मुख्य सामग्रीवर वगळा

नागरिकांनो महाराष्ट्र पोलीस सिटीझन पोर्टल ॲपचा वापर करा - धबडगे




बिलोली :- वैभव घाटे
‘महाराष्ट्र पोलीस सिटीझन पोर्टल ॲप’ मुळे सामान्य नागरिक अधिक सक्षम तर पोलीस प्रशासनास काम करण्यास मोठी मदत मिळणार आहे त्यामुळे नागरिकांनी आपल्या स्मार्ट फोनमध्ये हा अँप डाऊनलोड करून या अँपच्या माध्यमातून गुन्हे विषयक कोणताही रेकार्ड ऑनलाईन पाहणे, ऑनलाईन तक्रार दाखल करणे, तपासाची स्थिती जाणून घेणे या बाबी सहज उपलब्ध होणार आहेत त्यामुळे या अँप चा मोठ्या प्रमाणात प्रसार करावे असे आदेश पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मिना यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय  पोलिस कार्यालय व पोलिस ठाणे यांना पत्रकाद्वारे कळविले होते. पोलिस अधिक्षकांनी दिलेल्या आदेशाचे पालन करत बिलोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे व पोलिस अधिक्षक यांनी या अँपचे जास्तीतजास्त नागरिकांनी "महाराष्ट्र पोलिस सिटीझन पोर्टल अँप" चा वापर करावे असे अवाहन केले आहे.
महाराष्ट्रात गुन्ह्यांचा आलेख कमी करण्यासाठी पोलीस प्रशासन वेगवेगळया उपाययोजना राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे मोबाईल ॲप पोलीस विभागाने विकसित केले आहे. महाराष्ट्र सारख्या मोठया राज्यासाठी हे काम अतिशय कठीण होते. मात्र पोलीस विभागाच्या अथक प्रयत्नांनी हे ॲप विकसित करण्यासाठी यश मिळाले आहे. आता नागरिकांना ऑनलाईन तक्रार केल्यानंतर त्याचा ईलेक्ट्रानिक पुरावा त्यांच्याकडे राहणार आहे. त्यामुळे पोलिसांनी तक्रार नोंदविली नाही अशी सबब सांगता येणार नाही. वेगवेगळया तंत्रज्ञानाचा उपयोग करुन पोलीस विभागाला पुढे नेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याचा उपयोग लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी होणार आहे. सीसीटीएनएस प्रणाली राबणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. यामुळे गुन्ह्याचा तपास, पुरावे शोधणे व गोळा करणे, माहिती गोळा करणे व साठवणे सहज शक्य होणार आहे.

*असा आहे ॲप*

 Maharashtra Police Citizen Portal सदर ॲप गुगल प्ले स्टोअर तसेच ॲप स्टोअर मधून डाऊनलोड करु शकता. या मोबाईल ॲपमध्ये नोंदणी करुन नागरिक ई-तक्रार देणे, पोलीस स्टेशनला माहिती देणे, प्रकाशित प्रथम खबर पाहणे, तक्रारीची सद्यस्थिती पाहणे, अटक आरोपीची माहिती पाहणे, अनोळखी मृतदेहाची माहिती पाहणे, हरवलेल्या इसमाची माहिती पाहणे आदीचा लाभ घेऊ शकता. ई-तक्रार केल्यानंतर तक्रारदारास त्याचा एसएमएस व ई मेल प्राप्त होतो. त्यामध्ये तक्रारींचा क्रमांक व तक्रार कोणत्या पोलीस ठाण्यात देण्यात आली, याची माहिती देण्यात येते. तक्रारीच्या चौकशीसाठी चौकशी अधिकारी नेमल्यानंतर, तक्रारीची निर्गती केल्यानंतर तक्रारीवर काय कार्यवाही झाली, याची माहितीसुध्दा एसएमएसव्दारे तक्रारदारास देण्यात येते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _______

