मुख्य सामग्रीवर वगळा

ग्रामसेवक एस.बी.मठमवार यांना निलंबित करण्याची मागणी... भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप... उचित कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा



ग्रामसेवक एस.बी.मठमवार यांना निलंबित करण्याची मागणी...
भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप...
   उचित कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा
नांदेड - वैभव घाटे
        नांदेड जिल्हापरिषदेअंतर्गत येणाऱ्या बिलोली तालुक्यातील बडुर येथे कार्यरत असणारे ग्रामसेवक एस.बी मठमवार हे बडुर व्यतिरिक्त मौजे बामणी व पोखर्णि ह्या ठिकाणी देखील ग्रामविकास अधिकारी म्हणून काम पाहतात.अकार्यक्षम,उर्मट बोली,व भ्रष्ट अधिकारी म्हणून त्यांची प्रतिमा आहे.
         सगरोळी सर्कलमधील बडुर हे मोठे गण मानल्या जाते.पाच हजाराच्या वर लोकसंख्या असलेल्या गावात विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात भ्रष्ट व मनमानी कारभार चालू असून याकडे गटविकास अधिकाऱ्याने लक्ष देण्याची गरज असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.हा त्यांचा भ्रष्ट कारभार संविधान दुगाने यांनी दि.14 जुलै रोजी मागितलेल्या माहिती अधिकारामुळे उघडकिस आला  आहे.ती माहिती जनअपीलीय अधिकाऱ्याकडे तक्रार केल्यानंतरच त्यांनी दिली आहे.ग्रामपंचायत कार्यायालयाकडून मिळणारे रहिवासी व इतर प्रमाणपत्रासाठी संबधीत अधिकाऱ्याने अडवणुक केल्यामुळे अनेकांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.कित्येक जणांना शासनाच्या विविध योजनांना मुकावे लागले आहे.यावरून ग्रामसेवकाच्या  अकार्यक्षमतेची जवळून प्रचिती येते.चौदाव्या वित्त आयोगाचा निधी,व राजस्व स्त्रोतात वाढ करण्याच्या द्रुष्टीने जमा केलेला कर हडप केल्याचा आरोप ग्रामसेवकावर करण्यात आला आहे.कारण त्यांनी दिलेली माहितीमध्ये खूप अस्पष्टपणा असून समोरच्या व्यक्तीला उमजूच नये हा त्या पाटिमागचा उद्देश असावा.दीवाबत्ती आणि पाणी पुरवठा फक्त या दोन बाबीसाठी 7 लाख 82 हजार रुपये खर्च झाल्याची माहिती त्यानी दिली आहे.ज्या डिजिटल बल्बची किंमत बाजारात हजार ते बाराशे रुपये आहे त्याची किंमत ग्रामसेवकाच्या शासकीय दस्तऐवजावर मात्र तब्बल सहा हजार चारशे रुपये आहे.त्याच बरोबर गावातील अनेक गोर गरीब व मागास लोकांकडून प्लॉट नावावर करण्यासाठी पैसे उकळल्याची चर्चा मागे स्वातंत्र्य दिनानिमित्त घेण्यात आलेल्या ग्रामसभेत झाली आहे.इतक्या मोठ्याप्रमात लूट चालू असल्याची पूर्व कल्पना असूनही याकडे लक्ष देण्यासाठी कुठल्याच अधिकाऱ्याकडे वेळ नाही का ? हा प्रश्न उपस्थित होत आहे. या बाबतची प्रासंगिक  माहिती बिलोली गटविकास अधिकारी यू.डी राहाटिकर यांना वारणेचा वाघ संघटनेच्या संविधान दुगाने यांनी लेखी निवेदनाद्वारे देऊन तात्काळ चौकशीची मागणी केली होती.
परंतु या पंधरवाढ्यात कोणतीच कारवाई न झाल्याने काल 5 तारखेला दिलेल्या लेखी निवेदना द्वारे संविधान दुगाने यांनी नांदेड जिल्हापरिषद कार्लायालयासमोर  बेमूदत आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _______

