मुख्य सामग्रीवर वगळा

बिलोली तालुका ग्रामसेवक संघटनेच्या सचिव पदी अरुण जमदाडे यांची निवड* बिलोली तालुका प्रतिनिधी/नागेश इबितवार


बिलोली तालुका प्रतिनिधी/नागेश इबितवार

येथिल पंचायत समितीच्या सभागृहात आज दि.२ डिसेंबर रोजी तालुका ग्रामसेवक संघटनेच्या महत्वपुर्ण प्रलंबित  पदाच्या नुतन कार्यकारणी निवडी संदर्भात जिल्हाकार्यध्यक्ष धनजय पाटील वडजे यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक  आयोजीत करण्यात आली होती .सदर बैठकीत  सर्वानुमते  नुतन तालुका कार्यकारणीची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आसुन यामध्ये तालुका  सचिव पदी अरुण जमदाडे याची तर  कार्याध्यक्षपदी मुरली उत्तरवाड व उपाध्यक्ष  तानाजी पाटील हांडे , उपाध्यक्ष सौ. कनकावार मॕडम , संघटक - सुवर्णकार तर कोषाध्यक्ष पदी " निवडी करण्यात आल्या आसुन या वेळी ग्रामसेवक जि.व्ही. ईबिते , देवराव हंबिरे ,सुनिल हाळदेवाड, शिवाजी शिंदे , संदिप मोरे , झरे,श्रीहरी खतगावे , यु.टी.जाधव, किनवाड , डि.एल. वाघमारे , व्हि.वडजे ,बोधले ,हाणमंत  आंबेराव  यांच्यासह आनेकांची उपस्थिती होती.गेल्या काही महीण्यापुर्वी  श्रिनिवास पाटील मुगावे यांची तालुका अध्यक्ष म्हणुन बिनविरोध निवड करण्यात आली होती.तर उर्वरीत नुतन कार्यकारणी निवडी  काही कारणास्तव प्रलंबित होत्या  त्या प्रलबित पदाच्या निवडी आज दि.२ डिसेंबर  रोजी आयोजित बैठकीत  सर्वानुमते खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध जाहीर करण्यात आल्या आसुन सदर नवनियुक्त पदाधिका-यांचे उपसभापती शंकरराव व्यंकम पञकार  राजु पाटील ,पांडुरग रामपुरे, दतु पाटील माडे,गोविंद मगदुरे, सुभाष काळे,यांच्यासह  विविध क्षेञातील मान्यवरांकडुन अभिनंदन करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बिलोली तहसिलचा सैराट कारभार सुरुच.

बिलोली तहसिलचा सैराट कारभार सुरुच.  बिलोली प्रतिनिधी- वैभव घाटे  गेल्या अनेक दिवसांपासून बिलोली तहसिल कार्यालयातील कर्मचारी निवासी न राहता नांदेड सारख्या शहरात राहून येजा करीत असल्याने तहसिल कार्यालयाचे अनेक कामे वेळेत होत नसल्यामुळे जनतेची कामे खोळंबत असल्याने पत्रकार  संरक्षण समिती  बिलोली च्या वतिने विभागीय अधिकारी बिलोली यांना निवेदन देण्यात आले. बिलोली तहसिल कार्यालयाचे तहसिलदार विनोद गुंडमवार हे बिलोली तहसिल येथे रुजू झाल्यापासून आजतागायत तहसील कार्यालयात नांदेड येथून ये-जा करीत आहेत. याचेच अनुकरण नायब तहसीलदार हे देखील नांदेड येथून ये-जा करित असुन मुख्यालया राहत नसूनही शासनाकडून घरभाडे उचल करीत शासनाची दिशाभूल करीत आहेत याचाच अर्थ उंटावरुन शेळ्या हाकण्यासारखा कारभार सदरील तहसील कर्मच्यार्यांचा झाला आहे. यामुळे तालुक्यातील निराधार, विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर व बिलोली तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीचा प्रसंग उद्भवल्यास याला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न तहसिलदार ये-जा करीत आसल्या कारणांमुळे अनेक कामे खोळंबत असल्याने जनतेची गैरसोय होत आहे.  बिलोली तालुक्यातील जनतेची गैरसोय दुर क

*लाच घेणा-या महिला गृहपालास रंगेहाथ पकडले

* लाच घेणा-या महिला गृहपालास रंगेहाथ पकडले*   * नांदेड :-  वैभव घाटे*  मेसचे बिल मंजूर करण्यासाठी गृहपाल किशोरी अलोने यांना २० हजाराची लाच स्वीकारताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. हदगाव येथील समाज कल्याण विभागाच्या मुलीच्या वसतिगृहात त्या कार्यरत असून याच ठिकाणी त्यांना पकडण्यात आले.     हदगाव येथे समाज कल्याण विभागाचे मुलींचे वसतिगृह आहे. येथे ८ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थिनी राहत असून किशोरी अलोने या गृहपाल आहेत. वसतिगृहात कार्यरत असलेल्या खानावळीचे बिल काढताना विद्यार्थिनी उपस्थिती योग्य भरावी भरावी लागते. हि बाब लक्षात घेऊन अलोने यांनी मेस चालकाची अडवणूक करत विद्यार्थिनी उपस्थिती योग्य भरण्यासाठी २० हजार रुपयाची मागणी केली. यानंतर मेस चालकाने याबाबत नांदेड एसीबी कडे तक्रार केली. तक्रारीची शहानिशा करत आज सकाळी ११ वाजता नांदेड एसीबी ने शासकीय वसतिगृह परिसरात सापळा रचला. यावेळी अलोने या मेस चालकाकडून २० हजाराची लाच स्वीकारताना एसिबी च्या जाळ्यात अडकल्या.     याप्रकरणात हदगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा सापळा पोलीस अधीक्षक संजय ला

नागरिकांनो महाराष्ट्र पोलीस सिटीझन पोर्टल ॲपचा वापर करा - धबडगे

बिलोली :- वैभव घाटे ‘महाराष्ट्र पोलीस सिटीझन पोर्टल ॲप’ मुळे सामान्य नागरिक अधिक सक्षम तर पोलीस प्रशासनास काम करण्यास मोठी मदत मिळणार आहे त्यामुळे नागरिकांनी आपल्या स्मार्ट फोनमध्ये हा अँप डाऊनलोड करून या अँपच्या माध्यमातून गुन्हे विषयक कोणताही रेकार्ड ऑनलाईन पाहणे, ऑनलाईन तक्रार दाखल करणे, तपासाची स्थिती जाणून घेणे या बाबी सहज उपलब्ध होणार आहेत त्यामुळे या अँप चा मोठ्या प्रमाणात प्रसार करावे असे आदेश पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मिना यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय  पोलिस कार्यालय व पोलिस ठाणे यांना पत्रकाद्वारे कळविले होते. पोलिस अधिक्षकांनी दिलेल्या आदेशाचे पालन करत बिलोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे व पोलिस अधिक्षक यांनी या अँपचे जास्तीतजास्त नागरिकांनी "महाराष्ट्र पोलिस सिटीझन पोर्टल अँप" चा वापर करावे असे अवाहन केले आहे. महाराष्ट्रात गुन्ह्यांचा आलेख कमी करण्यासाठी पोलीस प्रशासन वेगवेगळया उपाययोजना राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे मोबाईल ॲप पोलीस विभागाने विकसित केले आहे. महाराष्ट्र सारख्या मोठया राज्यासाठी हे काम अतिशय कठीण होते. मात्र पोलीस विभागाच