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _________________________ मुंबई  - नंदु नाईक सांगलीत ऐन दिवाळीमध्ये ट्रक उलटून झालेल्या अपघातात दहा मजुरांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्तकेली जात आहे. एसटीच्या संपामुळे खाजगी वाहतुकीने प्रवास करणं मजुरांच्या जीवावर बेतल्याचं म्हटलं जात आहे. तासगांव-कवठेमहांकाळ मार्गावर योगेवाडी गावाजवळ पहाटे 2 ते 3 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. एसटी कर्मचाऱ्यांनी सकाळी संप मागे घेतला, मात्र काल एसटी बंद असल्यामुळे खाजगी ट्रक मधून कर्नाटक मधील काही मजूर कराडकडे मजुरीसाठी जात होते. योगेवाडी गावाजवळ चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक उलटला. ट्रकमधील फरशीखाली सापडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी आहेत. जखमींना मिरजेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताच्या वेळी ट्रक मध्ये 18 ते 20 प्रवासी होते. त्यामुळे ट्रकखाली आणखी काही प्रवासी अडकल्याची  भीती व्यक्त केली जात आहे.

आंदोलकांवर दाखल केलेली गुन्हे तात्काळ मागे घ्या-इंडियन पँथर् सेना..!

बिलोली प्रतिनिधी - वैभव घाटे भीमाकोरेगाव येथे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या व असावध असलेल्या भिमसैनिकांवर काही मनुवादी पिलावळीच्या लोकांकडून जीवघेणा भ्याड हल्ला झाला.यात एका भीमसैनिकाचा जागीच म्रुत्यू झाला तर हजारो लोकांना किरकोळ जखमा झाल्या.याचा निषेध म्हणून भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.बाळासाहेब आंबेडकरांनी 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली.        काही ठिकाणचा अपवाद वगळता हा बंद शांततेत झाला.तरी पोलीसांकडून अतिसंवे दनशील भागात कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले.आणि यात हजारो निष्पाप तरुण व महिलांना घरात शिरून मारण्यात आल.यात हदगाव येथील जाधव कुटुंबाने आपला 15 वर्षाचा मुलगा गमावला.सरकारच्या सांगण्यावरून पोलीस प्रशासन भीम सैनिकांच्या जीवावर बेतले असून कल्याण कोळसेवाडी येथील 48 व इतर 92 आंदोलकांवर कलम 307 हा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला.यावेळी पत्रकारांशी बोलतांना संविधान दुगाने म्हणाले की,मला पोलीस प्रशासनाने याचे उत्तर द्यावे की 2012 पासून आज पर्यंत किती बंद पाळण्यात आले?आजपर्यंत किती आंदोलकांवर गुन्हे दाखल ...
गुत्तेदार व बांधकाम विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात बिलोली तहसील समोर दुगाने चे  अमरण उपोषण सुरु. बिलोली प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड अंतर्गत चालू असलेल्या बिलोली ते देगलूर दरम्यान रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम विलास पाटील टाकळीकर यांच्या लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कडून गेल्या अनेक महिन्यांपासून चालू आहे.मात्र हे काम पूर्णपणे बोगस व निकृष्ट दर्जाचे होत आहे.याची कल्पना तीन महिन्यापूर्वी पासून उपोषणकर्ते  संविधान दुगाने यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला लेखी तक्रार देऊन रस्त्यांच्या चौकशीची मागणी केली होती.मात्र या तक्रारी अर्जाला केराची टोपली दाखवत बांधकाम विभागाने संबधित गूत्तेदाराला पाठीशी घातल्याचा आरोप दुगाणेनी केला आहे.      एकीकडे खड्डेमुक्त रस्ते  व अपघाताचे प्रमाण कमी करू पाहणाऱ्या महाराष्ट्र शासन व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना आगामी दोन वर्षासाठीे खड्डेमुक्त रस्ता हे अभियान राबवावे लागेल यात शंका नाही.कारण बिलोली- देगलूर हा राज्य महामार्ग असून हा रस्ता आंध्र,तेलंगण व कर्नाटक राज्यांना जोड़न...