मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर २६, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

त्यात्या वंचित शेतकऱ्यांसाठी आ. कडुंना दिले निवेदन लेंडी प्रकल्पावर विस्तृत केली चर्चा मुखेड प्रतिनिधी :-०३

            मुखेड  प्रतिनिधी :- बिलोली टाईम्स न्युज नेटवर्क                     परीसरातील अनेक गावातील सन२०१६-१७ यामध्ये ४०० च्या जवळपास शेतकऱ्यांनी स्टेट बँक आँफ इंडिया या बँकेत रितसर पध्दतीने प्रधानमंञी पिकविमा योजना भरले होते . पण अध्यापर्यत त्या वंचित शेतकऱ्यांचा पिकविम्याचा लाभ मिळालाच नाही . या वंचित शेतकऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटुन आपले व्यथा मांडले , याच अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दि२४ रोजी लाक्षणिक उपोषण केले. तरी या मुजोर प्रशासनाने कोणतेच उत्तर देत नाही. यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आ. बच्चु कडू यांची भेट घेऊन मुखेड तालुका प्रमुख मन्मथ खंकरे, ता.सरचिटणीस निखील कोयलकोंडेवार , निखील गोगा, अविनाश जाधव यांनी भेट घेऊन विस्तृत चर्चा केली...            मुक्रमाबाद येथील गेल्या ३५ ते ४० वर्षापासुन  रखडीत असलेल्या लेंडी धरणा संदर्भात , अगोदर पुणर्वसन नंतर धरण , व परीसरातील अनेक गावांचे झालेले पुणर्वसन संदर्भात यासह अनेक प्रलंबित विषयावर विधानसभेत आवाज उठवणार असे आ.बच्चु कडू यांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांना सांगितले ...            और

कांगठी येथे संविधान दिन साजरा संविधान म्हणजे भारतीयांचा श्वास :- पत्रकार गौतम वाघमारे

बिलोली प्रतिनिधी कांगठी - भारतीय घटनेचे महत्व व त्याचा जनजागर करत मौजे कांगठी येथे संविधान दिन साजरा करण्यात आला . संविधानकार डॉ बाबासाहेब आंबेडकर व संविधानाचे पुष्पपुजन करून उद्देशिकेचे समुहवाचन करण्यात आले . ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना पत्रकार गौतम वाघमारे म्हणाले की भारतीय घटना ही सर्व भारतीयीचा श्वास आहे जसे जगण्यासाठी श्वासाचे महत्व आहे तसेच घटनेचे भारतास महत्व आहे . घटनेचा अभ्यास आणि अनिवार्यता समजूनच आपण भारतीय नागरिक म्हणून ओळख निर्माण करू शकतो . कार्यक्रमासाठी ग्राम पंचायत सदस्य शेषेराव वाघमारे विठ्ठल वाघमारे बाळाजी वाघमारे दत्ता संभाजी व अनेक विद्यार्थी तथा ग्रामस्थ उपस्थित होते

महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघ बिलोली व तुकाराम सुर्यवंशी बहुउद्देशिय संस्था च्या संयुक्त विद्यमाने सभापती निवास प्रांगणात संविधान दिन मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला

बिलोली : डी.टी.सुर्यवंशी समस्त विश्वाला आदर्शवत व अनेक राष्ट्रांनी संदर्भ म्हणून स्विकृत अशा भारतीय संविधानाचा गौरव दिन म्हणून अधिकारी ; पत्रकार व संविधान प्रेमी नागरिकांच्या उपस्थितित पार पडला . डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस अथक परिश्रम करून संविधानरुपी शिल्प राष्ट्रास अर्पण केले . भारतात असणारी विविधता व विषमतेचा अभ्यास करून सुवर्णमध्य साधला . न्याय स्वातंत्र्य समता व बंधुतेचा जागर करून मानवी दरी संपवणारी व प्रत्येक नागरिकाला प्रतिष्ठा व ओळख विधिवत उपलब्ध करणारे संविधान हे समस्त भारतीय जणांसाठी आदरणीय आहे . सदर ग्रंथराजाचा यथोचित सन्मान त्यात मिळालेल्या अधिकाराचे संगोपण व संवर्धन होणे हे या दिनाचे महत्व आहे . कार्यक्रमाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर व संविधान ग्रंथाचे पुष्पपुजन करून करण्यात आले व संविधानाच्या उद्देशिकेचे प्रकटवाचन करण्यात आले . ह्यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मत मांडुन प्रबोधन केले . कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान पोलिस निरिक्षक भगवान धबडगे नी भूषविले . कार्यक्रमास महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाचे सुनिल कदम मारोती भदरगे मारोती भालेराव सं

बिलोलीत भारीपच्या वतीने संविधान गौरव दिन साजरा. संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करून डॉ.बाबासाहेबांना अभिवादन.....!

बिलोली प्रतिनिधी  ज्यांना वर्गात बसून शिकण्याची मुभा नव्हती ज्यांच्या सावलीचाही विँटाळ मानला जायचा त्याच युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी भारताला जगातील सर्वश्रेष्ठ संविधान 2 वर्ष 11 महीने आणि 17 दिवसाच्या कालावधीत पूर्ण करून 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाला बहाल केला.तोच दिवस संविधान गौरव दिन म्हणून संपूर्ण देशभरात साजरा करून डॉ.बाबासाहेबांना अभिवादन या दिवशी करतात.   यावेळी जाणीव पूर्वक प्रशासनातील पदाधिकाऱ्याना पाचारण करण्यात आले होते.यावेळी पोलिस निरीक्षक मा.भगवान धबडगे,सपोनी सोमनाथ शिंदे,नायब तहसीलदार मा.मामिड्वार यांना पाचारण करण्यात आले होते.कारण डॉ.बाबासाहेब म्हणाले होते की,संविधान कितीही चांगले असो ते राबवनाऱ्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते जर प्रामाणिक असतील तर संविधान चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही.पण या उलट जर संविधान राबवणारे जर अप्रामाणिक असतील तर वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही.म्हणून प्रशासनातील अधिकारी व सत्ताधारी लोकाना पाचारण भारीप बहुजन महासंघ ता.बिलोलीने केले होते.      या कार्यक्रमासाठि भारीपचे जिल्हा प्रवक्ता डॉ.प्रा.बलभीम वाघमारे,बिलोलीचे माजी नगराध्यक्ष भी