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _________________________ मुंबई  - नंदु नाईक सांगलीत ऐन दिवाळीमध्ये ट्रक उलटून झालेल्या अपघातात दहा मजुरांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्तकेली जात आहे. एसटीच्या संपामुळे खाजगी वाहतुकीने प्रवास करणं मजुरांच्या जीवावर बेतल्याचं म्हटलं जात आहे. तासगांव-कवठेमहांकाळ मार्गावर योगेवाडी गावाजवळ पहाटे 2 ते 3 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. एसटी कर्मचाऱ्यांनी सकाळी संप मागे घेतला, मात्र काल एसटी बंद असल्यामुळे खाजगी ट्रक मधून कर्नाटक मधील काही मजूर कराडकडे मजुरीसाठी जात होते. योगेवाडी गावाजवळ चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक उलटला. ट्रकमधील फरशीखाली सापडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी आहेत. जखमींना मिरजेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताच्या वेळी ट्रक मध्ये 18 ते 20 प्रवासी होते. त्यामुळे ट्रकखाली आणखी काही प्रवासी अडकल्याची  भीती व्यक्त केली जात आहे.

आंदोलकांवर दाखल केलेली गुन्हे तात्काळ मागे घ्या-इंडियन पँथर् सेना..!

बिलोली प्रतिनिधी - वैभव घाटे भीमाकोरेगाव येथे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या व असावध असलेल्या भिमसैनिकांवर काही मनुवादी पिलावळीच्या लोकांकडून जीवघेणा भ्याड हल्ला झाला.यात एका भीमसैनिकाचा जागीच म्रुत्यू झाला तर हजारो लोकांना किरकोळ जखमा झाल्या.याचा निषेध म्हणून भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.बाळासाहेब आंबेडकरांनी 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली.        काही ठिकाणचा अपवाद वगळता हा बंद शांततेत झाला.तरी पोलीसांकडून अतिसंवे दनशील भागात कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले.आणि यात हजारो निष्पाप तरुण व महिलांना घरात शिरून मारण्यात आल.यात हदगाव येथील जाधव कुटुंबाने आपला 15 वर्षाचा मुलगा गमावला.सरकारच्या सांगण्यावरून पोलीस प्रशासन भीम सैनिकांच्या जीवावर बेतले असून कल्याण कोळसेवाडी येथील 48 व इतर 92 आंदोलकांवर कलम 307 हा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला.यावेळी पत्रकारांशी बोलतांना संविधान दुगाने म्हणाले की,मला पोलीस प्रशासनाने याचे उत्तर द्यावे की 2012 पासून आज पर्यंत किती बंद पाळण्यात आले?आजपर्यंत किती आंदोलकांवर गुन्हे दाखल ...
गुत्तेदार व बांधकाम विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात बिलोली तहसील समोर दुगाने चे  अमरण उपोषण सुरु. बिलोली प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड अंतर्गत चालू असलेल्या बिलोली ते देगलूर दरम्यान रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम विलास पाटील टाकळीकर यांच्या लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कडून गेल्या अनेक महिन्यांपासून चालू आहे.मात्र हे काम पूर्णपणे बोगस व निकृष्ट दर्जाचे होत आहे.याची कल्पना तीन महिन्यापूर्वी पासून उपोषणकर्ते  संविधान दुगाने यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला लेखी तक्रार देऊन रस्त्यांच्या चौकशीची मागणी केली होती.मात्र या तक्रारी अर्जाला केराची टोपली दाखवत बांधकाम विभागाने संबधित गूत्तेदाराला पाठीशी घातल्याचा आरोप दुगाणेनी केला आहे.      एकीकडे खड्डेमुक्त रस्ते  व अपघाताचे प्रमाण कमी करू पाहणाऱ्या महाराष्ट्र शासन व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना आगामी दोन वर्षासाठीे खड्डेमुक्त रस्ता हे अभियान राबवावे लागेल यात शंका नाही.कारण बिलोली- देगलूर हा राज्य महामार्ग असून हा रस्ता आंध्र,तेलंगण व कर्नाटक राज्यांना जोड़न...