मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर १२, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
गुत्तेदार व बांधकाम विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात बिलोली तहसील समोर दुगाने चे  अमरण उपोषण सुरु. बिलोली प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड अंतर्गत चालू असलेल्या बिलोली ते देगलूर दरम्यान रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम विलास पाटील टाकळीकर यांच्या लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कडून गेल्या अनेक महिन्यांपासून चालू आहे.मात्र हे काम पूर्णपणे बोगस व निकृष्ट दर्जाचे होत आहे.याची कल्पना तीन महिन्यापूर्वी पासून उपोषणकर्ते  संविधान दुगाने यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला लेखी तक्रार देऊन रस्त्यांच्या चौकशीची मागणी केली होती.मात्र या तक्रारी अर्जाला केराची टोपली दाखवत बांधकाम विभागाने संबधित गूत्तेदाराला पाठीशी घातल्याचा आरोप दुगाणेनी केला आहे.      एकीकडे खड्डेमुक्त रस्ते  व अपघाताचे प्रमाण कमी करू पाहणाऱ्या महाराष्ट्र शासन व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना आगामी दोन वर्षासाठीे खड्डेमुक्त रस्ता हे अभियान राबवावे लागेल यात शंका नाही.कारण बिलोली- देगलूर हा राज्य महामार्ग असून हा रस्ता आंध्र,तेलंगण व कर्नाटक राज्यांना जोड़नारा दुवा मानला जातो.मात्र या

भविष्यात अपघाताचे माहेरघर बनेल बिलोली देगलूर महामार्ग-संविधान दुगाने

🚦 भविष्यात अपघाताचे माहेरघर बनेल बिलोली देगलूर महामार्ग-संविधान दुगाने         नांदेड प्रतिनिधी आंध्र,तेलंगणा व कर्नाटक राज्यांना जोडणारा हा रस्ता भविष्यात म्रुत्यूचा सापळा बनेल.अस वक्तव्य ट्वीटर या सोशल मीडियावर वारणेचा वाघ सामाजिक संघटनेच्या संविधान दुगाने यांनी केल आहे.  श्री.विलास पाटील टाकळीकर यांच्या लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कडून बिलोली ते आदमपूर या दरम्यान 16 किमी रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम चालू आहे मात्र हे काम इस्टिमेन्ट नुसार ठरवून दिलेल्या निकषांनुसार होतय का हे पहाण्यासाठी कुठल्याही राजकीय,अराजकिय पुढारी लोकांना व शासकीय बांधकाम अभियंत्याला वेळ नाही हे मात्र निश्चित.कारण ह्या रस्त्यावर दोन वर्षाच्या आत मोठ-मोठे खड्डे पडतील का तर या कामात मुरुमा ऐवजी काळी माती व लाल मातीचा वापर तर गिट्टि सुद्धा धूळरहित वापरली गेली आहे.आणि धूळ रहित गिट्टिचा वापर केल्याने रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता हे समजने मात्र कठिन जाणार आहे.     दूसरी महत्वपूर्ण बाब म्हणजे या रस्त्यात येणारे जे पूल आहेत ते सीमेंट कॉन्क्रेटचे बांधण्या ऐवजी यात मोठ मोठ्या दगडांचा सर्रास वापर केला गेला आहे.पा