मुख्य सामग्रीवर वगळा

आरोग्य कर्मचाऱ्यांची प्रश्न सोडण्यासाठी वज्रमुठ राज्य समन्वय समिती स्थापन आरोग्य विभागातील २२ कर्मचारी संघटना एकत्रित राज्य समन्वय समिती स्थापन आरोग्य विभागातील २२ कर्मचारी संघटना एकत्रित

आरोग्य कर्मचाऱ्यांची प्रश्न सोडण्यासाठी वज्रमुठ

राज्य समन्वय समिती स्थाप

जिल्हा प्रतिनिधी
नांदेड

वारंवार पाठपुरावा करुनही प्रश्न सुटत सुटत नसल्यामुळे व मागण्या प्रलंबित मान्य करुन घेण्यासाठी राज्यातील सर्व आरोग्य कर्मचारी संघटना यांचा एकञित मेळावा घेवुन या सर्व संघटना एकञीतपणे येवुन महाराष्ट्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांची एक समिती स्थापन करण्यात आली.आता या सर्व संघटना एकञितपणे *शासकीय निमशासकीय आरोग्य सेवा कर्मचारी समन्वय समिती* या समिती अंतर्गत काम करण्याचे एकमताने ठरण्यात आले.
याबाबतीत सविस्तर वृत्त असे कि महाराष्ट्रातील आरोग्य सेवेतील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संघटना या वेगवेगळ्या पद्धतीने शासनाकडे  कर्मचाऱ्यांच्या  विविध प्रश्न मांडले पण शासन यास काहीही प्रतिसाद देत नव्हते.या सर्व बाबी पाहुन अशोक जयसिंगपुरे यांनी सर्व आरोग्य कर्मचारी संघटनाना बोलुन एकञीकरणासाठी पाठपुरावा करत होते. व यासाठी दि.२६ नोव्हेंबर रोजी मुंबईला बैठक ठेवली.सर्व संघटना यांनी सकारात्मक प्रतिसाद देत एकञित येत राज्य आरोग्य कर्मचारी समन्वय समिती स्थापन करण्यात आली.
 यावेळी अशोक जयसिंगपुरे यांनी सर्व कर्मचारी यांचे स्वागत करुन या एकञीकरणा मागील भुमिका मांडली तर प्रास्ताविक दिलीप उटाणे हे केले.गेले दहा वर्षापासुन शासनाकडे मागण्या करुन ही यश येत नसल्यामुळे सर्व कर्मचारी संघटना एकञीपणे आंदोलन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.
शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या नागपुर अधिवेशनात मोर्चा काढण्याचा ठराव मान्य करुन समन्वय समितीने मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन केले..
याच बैठकित समन्वय समितीचे मुख्य समन्वयक  म्हणुन अशोक जयसिंगपुरे तर राज्य प्रसिद्धी प्रमुख म्हणून सत्यजीत टिप्रेसवार (नांदेड ) यांची निवड करण्यात आली.
यावेळी दादरच्या भुपेश गुप्ता भवनमध्ये झालेल्या बैठकीत नाशिक सरकारी बँकेच्या उपाध्यक्ष पदी निवड झालेले कर्मचारी दिपक आहीरे यांचा सर्व मान्यवरांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या बैठकिला जिल्हा परीषद आरोग्य कर्मचारी संघटनेचे अरुण खरमाटे ,हिवताप कर्मचारी संघटनेचे बाजीराव कांबळे,हिवताप कर्मचारी संघटना चे  दामोदर पवार, कॉस्ट्राईब संघटनेचे एस टी गायकवाड,बहुजन आरोग्य कर्मचारी संघटनेचे काकासाहेब वाघमारे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संघटनेचे  बजरंग कदम, नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेचे नागनाथ दमकोंडवार परीचारीका संघटना चे सुरेखा आंधळेचे प्रतिनिधी,महानगर पालीका नर्सेस चे अमोलिक ज्योतीचे प्रतिनिधी , प्रविण चकुलेचे प्रतिनिधी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _______

