांनी फिर्यादिचि भेट घेऊन बिलोली चे पोलीस उपाधिक्षक विशाल खांबे यांना दूरध्वनीवरून संपर्क करून घटनास्थळी उपस्थित  राहाण्यास सांगितल असता मी शासकीय कामाकरीता नांदेड ला गेल्याचे  सांगितले.आणि पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांना एफआयआर नोंदवून घेण्यास सांगितले..   यावेळी दैनिक सम्राटचे ता.प्रतिनिधि भास्कर भेदेकर यांनी सुद्धा सदरील पीड़ित व्यक्तिस न्याय मिळावा यासाठी सतत प्रयत्नशील राहिले आहेत.अखेर अट्रोसिटी एक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीआय दिलीप गाडे हे आरोपी साहेबराव जाधव यांना सायंकाळ पर्यंत अटक करण्याचे आश्वासन दिले आहे.   या बाबींमुळे घ

बिलोली येथे विविध ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

बिलोली येथे विविध ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन बिलोली प्रतिनीधी              नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे राष्ट्रनिर्माते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 61 वा महापरिनिर्वाण दिन सार्वजनिक भीम जयंती महोत्सव,सभापती निवासस्थान,डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर,देशमुख नगर येथे डॉ.बाबासाहेबांच्या पावन स्म्रुतीला अभिवादन केल.बिलोली तहसील समोरील भीमगायनाचा कार्यक्रम हे मुख्य आकर्षण ठरले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बिलोली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मा.भगवान धबडगे,नायब तहसीलदार ओमप्रकाश गौन्ड,बिलोलीचे माझी नगराध्यक्ष भीमराव जेठे,यशवंत गादगे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेबांच्या पुर्नाक्रूती प्रतीमेला पुश्पहार अर्पण करण्यात आले.यावेळी नगरसेवक प्रकाश पोवाडे,महेंद्रभाऊ गायकवाड,नगरसेवक आजमद चाऊस,जावेद कुरेशी,लक्ष्मण शेट्टीवार,समाधान जाधव,पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे,दै.गाववाला चे ता.प्रतिनिधी प्रा.मारोती भदरगे,संदेश जाधव,वारणेचा वाघ सामाजिक संघटनेचे अध्यक्ष गौतम भालेराव,सचिव संविधान दुगाने,दैनिक सम्राटचे प्रतिनिधी भास्कर भेदेकर,बौद्धाचार्य गोवलवार सर,चंद्रकांत वाघमारे,वैद

खैरलांजी,रोहीत,आणि नितीन आगेच्या मारेकऱ्याना केंव्हा होणार फाशी-संविधान दुगाने

नांदेड प्रतिनिधी  दीड वर्षापूर्वी घडलेल्या कोपर्डि बलात्कार प्रकरनातील आरोपीना फाशीची शिक्षा ठोटावण्यात आली मात्र बरीच वर्ष लोटुनही आजपर्यंत खैरलांजीतील पीड़ित भोतमांगे परिवाराला न्याय का मिळाला नाही?असा सवाल वारणेचा वाघ सामाजिक संघटनेच्या संविधान दुगाने यांनी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांना दिलेल्या लेखी निवेदनामध्ये केला आहे.        त्यात त्यांनी रोहित वेमूल्ला व नितीन आगे प्रकरणाचा ही प्रकर्षाने उल्लेख केला आहे.समता आणि न्याय भारतीय संविधानातील मूलभूत अधिकाराची पायमल्ली करत भारतीय न्याय व्यवस्थेत न्यायदानाची महत्वपूर्ण भूमिका बजावणारे शासकीय वकील जात पाहून केस लढवत असल्याचा घनाघाती आरोप दुगाने यांनी केला आहे.कारण खैरलांजी मध्ये एका स्त्रीच्या योनीमध्ये रॉड घालून तिच्यावर सामूहिक बलात्कार आळीपाळीने तेथील जातीय गाव गुंडानी केला.तिच्याच आईची गावभर नागडी धिंड काढली गेली.तिच्या सोबत तिच्याच भावाने बलात्कार करावा अशी धमकी भावाला दिली गेली.त्यांनी ही मागणी ऐकली नाही म्हणून त्याचे गुप्तांग कापले गेले होते.हे सगळं घडत असताना त्या गावातील महिला टाळ्या वाजवत होत्या.हल्लेखोराना चेतवीत होत्

त्यात्या वंचित शेतकऱ्यांसाठी आ. कडुंना दिले निवेदन लेंडी प्रकल्पावर विस्तृत केली चर्चा मुखेड प्रतिनिधी :-०३

            मुखेड  प्रतिनिधी :- बिलोली टाईम्स न्युज नेटवर्क                     परीसरातील अनेक गावातील सन२०१६-१७ यामध्ये ४०० च्या जवळपास शेतकऱ्यांनी स्टेट बँक आँफ इंडिया या बँकेत रितसर पध्दतीने प्रधानमंञी पिकविमा योजना भरले होते . पण अध्यापर्यत त्या वंचित शेतकऱ्यांचा पिकविम्याचा लाभ मिळालाच नाही . या वंचित शेतकऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटुन आपले व्यथा मांडले , याच अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दि२४ रोजी लाक्षणिक उपोषण केले. तरी या मुजोर प्रशासनाने कोणतेच उत्तर देत नाही. यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आ. बच्चु कडू यांची भेट घेऊन मुखेड तालुका प्रमुख मन्मथ खंकरे, ता.सरचिटणीस निखील कोयलकोंडेवार , निखील गोगा, अविनाश जाधव यांनी भेट घेऊन विस्तृत चर्चा केली...            मुक्रमाबाद येथील गेल्या ३५ ते ४० वर्षापासुन  रखडीत असलेल्या लेंडी धरणा संदर्भात , अगोदर पुणर्वसन नंतर धरण , व परीसरातील अनेक गावांचे झालेले पुणर्वसन संदर्भात यासह अनेक प्रलंबित विषयावर विधानसभेत आवाज उठवणार असे आ.बच्चु कडू यांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांना सांगितले ...            और

कांगठी येथे संविधान दिन साजरा संविधान म्हणजे भारतीयांचा श्वास :- पत्रकार गौतम वाघमारे

बिलोली प्रतिनिधी कांगठी - भारतीय घटनेचे महत्व व त्याचा जनजागर करत मौजे कांगठी येथे संविधान दिन साजरा करण्यात आला . संविधानकार डॉ बाबासाहेब आंबेडकर व संविधानाचे पुष्पपुजन करून उद्देशिकेचे समुहवाचन करण्यात आले . ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना पत्रकार गौतम वाघमारे म्हणाले की भारतीय घटना ही सर्व भारतीयीचा श्वास आहे जसे जगण्यासाठी श्वासाचे महत्व आहे तसेच घटनेचे भारतास महत्व आहे . घटनेचा अभ्यास आणि अनिवार्यता समजूनच आपण भारतीय नागरिक म्हणून ओळख निर्माण करू शकतो . कार्यक्रमासाठी ग्राम पंचायत सदस्य शेषेराव वाघमारे विठ्ठल वाघमारे बाळाजी वाघमारे दत्ता संभाजी व अनेक विद्यार्थी तथा ग्रामस्थ उपस्थित होते

महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघ बिलोली व तुकाराम सुर्यवंशी बहुउद्देशिय संस्था च्या संयुक्त विद्यमाने सभापती निवास प्रांगणात संविधान दिन मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला

बिलोली : डी.टी.सुर्यवंशी समस्त विश्वाला आदर्शवत व अनेक राष्ट्रांनी संदर्भ म्हणून स्विकृत अशा भारतीय संविधानाचा गौरव दिन म्हणून अधिकारी ; पत्रकार व संविधान प्रेमी नागरिकांच्या उपस्थितित पार पडला . डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस अथक परिश्रम करून संविधानरुपी शिल्प राष्ट्रास अर्पण केले . भारतात असणारी विविधता व विषमतेचा अभ्यास करून सुवर्णमध्य साधला . न्याय स्वातंत्र्य समता व बंधुतेचा जागर करून मानवी दरी संपवणारी व प्रत्येक नागरिकाला प्रतिष्ठा व ओळख विधिवत उपलब्ध करणारे संविधान हे समस्त भारतीय जणांसाठी आदरणीय आहे . सदर ग्रंथराजाचा यथोचित सन्मान त्यात मिळालेल्या अधिकाराचे संगोपण व संवर्धन होणे हे या दिनाचे महत्व आहे . कार्यक्रमाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर व संविधान ग्रंथाचे पुष्पपुजन करून करण्यात आले व संविधानाच्या उद्देशिकेचे प्रकटवाचन करण्यात आले . ह्यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मत मांडुन प्रबोधन केले . कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान पोलिस निरिक्षक भगवान धबडगे नी भूषविले . कार्यक्रमास महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाचे सुनिल कदम मारोती भदरगे मारोती भालेराव सं

बिलोलीत भारीपच्या वतीने संविधान गौरव दिन साजरा. संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करून डॉ.बाबासाहेबांना अभिवादन.....!

बिलोली प्रतिनिधी  ज्यांना वर्गात बसून शिकण्याची मुभा नव्हती ज्यांच्या सावलीचाही विँटाळ मानला जायचा त्याच युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी भारताला जगातील सर्वश्रेष्ठ संविधान 2 वर्ष 11 महीने आणि 17 दिवसाच्या कालावधीत पूर्ण करून 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाला बहाल केला.तोच दिवस संविधान गौरव दिन म्हणून संपूर्ण देशभरात साजरा करून डॉ.बाबासाहेबांना अभिवादन या दिवशी करतात.   यावेळी जाणीव पूर्वक प्रशासनातील पदाधिकाऱ्याना पाचारण करण्यात आले होते.यावेळी पोलिस निरीक्षक मा.भगवान धबडगे,सपोनी सोमनाथ शिंदे,नायब तहसीलदार मा.मामिड्वार यांना पाचारण करण्यात आले होते.कारण डॉ.बाबासाहेब म्हणाले होते की,संविधान कितीही चांगले असो ते राबवनाऱ्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते जर प्रामाणिक असतील तर संविधान चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही.पण या उलट जर संविधान राबवणारे जर अप्रामाणिक असतील तर वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही.म्हणून प्रशासनातील अधिकारी व सत्ताधारी लोकाना पाचारण भारीप बहुजन महासंघ ता.बिलोलीने केले होते.      या कार्यक्रमासाठि भारीपचे जिल्हा प्रवक्ता डॉ.प्रा.बलभीम वाघमारे,बिलोलीचे माजी नगराध्यक्ष भी

भारतीय संविधानातच देव सापडेल.!सोनू दरेगावकर*

नायगाव:- प्रतिनिधी       *तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा दरेगाव येथे 26 नोहेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संविधानाच्या प्रस्ताविकेच वाचन करून संविधान दिन साजरा करण्यात आला.* *त्यावेळी 26/11 च्या झालेल्या दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.त्यावेळी साहित्यिक सोनू दरेगावकर यांच्याकडून विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून शालेय साहित्य देण्यात आले.* कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सोनू दरेगावकर म्हणाले भारतीय संविधान हे भारत देशाने तर मान्य केलेच आहे परंतु आज जगाला सुध्दा भारतीय संविधानाची गरज पडत आहे.कारण माणूस हा माणूस म्हणून जगला पाहिजे त्याच्या पुढे कुठली जात येता कामा नये. एखादया माणसावर जर अन्याय झाला तर तो अन्याय त्याच्यावरचा दूर होण्यास संविधानाची गरज भासते म्हणून भारतीय संविधान प्रत्येक नागरिकांनी वाचले पाहीजे. संविधानातच देव सापडेल असेही सोनू दरेगावकर म्हणाले. पुढे प्रस्ताविकात शाळेचे मुख्याध्यापक माधव मोरे सर म्हणाले की, लाखो दलित दिनदुबळ्याना जे मान-सन्मान  मिळतो.ते केवळ ड

सगरोळीत बजरंग दल भरती आभियानास उत्सुर्फत प्रतिसाद

सगरोळीत बजरंग दल भरती आभियानास उत्सुर्फत प्रतिसाद तालुका प्रतिनिधी  बिलोली- देविदास कोंडलाडे दि.22 नोव्हेंबर रोजी बिलोली तालुक्यातील सगरोळी विश्व हिंदू परिषद - बजरंग दल भरती आभियानास मराठवाड्यात प्रारंभ झाला असून या आभियानास दि.19 नोव्हें ते 6 डिंसे 2017 पर्यत चालणार आहे.तरी सगरोळीत आभियानास प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याची माहीती विहिप धर्म प्रसार जिल्हा प्रमुख विठ्ठल तुकडेकर यांनी दिली. प्रसिद्धीस दिलेल्या पञकात म्हटले की, 1964 साली विविध पंथ - संप्रदायाच्या धर्माचार्यानी एकत्र येऊन हिंदू समाजाला संघटित करण्यासाठी विश्व हिंदू  परिषदेची स्थापना झाली.1980 नंतर सुरू झालेले अयोध्येच्या रामजन्मभुमी मुक्तीचे आंदोलन हा विश्व हिंदू परिषदेच्या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा होता.त्या दरम्यान अनेक संघर्षाचे प्रसंगही उध्वभू लागले त्या प्रसंगाना सामोरे जाण्यासाठी अर्थातच युवाशक्ती संघटित होणे आवश्यक होते. त्यामुळे रामजन्मभुमी मुक्ती आंदोलनात सहभागी असलेल्या युवकांनी संतांच्या मार्गदर्शनाखाली 1984 साली बजरंग दलाची स्थापना केली.     अखिल भारतीय अधिवेशनात गाय नही फटने देंगें, देश नही फटने देंगेंच्य

सगरोळी फाटा ते टाकळी फाटा रस्त्यावरील खड्डे* बुजविण्याचे काम निकृष्ठ.

