मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर १९, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीय संविधानातच देव सापडेल.!सोनू दरेगावकर*

नायगाव:- प्रतिनिधी       *तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा दरेगाव येथे 26 नोहेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संविधानाच्या प्रस्ताविकेच वाचन करून संविधान दिन साजरा करण्यात आला.* *त्यावेळी 26/11 च्या झालेल्या दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.त्यावेळी साहित्यिक सोनू दरेगावकर यांच्याकडून विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून शालेय साहित्य देण्यात आले.* कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सोनू दरेगावकर म्हणाले भारतीय संविधान हे भारत देशाने तर मान्य केलेच आहे परंतु आज जगाला सुध्दा भारतीय संविधानाची गरज पडत आहे.कारण माणूस हा माणूस म्हणून जगला पाहिजे त्याच्या पुढे कुठली जात येता कामा नये. एखादया माणसावर जर अन्याय झाला तर तो अन्याय त्याच्यावरचा दूर होण्यास संविधानाची गरज भासते म्हणून भारतीय संविधान प्रत्येक नागरिकांनी वाचले पाहीजे. संविधानातच देव सापडेल असेही सोनू दरेगावकर म्हणाले. पुढे प्रस्ताविकात शाळेचे मुख्याध्यापक माधव मोरे सर म्हणाले की, लाखो दलित दिनदुबळ्याना जे मान-सन्मान  मिळतो.ते केवळ ड

सगरोळीत बजरंग दल भरती आभियानास उत्सुर्फत प्रतिसाद

सगरोळीत बजरंग दल भरती आभियानास उत्सुर्फत प्रतिसाद तालुका प्रतिनिधी  बिलोली- देविदास कोंडलाडे दि.22 नोव्हेंबर रोजी बिलोली तालुक्यातील सगरोळी विश्व हिंदू परिषद - बजरंग दल भरती आभियानास मराठवाड्यात प्रारंभ झाला असून या आभियानास दि.19 नोव्हें ते 6 डिंसे 2017 पर्यत चालणार आहे.तरी सगरोळीत आभियानास प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याची माहीती विहिप धर्म प्रसार जिल्हा प्रमुख विठ्ठल तुकडेकर यांनी दिली. प्रसिद्धीस दिलेल्या पञकात म्हटले की, 1964 साली विविध पंथ - संप्रदायाच्या धर्माचार्यानी एकत्र येऊन हिंदू समाजाला संघटित करण्यासाठी विश्व हिंदू  परिषदेची स्थापना झाली.1980 नंतर सुरू झालेले अयोध्येच्या रामजन्मभुमी मुक्तीचे आंदोलन हा विश्व हिंदू परिषदेच्या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा होता.त्या दरम्यान अनेक संघर्षाचे प्रसंगही उध्वभू लागले त्या प्रसंगाना सामोरे जाण्यासाठी अर्थातच युवाशक्ती संघटित होणे आवश्यक होते. त्यामुळे रामजन्मभुमी मुक्ती आंदोलनात सहभागी असलेल्या युवकांनी संतांच्या मार्गदर्शनाखाली 1984 साली बजरंग दलाची स्थापना केली.     अखिल भारतीय अधिवेशनात गाय नही फटने देंगें, देश नही फटने देंगेंच्य

सगरोळी फाटा ते टाकळी फाटा रस्त्यावरील खड्डे* बुजविण्याचे काम निकृष्ठ.

सगरोळी फाटा ते टाकळी फाटा रस्त्यावरील खड्डे* बुजविण्याचे काम निकृष्ठ.  बिलोली प्रतिनिधी रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे आदेश शासनाने जाहीर करताच सगरोळी फटा ते टाकळी फाटा देगलुर रोड वरील खड्डे बुजविण्याचे काम सुरु केले आहे. सद्या रस्त्यावरील खड्ड्याचा प्रश्न चर्चीला जात आहे.राज्यमार्ग व जिल्हा मार्ग व अन्य रस्त्याची दैनीय आवस्था झाल्याच्या तक्ररी मोठया प्रमानात केल्या गेल्या होत्या. खड्ड्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या बाबीचे गांभिर्याने घेत शासनाने 15 डिसेंबर पर्यंत रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे आदेश दिले. सगरोळी फटा हा तेलंगाणा व महाराष्ट राज्याला जोडनारा रस्ता आगदी सिमे लगद असुन तो देगलुर मार्ग कर्नाटक , बिदर कडे जणारा राज्य क्रंमाकाचा रस्ता असुन खड्डे बुजविण्याचे काम मोठ्या प्रमानात सुरु आहे. मात्र हे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे करण्यात येत असल्याने या कामाकडे वरिष्ठानी लक्ष देउन रस्त्याचे काम दर्जेदार करावे अशी मागणी सगरोळी परिसरातील जनतेतुन होत आहे. या रस्त्याच्या  अनेकदा संबधिताचे लक्ष वेधले आहे. परिणामी रानवळकरानी या रस्त्याचे काम हाती घेतले आहे. काम चांगले करुन घेन्यात त

सगरेळी येथील पशुवैद्यकीय अधिकारी एच .के.तोडे वा-यावर .

