मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर १५, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _______

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _________________________ मुंबई  - नंदु नाईक सांगलीत ऐन दिवाळीमध्ये ट्रक उलटून झालेल्या अपघातात दहा मजुरांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्तकेली जात आहे. एसटीच्या संपामुळे खाजगी वाहतुकीने प्रवास करणं मजुरांच्या जीवावर बेतल्याचं म्हटलं जात आहे. तासगांव-कवठेमहांकाळ मार्गावर योगेवाडी गावाजवळ पहाटे 2 ते 3 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. एसटी कर्मचाऱ्यांनी सकाळी संप मागे घेतला, मात्र काल एसटी बंद असल्यामुळे खाजगी ट्रक मधून कर्नाटक मधील काही मजूर कराडकडे मजुरीसाठी जात होते. योगेवाडी गावाजवळ चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक उलटला. ट्रकमधील फरशीखाली सापडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी आहेत. जखमींना मिरजेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताच्या वेळी ट्रक मध्ये 18 ते 20 प्रवासी होते. त्यामुळे ट्रकखाली आणखी काही प्रवासी अडकल्याची  भीती व्यक्त केली जात आहे.

भाजपा सरकारला वटणीवर आणण्यासाठी एस टी कामगारांचा स्मार्टसंप राजकीय खेळीतुन काँग्रेसचा पाठींबा ?

भाजपा सरकारला वटणीवर आणण्यासाठी एस टी कामगारांचा स्मार्टसंप राजकीय खेळीतुन काँग्रेसचा पाठींबा ? नायगाव प्रतिनिधी - माधव पवार राज्यातले सरकार असो की केंद्रातले सतेवर असल्याच्या नंतर फार मोठी जवाबदारी असते परंतु महाराष्ट्रातील एस टी कामगार दिनांक १६ ऑक्टोंबरच्या मध्यरात्री पासून संपावर गेल्यामुळे नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गासह अन्य ठिकाणच्या रस्त्यावर वहाणाऱ्या एस टी बसेस संपामुळे बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय झालीच परंतु लाखो रुपयाचे नुकसान सुध्दा ऐन दीपावलीच्या मुहूर्तावर झाल्याने त्यांचा फटका अखेर जनतेला बसणार असलातरी सदरच्या संपामुळे भाजपा सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी एस टी कामगाराने स्मार्ट संप पुकारला असल्याचे जनतेतुन बोलल्या जात असून सन २००४ ते २००६ या कालावधीत तत्कालीन परिवहन मंत्री तथा नांदेडचे सध्याचे खासदार अशोकराव चव्हाण हे होते त्यांच्या कार्यकाळात कसल्याच प्रकारचा स्मार्ट संप झाला नसल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष तथा उपसरपंच  घुंगराळा वसंत सुगावे. बालाजी मदेवाड सरपंच ( बरबडा ) माजी सरपंच नागनाथ हांनमते राज्य परिवहन मंडळात एकूण ३२ वर्ष सेवा क
*एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप, प्रवाशांचे हाल.*   *मुंबई - प्रतिनिधी*  वेतनवाढीच्या मागणीवरून राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाला मध्यरात्रीपासून सुरूवात झाली आहे. ऐन सनासुदीत राज्यभर एसटी सेवा बंद झाल्याने प्रवाशांचे हाल होण्यास सुरूवात झालीय. मुंबईत परळ डेपोतून मध्यरात्री सुटणाऱ्या गाड्या बाहेर पडल्या नाहीत. त्यामुळे दिवाळीनिमित्त गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांना मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. पुण्याच्या स्वारगेट आगारातून देखील एकही एसटी बाहेर पडलेली नाही. सर्व गाड्या आगारातच उभ्या आहेत. एसटी कर्मचारी आगारात जमले असून अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस देखील दाखल झाले आहेत. बसस्थानक व आगारांमध्ये वाहनांचे नुकसान होऊ नये, कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडविले जाऊ नये यासाठी पोलिसांची मदत घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच, सर्व एसटी आगार व स्थानकांमध्ये होणाऱ्या सर्व घटनांचे चित्रि‌‌करणही करण्यात येणार आहे. वेतनवाढीच्या मुद्द्यावरून एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली होती. त्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडण

नायगाव तालुक्यात नैसर्गिक अपत्तीचे थैमान खैरगावात वीज पडून एक ठार तर पत्नी व मुलगा जखमी आणि दुसऱ्या घटनेत दोन बैलासह मोर ईकळीचा केशव जखमी .

नायगाव तालुक्यात नैसर्गिक अपत्तीचे थैमान खैरगावात वीज पडून एक ठार तर पत्नी व मुलगा जखमी आणि दुसऱ्या घटनेत दोन बैलासह मोर ईकळीचा केशव जखमी . नायगाव - माधव पवार नायगाव तालुक्यात दररोज नैसर्गिक आपत्तीने  थैमान घातले असून दिनांक १५  ऑक्टोंबर रोजी दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या दरम्यान तालुक्यासह रुई बु परिसरात आवकाळी पावसाने मेघ गर्जनेसह पाऊस पडल्याने त्यात वीज कोसळुन खैरगाव येथील एका शेतात मयत व्यंकट भाऊराव कल्याण वय ४८ वर्ष हे जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी सौ गिरजाबाई व्यंकट कल्याण वय ४५ वर्ष आणि त्यांचा मुलगा प्रदीप व्यंकट कल्याण वय २७ वर्ष हे जखमी झाल्याने नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते असी माहीती नायगावचे तहसीलदार श्रीमती सुरेखाताई नांदे यांनी दिली असून  दुसऱ्या घटनेतील दुगाव तालुका बिलोली येथील रहिवासी असलेला शेतकरी नारायण किशनराव शिंदे यांचे शेतं कौठाळा तालुका नायगाव या शिवरात असलेल्या आपल्या शेतात बैल लिंबाच्या झाडाला बांधून त्यानी शेतात असलेल्या टीनापत्राच्या झोपडीत बसला असताना त्यांचा साठ हजारांचा बैल वीज पडून मरण पावला तर तिसऱ्या घटनेत मोरईकळ

बाबासाहेबांचा लढा हा जातीअंताचा होता...प्रकल्पाधिकारी सुजाता पोहरे.

बाबासाहेबांचा लढा हा जातीअंताचा होता...प्रकल्पाधिकारी सुजाता पोहरे. बिलोली - वैभव घाटे  डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे अंतर्गत समतादूत प्रकल्पाच्या माध्यमातून मौजे चिंचाळा ता.बिलोली येथे धम्मचक्रप्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. बार्टीचे महासंचालक डॉ.राजेश धाबरे यांच्या संकल्पनेतून मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे मँडम आणि औरंगाबाद विभागीय प्रकल्प संचालक डॉ.श्रीकांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली धम्मचक्रप्रवर्तन दिन साजरा करण्याबाबत जिल्हानिहाय नियोजन देण्यात आले होते. बार्टीचे  समतादूत नांदेड जिल्हा प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे मँडम यांच्या उपस्थिती आणि मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत आणि जि.प.प्रा.शाळा यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे सुंदर नियोजन करण्यात आले.बिलोली तालुक्याच्या वतीने कार्यक्रमाची सुरुवात ही  सकाळी समता प्रभातफेरीने झाली.समता प्रभात फेरीच्या माध्यमांतून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म स्वीकारण्यामागची कारणमीमांसा स्पष्ट करण्यात आली.त्यानंतर मुक्ति कोण पथे या पुस्तकांचे वाचन करून बुद्धवंदना घेण्यात आली. तथागत गौतम बुद्ध आणि डॉ.बाबास