सगरोळी फाटा ते टाकळी फाटा रस्त्यावरील खड्डे* बुजविण्याचे काम निकृष्ठ.  बिलोली प्रतिनिधी रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे आदेश शासनाने जाहीर करताच सगरोळी फटा ते टाकळी फाटा देगलुर रोड वरील खड्डे बुजविण्याचे काम सुरु केले आहे. सद्या रस्त्यावरील खड्ड्याचा प्रश्न चर्चीला जात आहे.राज्यमार्ग व जिल्हा मार्ग व अन्य रस्त्याची दैनीय आवस्था झाल्याच्या तक्ररी मोठया प्रमानात केल्या गेल्या होत्या. खड्ड्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या बाबीचे गांभिर्याने घेत शासनाने 15 डिसेंबर पर्यंत रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे आदेश दिले. सगरोळी फटा हा तेलंगाणा व महाराष्ट राज्याला जोडनारा रस्ता आगदी सिमे लगद असुन तो देगलुर मार्ग कर्नाटक , बिदर कडे जणारा राज्य क्रंमाकाचा रस्ता असुन खड्डे बुजविण्याचे काम मोठ्या प्रमानात सुरु आहे. मात्र हे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे करण्यात येत असल्याने या कामाकडे वरिष्ठानी लक्ष देउन रस्त्याचे काम दर्जेदार करावे अशी मागणी सगरोळी परिसरातील जनतेतुन होत आहे. या रस्त्याच्या  अनेकदा संबधिताचे लक्ष वेधले आहे. परिणामी रानवळकरानी या रस्त्याचे काम हाती घेतले आहे. काम चांगले करुन घेन्यात त

सगरेळी येथील पशुवैद्यकीय अधिकारी एच .के.तोडे वा-यावर .

सगरेळी येथील पशुवैद्यकीय  अधिकारी एच .के.तोडे वा-यावर .  बिलोली प्रतिनिधी  बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे पशुवैद्दकिय दवाखाना असुन या ठिकाणी पशुवैद्दकिय अधीकारी म्हणुन डॉ.एच.के.तोडे याची नियुक्ती करण्यात आली असुन ते गेल्या सहा महिण्या पासुन बेपता असुन सदरिल पशुवैद्दकिय दवाखाना नेहमी बंद राहत असल्यामुळे अनेक समस्याच्या विळाख्यात सापडला आहे.या पशुवैद्दकिय दवाखाण्यात जणावराना वैद्दकिय उपचारासाठी सगरोळीसह ,केसराळी,रामपुर,हिप्परगाथडी,शिंपाळा,दैलतापुर,बोळेगांव या गांवातील शेतकरी जणावराना उपचारासाठी येथे आणतात.माञ येथे पञाचा शेड सुद्धा उपलब्ध नाही उपचार करताना जणावराना बाधण्यासाठी केवळ एक तेही जीर्ण झालेले लोखंडी कठडे आहे.येथे जर उपचार करण्यासाटी जास्त जणावरे आली तर शेतक-याना ताटकळत उभे राहावे लागते एक तर हा पशुवैद्दकिय दवाखाना तेलंगाणा व महाराष्ट सिमेच्या राज्य मार्गावर असुन या पशुवैद्यकिय दवाखान्याची पशुअधिकारी वीना अत्यंत दैनि अवस्था झालीअाहे पशुवैद्किय दवाखान्यावरील टीनसेडला छिद्रे पडली आहेत.तर खिडक्या तुटल्या आहेत.आणि फरर्शीना तडे जात असल्यामुळे फर्शी दबली जाऊन दवाखाण्यातील फर्शी उ

*लाच घेणा-या महिला गृहपालास रंगेहाथ पकडले

* लाच घेणा-या महिला गृहपालास रंगेहाथ पकडले*   * नांदेड :-  वैभव घाटे*  मेसचे बिल मंजूर करण्यासाठी गृहपाल किशोरी अलोने यांना २० हजाराची लाच स्वीकारताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. हदगाव येथील समाज कल्याण विभागाच्या मुलीच्या वसतिगृहात त्या कार्यरत असून याच ठिकाणी त्यांना पकडण्यात आले.     हदगाव येथे समाज कल्याण विभागाचे मुलींचे वसतिगृह आहे. येथे ८ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थिनी राहत असून किशोरी अलोने या गृहपाल आहेत. वसतिगृहात कार्यरत असलेल्या खानावळीचे बिल काढताना विद्यार्थिनी उपस्थिती योग्य भरावी भरावी लागते. हि बाब लक्षात घेऊन अलोने यांनी मेस चालकाची अडवणूक करत विद्यार्थिनी उपस्थिती योग्य भरण्यासाठी २० हजार रुपयाची मागणी केली. यानंतर मेस चालकाने याबाबत नांदेड एसीबी कडे तक्रार केली. तक्रारीची शहानिशा करत आज सकाळी ११ वाजता नांदेड एसीबी ने शासकीय वसतिगृह परिसरात सापळा रचला. यावेळी अलोने या मेस चालकाकडून २० हजाराची लाच स्वीकारताना एसिबी च्या जाळ्यात अडकल्या.     याप्रकरणात हदगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा सापळा पोलीस अधीक्षक संजय ला

इसीसच्या नावाने नांदेड च्या एस.पी.ला मेल पाठविणार्‍या जालना येथील युवकास अटक.

