मुख्य सामग्रीवर वगळा


गुत्तेदार व बांधकाम विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात बिलोली तहसील समोर दुगाने चे  अमरण उपोषण सुरु.


बिलोली प्रतिनिधी
सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड अंतर्गत चालू असलेल्या बिलोली ते देगलूर दरम्यान रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम विलास पाटील टाकळीकर यांच्या लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कडून गेल्या अनेक महिन्यांपासून चालू आहे.मात्र हे काम पूर्णपणे बोगस व निकृष्ट दर्जाचे होत आहे.याची कल्पना तीन महिन्यापूर्वी पासून उपोषणकर्ते  संविधान दुगाने यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला लेखी तक्रार देऊन रस्त्यांच्या चौकशीची मागणी केली होती.मात्र या तक्रारी अर्जाला केराची टोपली दाखवत बांधकाम विभागाने संबधित गूत्तेदाराला पाठीशी घातल्याचा आरोप दुगाणेनी केला आहे.
     एकीकडे खड्डेमुक्त रस्ते  व अपघाताचे प्रमाण कमी करू पाहणाऱ्या महाराष्ट्र शासन व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना आगामी दोन वर्षासाठीे खड्डेमुक्त रस्ता हे अभियान राबवावे लागेल यात शंका नाही.कारण बिलोली- देगलूर हा राज्य महामार्ग असून हा रस्ता आंध्र,तेलंगण व कर्नाटक राज्यांना जोड़नारा दुवा मानला जातो.मात्र या रस्त्यांच्या रुंदीकरणाच्या कामात मूरूमा ऐवजी लाल माती व काळी मातीचा तसेच धूळरहित गिट्टिचा वापर केला आहे.त्या मार्गात येणाऱ्या पुलात सीमेंट कोन्क्रेट ऐवजी मोठ-मोठ्या दगडाचा वापर यात केला आहे.यामुळे या रस्त्यावर भविष्यात मोठ-मोठे खड्डे पडून अपघात व जीवित हानीची शक्यता नाकारता येणार नाही.अशा निकृष्ट कामामुळे वर्षानुवर्ष राज्यशासनाला खड्डे बूजविण्याचे अभियान राबवावे लागेल.भविष्यात मांजरा नदी पात्रातून कर्नाटक राज्यात बिलोली मार्गे केली जाणारी रेती वाहतूक यामुळे आणखी रस्त्याच्या समस्येत भर पडणार आहे.परिणामी याचा त्रास देगलूर- बिलोली मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणार आहे.त्यासाठी रस्ता मजबूत व टिकाऊ बनविने काळाची गरज आहे.पण प्रत्यक्षात मात्र बांधकाम विभागाचा अनागोंदी कारभार काही वेगळाच आहे.
त्यामुळे वारणेचा वाघ सामाजिक संघटनेच्या संविधान दुगाने यांनी गुत्तेदारांचा मनमानी कारभार व बांधकाम विभागाकडून जाणीवपूर्वक होत असलेल्या दुर्लक्षपनामुळे निकृष्ट कामाला गती मिळाली आहे.सदरील बाबींच्या निषेधार्थ बिलोली तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.प्रामुख्याने पुढील मागण्यांचा समावेश निवेदनात करण्यात आला आहे.बिलोली-देगलूर मार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरनाचे निकृष्ट काम तात्काळ कायमस्वरुपी बंद करण्यात यावे.गूत्तेदार विलास पाटील टाकळीकर यांना अटक करण्यात यावे.या मार्गावर बांधण्यात आलेली सर्व निकृष्ट पूल तोडण्यात यावे.उर्वरित काम शासकीय कंत्राट दाराकडुन पूर्ण करून द्यावे.आदि मागण्यांचा समावेश यात करण्यात आला आहे.

टिप्पण्या

  1. गंजगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंती उत्सहात साजरी करण्यात आली

    सगरोळी - गंजगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंती उत्सहात साजरी करण्यात आली आहे
    या वेळी सरपंच सौ. साविञाबाई माधवराव घाटे यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर महाराजांच्या फोटोला पुजा करण्यात आलीआहे यावेळी ग्रा.पं. सदस्य वैभव घाटे गंगाधर श्रीगीरे मालीक पाटील सोसायटी चेअरमन माणीक बासरे मारोती जाधव भगवान घाटे बाबाराव तोटलवार आप्पाराव जाधव सुमनबाई कनशेटे माधवराव शिवशेटे इत्यादीची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सुञसंचालन बाबाराव तोटलवार याने केले तर आभार प्रदर्शन ग्रा.पं. सदस्य वैभव घाटे यानी माणले

    उत्तर द्याहटवा
  2. गंजगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंती उत्सहात साजरी करण्यात आली

