मुख्य सामग्रीवर वगळा

पत्रकार तोष्णीवाल यांच्यावर झालेल्या हल्याचा बिलोली पञकार संघाच्या वतीने निषेध

पत्रकार तोष्णीवाल यांच्यावर झालेल्या हल्याचा बिलोली पञकार संघाच्या वतीने निषेध
-------------------------------------------------------------  बिलोली
    हिंगोली जिल्हा मराठी पञकार संघाचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी भ्याड हल्ला केला.या घटनेचा महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघ ता.बिलोलीच्या वतीने जाहिर निषेध करून हल्लेखोरांना तत्काळ अटक करण्याच्या मागणीचे निवेदन तहसिलदार बिलोली यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्याकडे पाठवले आले.
   हिंगोलीचे जेष्ठ पञकार व जिल्हा पञकार संघाचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांच्यावर दि.२३ आक्टोंबर रोजी अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक केला.हि घटना घडून ३ दिवस उलटले तरी पोलिसांना आरोपीस पकडण्यात अध्याप अश आले नाही.यामुळे तालुक्यातील पञकारांमध्ये संतापाची लाठ उसळली असून दिलेल्या निवेदनात आपल्या भावना प्रकट करून मा.मुख्यमंञी यांच्याकडे नायब तहसिलदार संजय नागमवाड यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.यावेळी पञकार संघाचे अध्यक्ष  राजेंद्र पा.शिंदे,संघाचे प्रमुख गोविंद मुंडकर,कार्याध्यक्ष बाबूराव इंगळे,उपाध्यक्ष माधव एडके,कोषाध्यक्ष बसवंत मुंडकर,यादव लोकडे,मकरंद बोधनकर,नागोराव लोलापोड,पी.जी गायकवाड,शेख मुर्तुजा यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य पञकार उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _______

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _________________________ मुंबई  - नंदु नाईक सांगलीत ऐन दिवाळीमध्ये ट्रक उलटून झालेल्या अपघातात दहा मजुरांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्तकेली जात आहे. एसटीच्या संपामुळे खाजगी वाहतुकीने प्रवास करणं मजुरांच्या जीवावर बेतल्याचं म्हटलं जात आहे. तासगांव-कवठेमहांकाळ मार्गावर योगेवाडी गावाजवळ पहाटे 2 ते 3 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. एसटी कर्मचाऱ्यांनी सकाळी संप मागे घेतला, मात्र काल एसटी बंद असल्यामुळे खाजगी ट्रक मधून कर्नाटक मधील काही मजूर कराडकडे मजुरीसाठी जात होते. योगेवाडी गावाजवळ चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक उलटला. ट्रकमधील फरशीखाली सापडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी आहेत. जखमींना मिरजेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताच्या वेळी ट्रक मध्ये 18 ते 20 प्रवासी होते. त्यामुळे ट्रकखाली आणखी काही प्रवासी अडकल्याची  भीती व्यक्त केली जात आहे.

आंदोलकांवर दाखल केलेली गुन्हे तात्काळ मागे घ्या-इंडियन पँथर् सेना..!

बिलोली प्रतिनिधी - वैभव घाटे भीमाकोरेगाव येथे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या व असावध असलेल्या भिमसैनिकांवर काही मनुवादी पिलावळीच्या लोकांकडून जीवघेणा भ्याड हल्ला झाला.यात एका भीमसैनिकाचा जागीच म्रुत्यू झाला तर हजारो लोकांना किरकोळ जखमा झाल्या.याचा निषेध म्हणून भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.बाळासाहेब आंबेडकरांनी 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली.        काही ठिकाणचा अपवाद वगळता हा बंद शांततेत झाला.तरी पोलीसांकडून अतिसंवे दनशील भागात कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले.आणि यात हजारो निष्पाप तरुण व महिलांना घरात शिरून मारण्यात आल.यात हदगाव येथील जाधव कुटुंबाने आपला 15 वर्षाचा मुलगा गमावला.सरकारच्या सांगण्यावरून पोलीस प्रशासन भीम सैनिकांच्या जीवावर बेतले असून कल्याण कोळसेवाडी येथील 48 व इतर 92 आंदोलकांवर कलम 307 हा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला.यावेळी पत्रकारांशी बोलतांना संविधान दुगाने म्हणाले की,मला पोलीस प्रशासनाने याचे उत्तर द्यावे की 2012 पासून आज पर्यंत किती बंद पाळण्यात आले?आजपर्यंत किती आंदोलकांवर गुन्हे दाखल ...

वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण प्रकरणी संस्कृती संवर्धन मंडळाच्या चेअरमनवर गुन्हा दाखल

वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण प्रकरणी संस्कृती संवर्धन मंडळाच्या चेअरमनवर गुन्हा दाखल *पहिल्याच टप्प्यात पाच एकर जमीन ताब्यात* बिलोली-  (शिवराज भायनुरे )  बिलोली तालुक्यात नावलौकिक असलेल्या सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळाच्या चेअरमनवर वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण केल्याच्या कारणावरून वन विभागाने गुन्हा दाखल करून 5 एकर जमीन ताब्यात घेतली आहे वन विभागाच्या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे संस्कृती संवर्धन मंडळाकडून वन अधिकार्‍यांवर राज्य पातळीवरील तबाव टाकण्याचा प्रकार चालू असल्याची माहिती समोर येत आहे बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील सर्वे नंबर 530 मध्ये वन विभागाची जवळपास 171 हेक्टर जमीन असल्याची माहिती आहे वन विभागाच्या जवळपास 15 एकर जमिनीवर अतिक्रमण केले असल्याचे स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आहेत संस्कृती संवर्धन शिक्षण मंडळाने येथील वन विभागाच्या जमीनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असल्याची बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष शंकर महाजन यांनी लेखी तक्रारीद्वारे वन विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती एकीकडे 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' चा नारा देत ...