इसीसच्या नावाने नांदेड च्या एस.पी.ला मेल पाठविणार्‍या जालना येथील युवकास अटक.   *नांदेड प्रतिनिधी* येथील जिल्हा पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मिणा यांना इसीस संघटनेच्या नावाने मेल पाठविणार्‍या जालना येथील एका युवकास दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. जालना येथील युसुफ कॉलनी भागात राहणार्‍या तज्जमुल खान अजिज खान याने दि. 14 नोव्हेंबर रोजी जिल्हा पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मिणा यांना मी इसीस संघटनेचा सदस्य असून मला अटक करा अशा आशयाचा ईमेल पाठविला होता.  या ईमेलच्या अनुषंगाने दहशतवाद विरोधी पथकाने जालना येथे जावून तज्जमुल खान अजिज खान या युवकाला अटक केली. या प्रकरणी अधिक चौकशी केली असता. तज्जमुल खान अजिज खान याचे जालना येथे कोल्ड्रींक्सचे दुकान आहे. त्याच्या काही मित्रांनी लग्न मोडले.  तर लग्नाच्या या विषयावरून त्याला नेहमी मानसिक त्रास देत असल्याने मित्रांचा बदला घ्यावा या उद्देशाने तज्जमुल खान अजिज खान याने मित्राच्या नावाने नांदेड जिल्हा पोलीस अधिक्षकांना मेल पाठविल्याचे उघड झाले आहे.
गुत्तेदार व बांधकाम विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात बिलोली तहसील समोर दुगाने चे  अमरण उपोषण सुरु. बिलोली प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड अंतर्गत चालू असलेल्या बिलोली ते देगलूर दरम्यान रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम विलास पाटील टाकळीकर यांच्या लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कडून गेल्या अनेक महिन्यांपासून चालू आहे.मात्र हे काम पूर्णपणे बोगस व निकृष्ट दर्जाचे होत आहे.याची कल्पना तीन महिन्यापूर्वी पासून उपोषणकर्ते  संविधान दुगाने यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला लेखी तक्रार देऊन रस्त्यांच्या चौकशीची मागणी केली होती.मात्र या तक्रारी अर्जाला केराची टोपली दाखवत बांधकाम विभागाने संबधित गूत्तेदाराला पाठीशी घातल्याचा आरोप दुगाणेनी केला आहे.      एकीकडे खड्डेमुक्त रस्ते  व अपघाताचे प्रमाण कमी करू पाहणाऱ्या महाराष्ट्र शासन व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना आगामी दोन वर्षासाठीे खड्डेमुक्त रस्ता हे अभियान राबवावे लागेल यात शंका नाही.कारण बिलोली- देगलूर हा राज्य महामार्ग असून हा रस्ता आंध्र,तेलंगण व कर्नाटक राज्यांना जोड़नारा दुवा मानला जातो.मात्र या

भविष्यात अपघाताचे माहेरघर बनेल बिलोली देगलूर महामार्ग-संविधान दुगाने

🚦 भविष्यात अपघाताचे माहेरघर बनेल बिलोली देगलूर महामार्ग-संविधान दुगाने         नांदेड प्रतिनिधी आंध्र,तेलंगणा व कर्नाटक राज्यांना जोडणारा हा रस्ता भविष्यात म्रुत्यूचा सापळा बनेल.अस वक्तव्य ट्वीटर या सोशल मीडियावर वारणेचा वाघ सामाजिक संघटनेच्या संविधान दुगाने यांनी केल आहे.  श्री.विलास पाटील टाकळीकर यांच्या लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कडून बिलोली ते आदमपूर या दरम्यान 16 किमी रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम चालू आहे मात्र हे काम इस्टिमेन्ट नुसार ठरवून दिलेल्या निकषांनुसार होतय का हे पहाण्यासाठी कुठल्याही राजकीय,अराजकिय पुढारी लोकांना व शासकीय बांधकाम अभियंत्याला वेळ नाही हे मात्र निश्चित.कारण ह्या रस्त्यावर दोन वर्षाच्या आत मोठ-मोठे खड्डे पडतील का तर या कामात मुरुमा ऐवजी काळी माती व लाल मातीचा वापर तर गिट्टि सुद्धा धूळरहित वापरली गेली आहे.आणि धूळ रहित गिट्टिचा वापर केल्याने रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता हे समजने मात्र कठिन जाणार आहे.     दूसरी महत्वपूर्ण बाब म्हणजे या रस्त्यात येणारे जे पूल आहेत ते सीमेंट कॉन्क्रेटचे बांधण्या ऐवजी यात मोठ मोठ्या दगडांचा सर्रास वापर केला गेला आहे.पा

बिलोली-देगलूर मार्गावरील लक्ष्मी कन्स्ट्रक्शन चे काम त्वरीत थांबविन्याची मागणी....! 13 नोव्हेंबर पासून बेमूदत आमरण उपोषण.. 🏻बिलोली प्रतिनिधी- वैभव घाटे

बिलोली-देगलूर मार्गावरील लक्ष्मी कन्स्ट्रक्शन चे काम त्वरीत थांबविन्याची मागणी....! 13 नोव्हेंबर पासून बेमूदत आमरण उपोषण.. 🏻बिलोली प्रतिनिधी- वैभव घाटे महाराष्ट्र कर्नाटक या दोन राज्यांना जोडणाऱ्या बिलोली देगलूर मार्गावर लक्ष्मी कन्स्ट्रक्शन अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण व पूल बांधणी चे काम 16 किमी अंतरावर बऱ्याच दिवसापासून चालू आहे.पण हे काम एकदम निकृष्ट पद्धतीचे होत असून रस्त्याच्या रुंदीकरनासाठी मुरुमाएवजी काळी मातीचा तसेच डष्टरहित गिट्टिचा वापर मोठ्याप्रमात केला जात आहे.तर पूलाच्या कामासाठी सीमेंट कोन्क्रेट ऐवजी मोठ-मोठ्या दगडांचा वापर करून वर-वरून सीमेंट चा लेप देऊन पुलाचे काम पूर्ण करत असल्याचे निदर्शनास आल्याने वारणेचा वाघ सामाजिक संघटनेच्या संविधान दुगाने यांनी दि.13/7/2017 रोजी बिलोली तहसीलदार विनोद गुंडमवार यांना लेखी तक्रार देऊन रस्त्याच्या कामांची चौकशी करण्याची  मागणी केली होती.निवेदनाची दखल घेत  तहसीलदारानी चौकशीसाठी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग नांदेड यांना पत्र पाठविले खरे पण आम्हाला पत्रच मिळाले नाही,तुम्ही देगलूर बांधकाम विभागाकडे जाऊन विचारपूस करा तिथे पत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा विशेष उपक्रम - बार्टी तर्फे चितोडिया समाजातील शाळाबाह्य मुलांना शाळेत प्रवेश देऊन कृतिशील पद्धतीने विद्यार्थी दिवस साजरा ...प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा विशेष उपक्रम - बार्टी तर्फे चितोडिया समाजातील शाळाबाह्य मुलांना शाळेत प्रवेश देऊन कृतिशील पद्धतीने विद्यार्थी दिवस साजरा ...प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे  बिलोली प्रतिनिधी  डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेच्या समतादूत प्रकल्पातर्फे शासन निर्णयानुसार जि.प.हायस्कूल,लोहगाव येथे विद्यार्थी दिवस साजरा करण्यात आला. सविस्तर वृत्त असे कि राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन म्हणजे ०७ नोव्हेंबर १९०० असून या दिवशी खऱ्या अर्थाने माणसाला माणूस म्हणून जगता यावे यासाठी माणसाच्या प्रतिष्ठेकरता लढणार्या एका क्रांतीची,युगांतराची सुरुवात  झाली.याअनुषंगाने त्यांचा शाळा प्रवेश दिन हा विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात आला. याचाच एक भाग म्हणून लोहगाव परिसरात बऱ्याच वर्षांपासून चितोडिया समाज वास्तव्यास आहे पण शिक्षण प्रवाहापासून वंचित आहे असे बार्टीतर्फे समतादूत इर्शाद शेख आणि समतादूत पांडुरंग मामीडवार यांनी  केलेल्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणांती  निदर्शनास आले व या शाळाबाह्य मुलांना शिक्षणप्रवाहा

बिलोली तहसिलचा सैराट कारभार सुरुच.