    सगरोळी - गंजगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंती उत्सहात साजरी करण्यात आली आहे
    या वेळी सरपंच सौ. साविञाबाई माधवराव घाटे यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर महाराजांच्या फोटोला पुजा करण्यात आलीआहे यावेळी ग्रा.पं. सदस्य वैभव घाटे गंगाधर श्रीगीरे मालीक पाटील सोसायटी चेअरमन माणीक बासरे मारोती जाधव भगवान घाटे बाबाराव तोटलवार आप्पाराव जाधव सुमनबाई कनशेटे माधवराव शिवशेटे इत्यादीची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सुञसंचालन बाबाराव तोटलवार याने केले तर आभार प्रदर्शन ग्रा.पं. सदस्य वैभव घाटे यानी माणले

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _______

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _________________________ मुंबई  - नंदु नाईक सांगलीत ऐन दिवाळीमध्ये ट्रक उलटून झालेल्या अपघातात दहा मजुरांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्तकेली जात आहे. एसटीच्या संपामुळे खाजगी वाहतुकीने प्रवास करणं मजुरांच्या जीवावर बेतल्याचं म्हटलं जात आहे. तासगांव-कवठेमहांकाळ मार्गावर योगेवाडी गावाजवळ पहाटे 2 ते 3 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. एसटी कर्मचाऱ्यांनी सकाळी संप मागे घेतला, मात्र काल एसटी बंद असल्यामुळे खाजगी ट्रक मधून कर्नाटक मधील काही मजूर कराडकडे मजुरीसाठी जात होते. योगेवाडी गावाजवळ चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक उलटला. ट्रकमधील फरशीखाली सापडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी आहेत. जखमींना मिरजेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताच्या वेळी ट्रक मध्ये 18 ते 20 प्रवासी होते. त्यामुळे ट्रकखाली आणखी काही प्रवासी अडकल्याची  भीती व्यक्त केली जात आहे.

आंदोलकांवर दाखल केलेली गुन्हे तात्काळ मागे घ्या-इंडियन पँथर् सेना..!

बिलोली प्रतिनिधी - वैभव घाटे भीमाकोरेगाव येथे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या व असावध असलेल्या भिमसैनिकांवर काही मनुवादी पिलावळीच्या लोकांकडून जीवघेणा भ्याड हल्ला झाला.यात एका भीमसैनिकाचा जागीच म्रुत्यू झाला तर हजारो लोकांना किरकोळ जखमा झाल्या.याचा निषेध म्हणून भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.बाळासाहेब आंबेडकरांनी 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली.        काही ठिकाणचा अपवाद वगळता हा बंद शांततेत झाला.तरी पोलीसांकडून अतिसंवे दनशील भागात कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले.आणि यात हजारो निष्पाप तरुण व महिलांना घरात शिरून मारण्यात आल.यात हदगाव येथील जाधव कुटुंबाने आपला 15 वर्षाचा मुलगा गमावला.सरकारच्या सांगण्यावरून पोलीस प्रशासन भीम सैनिकांच्या जीवावर बेतले असून कल्याण कोळसेवाडी येथील 48 व इतर 92 आंदोलकांवर कलम 307 हा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला.यावेळी पत्रकारांशी बोलतांना संविधान दुगाने म्हणाले की,मला पोलीस प्रशासनाने याचे उत्तर द्यावे की 2012 पासून आज पर्यंत किती बंद पाळण्यात आले?आजपर्यंत किती आंदोलकांवर गुन्हे दाखल ...

वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण प्रकरणी संस्कृती संवर्धन मंडळाच्या चेअरमनवर गुन्हा दाखल

वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण प्रकरणी संस्कृती संवर्धन मंडळाच्या चेअरमनवर गुन्हा दाखल *पहिल्याच टप्प्यात पाच एकर जमीन ताब्यात* बिलोली-  (शिवराज भायनुरे )  बिलोली तालुक्यात नावलौकिक असलेल्या सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळाच्या चेअरमनवर वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण केल्याच्या कारणावरून वन विभागाने गुन्हा दाखल करून 5 एकर जमीन ताब्यात घेतली आहे वन विभागाच्या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे संस्कृती संवर्धन मंडळाकडून वन अधिकार्‍यांवर राज्य पातळीवरील तबाव टाकण्याचा प्रकार चालू असल्याची माहिती समोर येत आहे बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील सर्वे नंबर 530 मध्ये वन विभागाची जवळपास 171 हेक्टर जमीन असल्याची माहिती आहे वन विभागाच्या जवळपास 15 एकर जमिनीवर अतिक्रमण केले असल्याचे स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आहेत संस्कृती संवर्धन शिक्षण मंडळाने येथील वन विभागाच्या जमीनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असल्याची बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष शंकर महाजन यांनी लेखी तक्रारीद्वारे वन विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती एकीकडे 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' चा नारा देत ...