मुख्य सामग्रीवर वगळा

भविष्यात अपघाताचे माहेरघर बनेल बिलोली देगलूर महामार्ग-संविधान दुगाने



🚦भविष्यात अपघाताचे माहेरघर बनेल बिलोली देगलूर महामार्ग-संविधान दुगाने 

       नांदेड प्रतिनिधी
आंध्र,तेलंगणा व कर्नाटक राज्यांना जोडणारा हा रस्ता भविष्यात म्रुत्यूचा सापळा बनेल.अस वक्तव्य ट्वीटर या सोशल मीडियावर वारणेचा वाघ सामाजिक संघटनेच्या संविधान दुगाने यांनी केल आहे.
 श्री.विलास पाटील टाकळीकर यांच्या लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कडून बिलोली ते आदमपूर या दरम्यान 16 किमी रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम चालू आहे मात्र हे काम इस्टिमेन्ट नुसार ठरवून दिलेल्या निकषांनुसार होतय का हे पहाण्यासाठी कुठल्याही राजकीय,अराजकिय पुढारी लोकांना व शासकीय बांधकाम अभियंत्याला वेळ नाही हे मात्र निश्चित.कारण ह्या रस्त्यावर दोन वर्षाच्या आत मोठ-मोठे खड्डे पडतील का तर या कामात मुरुमा ऐवजी काळी माती व लाल मातीचा वापर तर गिट्टि सुद्धा धूळरहित वापरली गेली आहे.आणि धूळ रहित गिट्टिचा वापर केल्याने रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता हे समजने मात्र कठिन जाणार आहे.
    दूसरी महत्वपूर्ण बाब म्हणजे या रस्त्यात येणारे जे पूल आहेत ते सीमेंट कॉन्क्रेटचे बांधण्या ऐवजी यात मोठ मोठ्या दगडांचा सर्रास वापर केला गेला आहे.पाण्याच्या ओघाणे जर ही पुलं वाहून गेली तर भविष्यात खूप मोठी जीवित हानि होऊ शकते ही हानि टाळण्यासाठी रस्ता व पूल मजबूत बनवणे काळाची गरज आहे अस मत दुगाने नी व्यक्त केल आहे.
     रस्त्याच्या या गंभीर समस्येसाठी वारणेचा वाघ ही सामाजिक संघटना नांदेड जिल्ह्यात जागरूक असून कंत्राटदाराची मनमानी इथे खपवून घेतली जाणार नाही.बांधण्यात आलेली सर्व निकृष्ट पूल पाडून ते नव्याने बांधण्यात यावेत,पूर्वी अद्यावत असलेला रस्ता पूर्ण उकरून मजबूत बनवण्यात यावा.जागोजागी सावधान काम प्रगतीपथावर आहे.अशा पद्धतीच्या प्रवाशांना सावध करणाऱ्या पाट्या लावण्यात यावेत.जेणेकरून अपघात होनार नाहीत.उर्वरित काम शासकीय अभियंता व समितीच्या देखरेखीखाली निकषांनुसार पूर्ण करण्यात यावे.या मागणीसाठी खूप मोठ जन आंदोलन उभारण्यात येईल अस ही ते म्हणाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _______

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _________________________ मुंबई  - नंदु नाईक सांगलीत ऐन दिवाळीमध्ये ट्रक उलटून झालेल्या अपघातात दहा मजुरांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्तकेली जात आहे. एसटीच्या संपामुळे खाजगी वाहतुकीने प्रवास करणं मजुरांच्या जीवावर बेतल्याचं म्हटलं जात आहे. तासगांव-कवठेमहांकाळ मार्गावर योगेवाडी गावाजवळ पहाटे 2 ते 3 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. एसटी कर्मचाऱ्यांनी सकाळी संप मागे घेतला, मात्र काल एसटी बंद असल्यामुळे खाजगी ट्रक मधून कर्नाटक मधील काही मजूर कराडकडे मजुरीसाठी जात होते. योगेवाडी गावाजवळ चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक उलटला. ट्रकमधील फरशीखाली सापडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी आहेत. जखमींना मिरजेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताच्या वेळी ट्रक मध्ये 18 ते 20 प्रवासी होते. त्यामुळे ट्रकखाली आणखी काही प्रवासी अडकल्याची  भीती व्यक्त केली जात आहे.

आंदोलकांवर दाखल केलेली गुन्हे तात्काळ मागे घ्या-इंडियन पँथर् सेना..!

बिलोली प्रतिनिधी - वैभव घाटे भीमाकोरेगाव येथे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या व असावध असलेल्या भिमसैनिकांवर काही मनुवादी पिलावळीच्या लोकांकडून जीवघेणा भ्याड हल्ला झाला.यात एका भीमसैनिकाचा जागीच म्रुत्यू झाला तर हजारो लोकांना किरकोळ जखमा झाल्या.याचा निषेध म्हणून भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.बाळासाहेब आंबेडकरांनी 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली.        काही ठिकाणचा अपवाद वगळता हा बंद शांततेत झाला.तरी पोलीसांकडून अतिसंवे दनशील भागात कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले.आणि यात हजारो निष्पाप तरुण व महिलांना घरात शिरून मारण्यात आल.यात हदगाव येथील जाधव कुटुंबाने आपला 15 वर्षाचा मुलगा गमावला.सरकारच्या सांगण्यावरून पोलीस प्रशासन भीम सैनिकांच्या जीवावर बेतले असून कल्याण कोळसेवाडी येथील 48 व इतर 92 आंदोलकांवर कलम 307 हा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला.यावेळी पत्रकारांशी बोलतांना संविधान दुगाने म्हणाले की,मला पोलीस प्रशासनाने याचे उत्तर द्यावे की 2012 पासून आज पर्यंत किती बंद पाळण्यात आले?आजपर्यंत किती आंदोलकांवर गुन्हे दाखल ...
गुत्तेदार व बांधकाम विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात बिलोली तहसील समोर दुगाने चे  अमरण उपोषण सुरु. बिलोली प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड अंतर्गत चालू असलेल्या बिलोली ते देगलूर दरम्यान रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम विलास पाटील टाकळीकर यांच्या लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कडून गेल्या अनेक महिन्यांपासून चालू आहे.मात्र हे काम पूर्णपणे बोगस व निकृष्ट दर्जाचे होत आहे.याची कल्पना तीन महिन्यापूर्वी पासून उपोषणकर्ते  संविधान दुगाने यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला लेखी तक्रार देऊन रस्त्यांच्या चौकशीची मागणी केली होती.मात्र या तक्रारी अर्जाला केराची टोपली दाखवत बांधकाम विभागाने संबधित गूत्तेदाराला पाठीशी घातल्याचा आरोप दुगाणेनी केला आहे.      एकीकडे खड्डेमुक्त रस्ते  व अपघाताचे प्रमाण कमी करू पाहणाऱ्या महाराष्ट्र शासन व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना आगामी दोन वर्षासाठीे खड्डेमुक्त रस्ता हे अभियान राबवावे लागेल यात शंका नाही.कारण बिलोली- देगलूर हा राज्य महामार्ग असून हा रस्ता आंध्र,तेलंगण व कर्नाटक राज्यांना जोड़न...