बिलोली तहसिलचा सैराट कारभार सुरुच.  बिलोली प्रतिनिधी- वैभव घाटे  गेल्या अनेक दिवसांपासून बिलोली तहसिल कार्यालयातील कर्मचारी निवासी न राहता नांदेड सारख्या शहरात राहून येजा करीत असल्याने तहसिल कार्यालयाचे अनेक कामे वेळेत होत नसल्यामुळे जनतेची कामे खोळंबत असल्याने पत्रकार  संरक्षण समिती  बिलोली च्या वतिने विभागीय अधिकारी बिलोली यांना निवेदन देण्यात आले. बिलोली तहसिल कार्यालयाचे तहसिलदार विनोद गुंडमवार हे बिलोली तहसिल येथे रुजू झाल्यापासून आजतागायत तहसील कार्यालयात नांदेड येथून ये-जा करीत आहेत. याचेच अनुकरण नायब तहसीलदार हे देखील नांदेड येथून ये-जा करित असुन मुख्यालया राहत नसूनही शासनाकडून घरभाडे उचल करीत शासनाची दिशाभूल करीत आहेत याचाच अर्थ उंटावरुन शेळ्या हाकण्यासारखा कारभार सदरील तहसील कर्मच्यार्यांचा झाला आहे. यामुळे तालुक्यातील निराधार, विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर व बिलोली तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीचा प्रसंग उद्भवल्यास याला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न तहसिलदार ये-जा करीत आसल्या कारणांमुळे अनेक कामे खोळंबत असल्याने जनतेची गैरसोय होत आहे.  बिलोली तालुक्यातील जनतेची गैरसोय दुर क

जास्त नफा मिळवण्यासाठी सीताफळ प्रक्रिया करणे गरजेचे - सौ. श्रद्धा रोहित देशमुख संचालिका

जास्त नफा मिळवण्यासाठी सीताफळ प्रक्रिया करणे गरजेचे - सौ. श्रद्धा रोहित देशमुख संचालिका             विभागीय सीताफळ कार्यशाळेत सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळाचा सहभाग बिलोली प्रतिनिधी   औरंगाबाद येथील तापडिया नाट्यगृह येथे दि. ३० ऑक्टोबर २०१७ रोजी,  पहिली “विभागीय सीताफळ कार्यशाळा” महाराष्ट्र शासन व चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अग्रीकल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली. या कार्यशाळेसाठी यशस्वी प्रक्रिया महिला उद्योजक म्हणून संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी येथील उत्कर्ष अॅग्रो इंडस्ट्रीज आणि ट्रेनिंग सेन्टरच्या संचालिका सौ. श्रद्धा रोहित देशमुख यांना आमंत्रित केले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन मा. डॉ. पुरुषोत्तम भापकर, विभागीय आयुक्त, औरंगाबाद आणि श्री नवलकिशोर राम, जिल्हाधिकारी, औरंगाबाद यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी सौ. श्रद्धा रोहित देशमुख यांनी त्यांच्या उत्कर्ष अॅग्रो इंडस्ट्रीज आणि ट्रेनिंग सेन्टरची स्थापना व वाटचाल याबद्दल सविस्तर अनुभव सांगितले तसेच प्रक्रिया उद्योगातील त्यांचे अनुभव कथन केले. सध्याच्या काळात जास्त नफा मिळवण्यासाठी सीताफळ प्रक्रिया करणे
बिलोलीचे एकात्मीक बाल विकास प्रकल्प कार्यालय वा-यावर    बिलोली - वैभव घाटे        येथील एकात्मीक बाल विकास प्रकल्प कार्यालय निव्वळ शोभेचे वस्तू बनले आहे.येथे केवळ एका चतुर्थ श्रेणी कर्मचा-यावर कार्यालयाचे काम सुरू आहे.तालुक्यातील १५ हजार बालक बालिकांसाठी १८५ अंगणवाडी कर्मचारी आणि कामकाज सध्या वा-यावर आहे.एकही अधिकारी वा कार्यप्रणव कर्मचा-याशिवाय या विभागाचे कामकाज सुरू आहे.    बिलोली येथील एकात्मीक बाल विकास प्रकल्प कार्यालय निव्वळ नावालाच कार्यरत आहे.या महत्वपुर्ण कार्यालयाकडे एकाही अधिकारी वा पदाधिकारी यांचे लक्ष असल्याचे दिसून येत नाही.बालक आणि बालिका सदृढ आणि सक्षम घडविण्यासाठी भावी भारत मजबूत बनविण्यासाठी कार्यरत असलेला हा विभाग सध्या उपेक्षित आहे.     या कार्यालयाचे एकात्मीक बाल विकास प्रकल्प अधिकारी पद रिक्त आहे.हे पद एका प्रामाणिक पण आजारग्रस्त व्यक्तीला अतिरिक्तपणे देण्यात आला.धर्माबाद येथून ये - जा करणाऱ्या बजाज नामक साह्यक गट विकास अधिका-यास येथील प्रमुख पद देवून आजारग्रस्त कार्यालयाला मरणासन्न करण्यात आले आहे.    सुगंधा क-हाळे या विस्तार अधिकारी सुद्धा देगलूरच्या मु