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _________________________ मुंबई  - नंदु नाईक सांगलीत ऐन दिवाळीमध्ये ट्रक उलटून झालेल्या अपघातात दहा मजुरांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्तकेली जात आहे. एसटीच्या संपामुळे खाजगी वाहतुकीने प्रवास करणं मजुरांच्या जीवावर बेतल्याचं म्हटलं जात आहे. तासगांव-कवठेमहांकाळ मार्गावर योगेवाडी गावाजवळ पहाटे 2 ते 3 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. एसटी कर्मचाऱ्यांनी सकाळी संप मागे घेतला, मात्र काल एसटी बंद असल्यामुळे खाजगी ट्रक मधून कर्नाटक मधील काही मजूर कराडकडे मजुरीसाठी जात होते. योगेवाडी गावाजवळ चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक उलटला. ट्रकमधील फरशीखाली सापडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी आहेत. जखमींना मिरजेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताच्या वेळी ट्रक मध्ये 18 ते 20 प्रवासी होते. त्यामुळे ट्रकखाली आणखी काही प्रवासी अडकल्याची  भीती व्यक्त केली जात आहे.

आंदोलकांवर दाखल केलेली गुन्हे तात्काळ मागे घ्या-इंडियन पँथर् सेना..!

बिलोली प्रतिनिधी - वैभव घाटे भीमाकोरेगाव येथे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या व असावध असलेल्या भिमसैनिकांवर काही मनुवादी पिलावळीच्या लोकांकडून जीवघेणा भ्याड हल्ला झाला.यात एका भीमसैनिकाचा जागीच म्रुत्यू झाला तर हजारो लोकांना किरकोळ जखमा झाल्या.याचा निषेध म्हणून भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.बाळासाहेब आंबेडकरांनी 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली.        काही ठिकाणचा अपवाद वगळता हा बंद शांततेत झाला.तरी पोलीसांकडून अतिसंवे दनशील भागात कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले.आणि यात हजारो निष्पाप तरुण व महिलांना घरात शिरून मारण्यात आल.यात हदगाव येथील जाधव कुटुंबाने आपला 15 वर्षाचा मुलगा गमावला.सरकारच्या सांगण्यावरून पोलीस प्रशासन भीम सैनिकांच्या जीवावर बेतले असून कल्याण कोळसेवाडी येथील 48 व इतर 92 आंदोलकांवर कलम 307 हा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला.यावेळी पत्रकारांशी बोलतांना संविधान दुगाने म्हणाले की,मला पोलीस प्रशासनाने याचे उत्तर द्यावे की 2012 पासून आज पर्यंत किती बंद पाळण्यात आले?आजपर्यंत किती आंदोलकांवर गुन्हे दाखल ...
गुत्तेदार व बांधकाम विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात बिलोली तहसील समोर दुगाने चे  अमरण उपोषण सुरु. बिलोली प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड अंतर्गत चालू असलेल्या बिलोली ते देगलूर दरम्यान रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम विलास पाटील टाकळीकर यांच्या लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कडून गेल्या अनेक महिन्यांपासून चालू आहे.मात्र हे काम पूर्णपणे बोगस व निकृष्ट दर्जाचे होत आहे.याची कल्पना तीन महिन्यापूर्वी पासून उपोषणकर्ते  संविधान दुगाने यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला लेखी तक्रार देऊन रस्त्यांच्या चौकशीची मागणी केली होती.मात्र या तक्रारी अर्जाला केराची टोपली दाखवत बांधकाम विभागाने संबधित गूत्तेदाराला पाठीशी घातल्याचा आरोप दुगाणेनी केला आहे.      एकीकडे खड्डेमुक्त रस्ते  व अपघाताचे प्रमाण कमी करू पाहणाऱ्या महाराष्ट्र शासन व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना आगामी दोन वर्षासाठीे खड्डेमुक्त रस्ता हे अभियान राबवावे लागेल यात शंका नाही.कारण बिलोली- देगलूर हा राज्य महामार्ग असून हा रस्ता आंध्र,तेलंगण व कर्नाटक राज्यांना जोड़न...