सगरेळी येथील पशुवैद्यकीय  अधिकारी एच .के.तोडे वा-यावर .  बिलोली प्रतिनिधी  बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे पशुवैद्दकिय दवाखाना असुन या ठिकाणी पशुवैद्दकिय अधीकारी म्हणुन डॉ.एच.के.तोडे याची नियुक्ती करण्यात आली असुन ते गेल्या सहा महिण्या पासुन बेपता असुन सदरिल पशुवैद्दकिय दवाखाना नेहमी बंद राहत असल्यामुळे अनेक समस्याच्या विळाख्यात सापडला आहे.या पशुवैद्दकिय दवाखाण्यात जणावराना वैद्दकिय उपचारासाठी सगरोळीसह ,केसराळी,रामपुर,हिप्परगाथडी,शिंपाळा,दैलतापुर,बोळेगांव या गांवातील शेतकरी जणावराना उपचारासाठी येथे आणतात.माञ येथे पञाचा शेड सुद्धा उपलब्ध नाही उपचार करताना जणावराना बाधण्यासाठी केवळ एक तेही जीर्ण झालेले लोखंडी कठडे आहे.येथे जर उपचार करण्यासाटी जास्त जणावरे आली तर शेतक-याना ताटकळत उभे राहावे लागते एक तर हा पशुवैद्दकिय दवाखाना तेलंगाणा व महाराष्ट सिमेच्या राज्य मार्गावर असुन या पशुवैद्यकिय दवाखान्याची पशुअधिकारी वीना अत्यंत दैनि अवस्था झालीअाहे पशुवैद्किय दवाखान्यावरील टीनसेडला छिद्रे पडली आहेत.तर खिडक्या तुटल्या आहेत.आणि फरर्शीना तडे जात असल्यामुळे फर्शी दबली जाऊन दवाखाण्यातील फर्शी उ

*लाच घेणा-या महिला गृहपालास रंगेहाथ पकडले

* लाच घेणा-या महिला गृहपालास रंगेहाथ पकडले*   * नांदेड :-  वैभव घाटे*  मेसचे बिल मंजूर करण्यासाठी गृहपाल किशोरी अलोने यांना २० हजाराची लाच स्वीकारताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. हदगाव येथील समाज कल्याण विभागाच्या मुलीच्या वसतिगृहात त्या कार्यरत असून याच ठिकाणी त्यांना पकडण्यात आले.     हदगाव येथे समाज कल्याण विभागाचे मुलींचे वसतिगृह आहे. येथे ८ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थिनी राहत असून किशोरी अलोने या गृहपाल आहेत. वसतिगृहात कार्यरत असलेल्या खानावळीचे बिल काढताना विद्यार्थिनी उपस्थिती योग्य भरावी भरावी लागते. हि बाब लक्षात घेऊन अलोने यांनी मेस चालकाची अडवणूक करत विद्यार्थिनी उपस्थिती योग्य भरण्यासाठी २० हजार रुपयाची मागणी केली. यानंतर मेस चालकाने याबाबत नांदेड एसीबी कडे तक्रार केली. तक्रारीची शहानिशा करत आज सकाळी ११ वाजता नांदेड एसीबी ने शासकीय वसतिगृह परिसरात सापळा रचला. यावेळी अलोने या मेस चालकाकडून २० हजाराची लाच स्वीकारताना एसिबी च्या जाळ्यात अडकल्या.     याप्रकरणात हदगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा सापळा पोलीस अधीक्षक संजय ला

इसीसच्या नावाने नांदेड च्या एस.पी.ला मेल पाठविणार्‍या जालना येथील युवकास अटक.

इसीसच्या नावाने नांदेड च्या एस.पी.ला मेल पाठविणार्‍या जालना येथील युवकास अटक.   *नांदेड प्रतिनिधी* येथील जिल्हा पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मिणा यांना इसीस संघटनेच्या नावाने मेल पाठविणार्‍या जालना येथील एका युवकास दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. जालना येथील युसुफ कॉलनी भागात राहणार्‍या तज्जमुल खान अजिज खान याने दि. 14 नोव्हेंबर रोजी जिल्हा पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मिणा यांना मी इसीस संघटनेचा सदस्य असून मला अटक करा अशा आशयाचा ईमेल पाठविला होता.  या ईमेलच्या अनुषंगाने दहशतवाद विरोधी पथकाने जालना येथे जावून तज्जमुल खान अजिज खान या युवकाला अटक केली. या प्रकरणी अधिक चौकशी केली असता. तज्जमुल खान अजिज खान याचे जालना येथे कोल्ड्रींक्सचे दुकान आहे. त्याच्या काही मित्रांनी लग्न मोडले.  तर लग्नाच्या या विषयावरून त्याला नेहमी मानसिक त्रास देत असल्याने मित्रांचा बदला घ्यावा या उद्देशाने तज्जमुल खान अजिज खान याने मित्राच्या नावाने नांदेड जिल्हा पोलीस अधिक्षकांना मेल पाठविल्याचे उघड झाले आहे.