महाराट्र व तेलंगाणा चे आर.टी.ओ.चे उपकेंद्र बणले हाप्ते वसुलीचे केंद्र

महाराट्र व तेलंगाणा चे आर.टी.ओ.चे उपकेंद्र बणले हाप्ते वसुलीचे केंद्र   बिलोली- वैभव घाटे           महाराट्र व तेलंगाणाच्या सिमेवर असलेले आर. टी. ओ. चे उपकेंद्र बनले हाप्ते  वसुचे केंद्र,        सगरोळी गाव हे तेलंगाणा राज्याच्या सिमेवर वसलेले गाव आहे. सगरोळी या गावावरूण बिलोली, देगलुर, बोधण. निझामाबाद अशी वहातुकीची  नेहमीच वर्दळ असते. बोधण देगलुर बसेस हे महाराट्र च्या बसेस पेक्षा तेलंगाणाचे बसेस जास्त ये जा करतात.       महाराष्ट्रतील  देशी दारू तेलंगाणात सहज व तेलंगाणातील शिंदी ही महाराट्रात सहज दोन्ही राज्या च्या आर. टी. ओ, उपकेद्रातील अधिकारी  यांणा हताशी धरूण तेलंगाणातील शिंदी महाराष्ट्रत सहज वहातुक करूण अणली जात आहे, या कडे येथील अधिकारी अर्थपुर्ण संबंधातुण दोन्ही राज्याचे आर, टी. ओ. चे अधिकारी  निक्रीय ठरत आहेत.       महाराट्रातील देशी दारूला  तेलंगाणात बोधण मंडल मधील बोधण, सालुरा, पोतंगल, मंधरणा, हुस्सा, झाडी, निळा, बडदेपुर, कादेपुर,  आदी ठिकाणी देशी दारूची मागणी असुण चढ्या दराने विक्री केली जाते अशी खुली चरच्या सगरोळी येसगी अदी सीमावरती गावात करत आहेत,      तेलंगाणाती

पत्रकार तोष्णीवाल यांच्यावर झालेल्या हल्याचा बिलोली पञकार संघाच्या वतीने निषेध

पत्रकार तोष्णीवाल यांच्यावर झालेल्या हल्याचा बिलोली पञकार संघाच्या वतीने निषेध -------------------------------------------------------------  बिलोली     हिंगोली जिल्हा मराठी पञकार संघाचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी भ्याड हल्ला केला.या घटनेचा महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघ ता.बिलोलीच्या वतीने जाहिर निषेध करून हल्लेखोरांना तत्काळ अटक करण्याच्या मागणीचे निवेदन तहसिलदार बिलोली यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्याकडे पाठवले आले.    हिंगोलीचे जेष्ठ पञकार व जिल्हा पञकार संघाचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांच्यावर दि.२३ आक्टोंबर रोजी अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक केला.हि घटना घडून ३ दिवस उलटले तरी पोलिसांना आरोपीस पकडण्यात अध्याप अश आले नाही.यामुळे तालुक्यातील पञकारांमध्ये संतापाची लाठ उसळली असून दिलेल्या निवेदनात आपल्या भावना प्रकट करून मा.मुख्यमंञी यांच्याकडे नायब तहसिलदार संजय नागमवाड यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.यावेळी पञकार संघाचे अध्यक्ष  राजेंद्र पा.शिंदे,संघाचे प्रमुख गोविंद मुंडकर,कार्याध्यक्ष बाबूराव इंगळे,उपाध्यक्ष

प्रधानमंञी आवास योजनेमुळे गंजगावच्या नागरिकांसाठी अच्छे दिन..!

प्रधानमंञी आवास योजनेमुळे गंजगावच्या नागरिकांसाठी अच्छे दिन ..!   बिलोली प्रतिनिधी - वैभव घाटे महाराष्ट्र आणि तेंलगाणाच्या सिमेवर असलेल्या गंजगाव येथिल प्रधानमंञी आवास योजने अंतर्गत सन 2016 -17 या वर्षात येथिल कार्यक्षम व जबाबदार सरपंच मुळे या गावात 136 घरकुल मंजुर झाली असुन हे गाव या योजनेचा लाभ घेण्यात बिलोली तालुक्यात पहील्या क्रमांकावर आहे. येथिल ग्रामपंचायतीच्या सर्व कामकाजावर येथिल जनता समाधानी असुन नरेंद्र मोदीच्या या योजनेमुळेही नागरिक अनंदीत आहेत .136 पैकी 104 लाभार्थाच्या बँक खातेवर थेट अनुदान प्राप्त झाले आहे. या गावातील अनेक नागरिक निवार्या पासुन वंचित होते. परंतु येथिल सरपंच सौ. साविञाबाई माधवराव घाटे यांनी या योजनेत जातीने लक्ष घालुन शासनाला वेळोवेळी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे या गावात मोठ्या संख्येने घरकुल मंजुर झाले आहेत . येथिल जनता नरेंद्र मोदीच्या सब का साथ सबका विकास या घोषणेला साथ दिली होती. आणि आता त्यांना अच्छे दिन आल्यासारखे वाटत आहे. अनेकांचा निवार्याचा प्रश्न मिटल्यामुळे सर्व नागरिक भाजप सरकार वर  समाधानी आहेत. या योजनेच्या पाठपुराव्यात ग्रामपंचाय

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _______

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _________________________ मुंबई  - नंदु नाईक सांगलीत ऐन दिवाळीमध्ये ट्रक उलटून झालेल्या अपघातात दहा मजुरांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्तकेली जात आहे. एसटीच्या संपामुळे खाजगी वाहतुकीने प्रवास करणं मजुरांच्या जीवावर बेतल्याचं म्हटलं जात आहे. तासगांव-कवठेमहांकाळ मार्गावर योगेवाडी गावाजवळ पहाटे 2 ते 3 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. एसटी कर्मचाऱ्यांनी सकाळी संप मागे घेतला, मात्र काल एसटी बंद असल्यामुळे खाजगी ट्रक मधून कर्नाटक मधील काही मजूर कराडकडे मजुरीसाठी जात होते. योगेवाडी गावाजवळ चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक उलटला. ट्रकमधील फरशीखाली सापडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी आहेत. जखमींना मिरजेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताच्या वेळी ट्रक मध्ये 18 ते 20 प्रवासी होते. त्यामुळे ट्रकखाली आणखी काही प्रवासी अडकल्याची  भीती व्यक्त केली जात आहे.

भाजपा सरकारला वटणीवर आणण्यासाठी एस टी कामगारांचा स्मार्टसंप राजकीय खेळीतुन काँग्रेसचा पाठींबा ?

भाजपा सरकारला वटणीवर आणण्यासाठी एस टी कामगारांचा स्मार्टसंप राजकीय खेळीतुन काँग्रेसचा पाठींबा ? नायगाव प्रतिनिधी - माधव पवार राज्यातले सरकार असो की केंद्रातले सतेवर असल्याच्या नंतर फार मोठी जवाबदारी असते परंतु महाराष्ट्रातील एस टी कामगार दिनांक १६ ऑक्टोंबरच्या मध्यरात्री पासून संपावर गेल्यामुळे नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गासह अन्य ठिकाणच्या रस्त्यावर वहाणाऱ्या एस टी बसेस संपामुळे बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय झालीच परंतु लाखो रुपयाचे नुकसान सुध्दा ऐन दीपावलीच्या मुहूर्तावर झाल्याने त्यांचा फटका अखेर जनतेला बसणार असलातरी सदरच्या संपामुळे भाजपा सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी एस टी कामगाराने स्मार्ट संप पुकारला असल्याचे जनतेतुन बोलल्या जात असून सन २००४ ते २००६ या कालावधीत तत्कालीन परिवहन मंत्री तथा नांदेडचे सध्याचे खासदार अशोकराव चव्हाण हे होते त्यांच्या कार्यकाळात कसल्याच प्रकारचा स्मार्ट संप झाला नसल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष तथा उपसरपंच  घुंगराळा वसंत सुगावे. बालाजी मदेवाड सरपंच ( बरबडा ) माजी सरपंच नागनाथ हांनमते राज्य परिवहन मंडळात एकूण ३२ वर्ष सेवा क
*एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप, प्रवाशांचे हाल.*   *मुंबई - प्रतिनिधी*  वेतनवाढीच्या मागणीवरून राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाला मध्यरात्रीपासून सुरूवात झाली आहे. ऐन सनासुदीत राज्यभर एसटी सेवा बंद झाल्याने प्रवाशांचे हाल होण्यास सुरूवात झालीय. मुंबईत परळ डेपोतून मध्यरात्री सुटणाऱ्या गाड्या बाहेर पडल्या नाहीत. त्यामुळे दिवाळीनिमित्त गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांना मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. पुण्याच्या स्वारगेट आगारातून देखील एकही एसटी बाहेर पडलेली नाही. सर्व गाड्या आगारातच उभ्या आहेत. एसटी कर्मचारी आगारात जमले असून अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस देखील दाखल झाले आहेत. बसस्थानक व आगारांमध्ये वाहनांचे नुकसान होऊ नये, कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडविले जाऊ नये यासाठी पोलिसांची मदत घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच, सर्व एसटी आगार व स्थानकांमध्ये होणाऱ्या सर्व घटनांचे चित्रि‌‌करणही करण्यात येणार आहे. वेतनवाढीच्या मुद्द्यावरून एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली होती. त्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडण

नायगाव तालुक्यात नैसर्गिक अपत्तीचे थैमान खैरगावात वीज पडून एक ठार तर पत्नी व मुलगा जखमी आणि दुसऱ्या घटनेत दोन बैलासह मोर ईकळीचा केशव जखमी .

नायगाव तालुक्यात नैसर्गिक अपत्तीचे थैमान खैरगावात वीज पडून एक ठार तर पत्नी व मुलगा जखमी आणि दुसऱ्या घटनेत दोन बैलासह मोर ईकळीचा केशव जखमी . नायगाव - माधव पवार नायगाव तालुक्यात दररोज नैसर्गिक आपत्तीने  थैमान घातले असून दिनांक १५  ऑक्टोंबर रोजी दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या दरम्यान तालुक्यासह रुई बु परिसरात आवकाळी पावसाने मेघ गर्जनेसह पाऊस पडल्याने त्यात वीज कोसळुन खैरगाव येथील एका शेतात मयत व्यंकट भाऊराव कल्याण वय ४८ वर्ष हे जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी सौ गिरजाबाई व्यंकट कल्याण वय ४५ वर्ष आणि त्यांचा मुलगा प्रदीप व्यंकट कल्याण वय २७ वर्ष हे जखमी झाल्याने नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते असी माहीती नायगावचे तहसीलदार श्रीमती सुरेखाताई नांदे यांनी दिली असून  दुसऱ्या घटनेतील दुगाव तालुका बिलोली येथील रहिवासी असलेला शेतकरी नारायण किशनराव शिंदे यांचे शेतं कौठाळा तालुका नायगाव या शिवरात असलेल्या आपल्या शेतात बैल लिंबाच्या झाडाला बांधून त्यानी शेतात असलेल्या टीनापत्राच्या झोपडीत बसला असताना त्यांचा साठ हजारांचा बैल वीज पडून मरण पावला तर तिसऱ्या घटनेत मोरईकळ

बाबासाहेबांचा लढा हा जातीअंताचा होता...प्रकल्पाधिकारी सुजाता पोहरे.

बाबासाहेबांचा लढा हा जातीअंताचा होता...प्रकल्पाधिकारी सुजाता पोहरे. बिलोली - वैभव घाटे  डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे अंतर्गत समतादूत प्रकल्पाच्या माध्यमातून मौजे चिंचाळा ता.बिलोली येथे धम्मचक्रप्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. बार्टीचे महासंचालक डॉ.राजेश धाबरे यांच्या संकल्पनेतून मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे मँडम आणि औरंगाबाद विभागीय प्रकल्प संचालक डॉ.श्रीकांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली धम्मचक्रप्रवर्तन दिन साजरा करण्याबाबत जिल्हानिहाय नियोजन देण्यात आले होते. बार्टीचे  समतादूत नांदेड जिल्हा प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे मँडम यांच्या उपस्थिती आणि मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत आणि जि.प.प्रा.शाळा यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे सुंदर नियोजन करण्यात आले.बिलोली तालुक्याच्या वतीने कार्यक्रमाची सुरुवात ही  सकाळी समता प्रभातफेरीने झाली.समता प्रभात फेरीच्या माध्यमांतून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म स्वीकारण्यामागची कारणमीमांसा स्पष्ट करण्यात आली.त्यानंतर मुक्ति कोण पथे या पुस्तकांचे वाचन करून बुद्धवंदना घेण्यात आली. तथागत गौतम बुद्ध आणि डॉ.बाबास

नायगाव तालुक्यातील हिप्परगा येथे वीज पडून एका बैलासह गाय ठार ९० हजाराचे नुकसान तर शेतकऱ्याचा मुलगा ज्ञानेश्वर जखमी .

नायगाव तालुक्यातील हिप्परगा येथे वीज पडून एका बैलासह गाय ठार ९० हजाराचे नुकसान तर शेतकऱ्याचा मुलगा ज्ञानेश्वर जखमी .  . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . तालुका प्रतिनिधी  नायगाव - माधव पवार नायगाव तालुक्यातील मौजे हिप्परगा येथे दिनांक १४ ऑक्टोंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान तालुक्यासह रुई बु परिसरात आवकाळी पावसाने मेघ गर्जनेसह पाऊस पडल्याने त्यात वीज कोसळुन एका हिप्परगा येथिल शेतकऱ्यांचा बैल तर दुसऱ्या शेतकऱ्यांची गाय मरण पावली आणि सदर विजेचा धक्का लागल्याने एका शेतकऱ्यांचा १७ वर्षाचा मुलगा ज्ञानेश्वर जखमी झाल्याचे व्रत असून जखमी मुलांना नायगावच्या ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आल्याची माहीती गावाचे सरपंच राजीव पाटील कदम यांनी सांगितले असून सदर बैलाचा व गायींचा पंचनामा करण्यासाठी नायगावचे तहसीलदार श्रीमती सुरेखाताई यांच्या आदेशानुसार तलाठी हारीश तळकीत यांनी पंचनामा केला असून या परिसरात पावसाने अनेक दिवसापासून थैमान घातल्यामुळेच विजेचा जोर वाढला असल्याचे सदरील जनतेतुन बोलल्या जात आहे    तालुक्यातील मौजे हिप्परगा येथीलर

धावपळीच्या जीवनातील राजकारणाचे वादळ भाजपा पक्षावर मात करीत काँग्रेसच्या विराट विजयाने भाजप हादरला.

धावपळीच्या जीवनातील राजकारणाचे  वादळ भाजपा पक्षावर मात करीत काँग्रेसच्या विराट विजयाने भाजप हादरला. नायगाव - माधव पवार राजकारण म्हटले की धावपळीच्या जीवनातील राजकारणातचे वादळ या वादळात भाजपा पक्षावर मात करीत काँग्रेसच्या विराट विजयाने चांगलेच भाजपाचे नेते मंडळीला हादरा बसल्याचे या महानगर पालीकेच्या निकालातुन दिसून आले खाजगी व्यासपीठावर सारेच राजकीय पुढारी नेते मंडळी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते असतात परंतु निवडणुका आल्या लागल्या की मात्र आकाशातील मेघ गरजेनेसारखे गर्जत असतात  आकाशात किती ही काळेकोट आभाळ आले तरी एखादंया वेळेस पाऊस बरसत नाही तशाच पद्धतीने देशभरात भाजपाची मोठी लाट असली तरी ती लाट नांदेडच्या महानगर पालिकेच्या निवडणुकीत कुचकामी ठरली आणि काँग्रेस पक्षाच्या एक हाती सता देवून नांदेडच्या मतदारांनी महाराष्ट्राचे  माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या पाठीशी खंबीरपणे ताकत लावून एकंदरीत काँग्रेस पक्षांची हिंमत वाढवीली असे जनतेने व्यक्त केलेली मते आहेत यात कांही शंका नाही तशाच पद्धतीने नायगाव विधान सभा मतदार संघाचे आमदार वसंतराव चव्हाण यांची सुध्दा नायगावच्या नगर पालिकेवर काँग्रेस
गंजगाव ग्रामपंचायत पोटनिवडणुकी मध्ये  पञकार वैभव घाटे बहुमताने विजय. ------------------------------ ------------- बिलोली प्रतिनिधी बिलोली तालुक्यातील मौजे गंजगाव येथे 2015 या वर्षे ग्रामपंचायत निवडणूक घेण्यात आली सौ. साविञाबाई माधवराव घाटे या दोन प्रभागामधुन निवडुन आल्यामुळे त्यानी एका जागेचा राजीनामा दिला त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी 27 मे रोजी मतदान घेण्यात आले 29 मे रोजी    मतमोजणी मध्ये सरपंच सुपुञ वैभव माधवराव घाटे हे बहुमताने विजय झाले. निवडणूक निर्णय अधिकारी नवनाथ वगवाड यांनी हा निकाल जाहीर केला. बिलोली तालुक्यातील गंजगाव येथिल सरपंच सौ. साविञाबाई माधवराव घाटे 2015 च्या निवडणुकी मध्ये वार्ड क्र. 1 व वार्ड क्र.3 या दोनीही ठिकानाहुन बहुमताने विजय झाल्या होत्या . शासन नियमानुसार वार्ड क्रमांक तिनचा सदस्यचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेची शनिवारी 27 मे रोजी मतदान घेण्यात आले.  29 मे रोजी मतमोजणी घेण्यात आली. बिलोली तहसिलचे नायब तहसिलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी नवनाथ वगवाड यांनी केलेल्या मतमोजणीत वैभव माधवराव घाटे यांना 216 मते तर गौराबाई गायकवाड यांना 91 मध्ये

बिलोली तालुका बनला अवैध धंद्याचे माहेर घर.

बिलोली तालुका बनला अवैध धंद्याचे माहेर घर. नांदेड- वैभव घाटे बिलोली तालुक्यातील गंजगाव परिसरामध्ये अवैध धंद्याचे मोठ्या प्रमाणात उत आला आहे तसेच गंजगाव परिसरामध्ये विना परवाना देशी दारु मोठ्या प्रमाणात विकली जात आहे. तरी संबधितांनी या प्रकरणी कठोर पाउल उचलणे गरजेचे आहे. गंजगाव माचनुर या गावामध्ये देशी दारु विक्रीचा परवाना कोणत्याही विक्रेत्याकडे नसुन खुले आम पणे दारु विक्रीचा व्यवसाय जोमात चालु आहे बिलोली तालुक्यात हातपंपाना कमी पाणी येत आसेल पण तालुक्यात दारु त्यापेक्षाही जास्त विकली जात आहे. यांचा मोठा परिणाम गावातील तरुण वर्गावर होत आहे . यांचा सर्वात जास्त ञास महिलांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे . गल्लो गल्ली मोठ्या प्रमाणात वाठ झाल्याने गावातील शांतता लोप पावत आहे. या दारुड्या लोकांमुळे गल्लो गल्लीत गोंधळाचे वातावरण राहात असल्याने त्यांच्या बालकांच्या मनावर विपरित परिणाम होत आहे. महिलांना या गोष्टींचा नाहक ञास मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. या गोष्टींकडे राज्य उत्पादन शुल्क विभाग अर्थपुर्ण दुर्लक्ष करित आहे तरी संबंधित विभागाचे अधिकारी गांभिर्याने दखल घेवु

वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण प्रकरणी संस्कृती संवर्धन मंडळाच्या चेअरमनवर गुन्हा दाखल

वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण प्रकरणी संस्कृती संवर्धन मंडळाच्या चेअरमनवर गुन्हा दाखल *पहिल्याच टप्प्यात पाच एकर जमीन ताब्यात* बिलोली-  (शिवराज भायनुरे )  बिलोली तालुक्यात नावलौकिक असलेल्या सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळाच्या चेअरमनवर वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण केल्याच्या कारणावरून वन विभागाने गुन्हा दाखल करून 5 एकर जमीन ताब्यात घेतली आहे वन विभागाच्या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे संस्कृती संवर्धन मंडळाकडून वन अधिकार्‍यांवर राज्य पातळीवरील तबाव टाकण्याचा प्रकार चालू असल्याची माहिती समोर येत आहे बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील सर्वे नंबर 530 मध्ये वन विभागाची जवळपास 171 हेक्टर जमीन असल्याची माहिती आहे वन विभागाच्या जवळपास 15 एकर जमिनीवर अतिक्रमण केले असल्याचे स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आहेत संस्कृती संवर्धन शिक्षण मंडळाने येथील वन विभागाच्या जमीनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असल्याची बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष शंकर महाजन यांनी लेखी तक्रारीद्वारे वन विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती एकीकडे 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' चा नारा देत &#