मुख्य सामग्रीवर वगळा

नायगाव तालुक्यात नैसर्गिक अपत्तीचे थैमान खैरगावात वीज पडून एक ठार तर पत्नी व मुलगा जखमी आणि दुसऱ्या घटनेत दोन बैलासह मोर ईकळीचा केशव जखमी .

नायगाव तालुक्यात नैसर्गिक अपत्तीचे थैमान खैरगावात वीज पडून एक ठार तर पत्नी व मुलगा जखमी आणि दुसऱ्या घटनेत दोन बैलासह मोर ईकळीचा केशव जखमी .

नायगाव - माधव पवार
नायगाव तालुक्यात दररोज नैसर्गिक आपत्तीने  थैमान घातले असून दिनांक १५  ऑक्टोंबर रोजी दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या दरम्यान तालुक्यासह रुई बु परिसरात आवकाळी पावसाने मेघ गर्जनेसह पाऊस पडल्याने त्यात वीज कोसळुन खैरगाव येथील एका शेतात मयत व्यंकट भाऊराव कल्याण वय ४८ वर्ष हे जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी सौ गिरजाबाई व्यंकट कल्याण वय ४५ वर्ष आणि त्यांचा मुलगा प्रदीप व्यंकट कल्याण वय २७ वर्ष हे जखमी झाल्याने नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते असी माहीती नायगावचे तहसीलदार श्रीमती सुरेखाताई नांदे यांनी दिली असून  दुसऱ्या घटनेतील दुगाव तालुका बिलोली येथील रहिवासी असलेला शेतकरी नारायण किशनराव शिंदे यांचे शेतं कौठाळा तालुका नायगाव या शिवरात असलेल्या आपल्या शेतात बैल लिंबाच्या झाडाला बांधून त्यानी शेतात असलेल्या टीनापत्राच्या झोपडीत बसला असताना त्यांचा साठ हजारांचा बैल वीज पडून मरण पावला तर तिसऱ्या घटनेत मोरईकळी येथील रहिवासी असलेला केशव जयराम मोरे यांनी सुध्दा आपला बैल लिंबाच्या झाडाखाली बांधला असताना बैलावर वीज पडून अंदाजे पन्नास हजार रूपयाचा बैल ठार झाला तर केशव जयराम मोरे हा जखमी झाला असल्याची माहीती कुंटूर ठाण्याचे सपोनी विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जेमादार निकम् . नाईकवाडे . मठपती  यानी माहीती दिली असून सदर जखमी युवकाला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे
    तालुक्यातील हिप्परगा येथे दिनांक १४ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान १७ वर्षाचा मुलगा ज्ञानेश्वर संभाजी कदम हा वीज पडल्याने जखमी झाला होता तर त्यांच्या बैल ठार झाला होता  तालुक्यातील मौजे हिप्परगा येथील रहिवासी असलेले शेतकरी संभाजी दतराम पाटील कदम यांनी आपल्या शेतात कामा निमित्त बैल घेवुन गेला होता तर गणेश इरन्ना पाटील कदम यांची गाय वीज पडून ठार झाली होती सदरची नैसर्गिक आपत्ती अचानक कोसळत असल्याने नायगाव तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले असून सध्या सोयाबीन काढण्याचे काम चालु असून रानात गेलेल्या महिला वर्ग चांगलेच धास्तावले आहेत दिनांक १५ ऑक्टोंबर रोजी दुपारी ठीक दोन तीन वाजण्याच्या दरम्यान पूर्वेकडून ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि एका क्षणात आभाळातील ढग गर्जना करू लागले पावसासह विजेचा कडकडाट होवून या वेगवेगळया घटनेत नैसर्गिक आपत्ती कोसळल्याचे जनतेतुन बोलल्या जात असून सदर नायगाव तालुक्यात दररोज पावसाने थैमान घालून जनावरासह माणसाचे प्राण घेत आहेत असी चर्चा होत असली तरी नायगाव तालुक्यात चांगलेच पावसाने थैमान घातले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _______

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _________________________ मुंबई  - नंदु नाईक सांगलीत ऐन दिवाळीमध्ये ट्रक उलटून झालेल्या अपघातात दहा मजुरांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्तकेली जात आहे. एसटीच्या संपामुळे खाजगी वाहतुकीने प्रवास करणं मजुरांच्या जीवावर बेतल्याचं म्हटलं जात आहे. तासगांव-कवठेमहांकाळ मार्गावर योगेवाडी गावाजवळ पहाटे 2 ते 3 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. एसटी कर्मचाऱ्यांनी सकाळी संप मागे घेतला, मात्र काल एसटी बंद असल्यामुळे खाजगी ट्रक मधून कर्नाटक मधील काही मजूर कराडकडे मजुरीसाठी जात होते. योगेवाडी गावाजवळ चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक उलटला. ट्रकमधील फरशीखाली सापडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी आहेत. जखमींना मिरजेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताच्या वेळी ट्रक मध्ये 18 ते 20 प्रवासी होते. त्यामुळे ट्रकखाली आणखी काही प्रवासी अडकल्याची  भीती व्यक्त केली जात आहे.

आंदोलकांवर दाखल केलेली गुन्हे तात्काळ मागे घ्या-इंडियन पँथर् सेना..!

बिलोली प्रतिनिधी - वैभव घाटे भीमाकोरेगाव येथे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या व असावध असलेल्या भिमसैनिकांवर काही मनुवादी पिलावळीच्या लोकांकडून जीवघेणा भ्याड हल्ला झाला.यात एका भीमसैनिकाचा जागीच म्रुत्यू झाला तर हजारो लोकांना किरकोळ जखमा झाल्या.याचा निषेध म्हणून भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.बाळासाहेब आंबेडकरांनी 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली.        काही ठिकाणचा अपवाद वगळता हा बंद शांततेत झाला.तरी पोलीसांकडून अतिसंवे दनशील भागात कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले.आणि यात हजारो निष्पाप तरुण व महिलांना घरात शिरून मारण्यात आल.यात हदगाव येथील जाधव कुटुंबाने आपला 15 वर्षाचा मुलगा गमावला.सरकारच्या सांगण्यावरून पोलीस प्रशासन भीम सैनिकांच्या जीवावर बेतले असून कल्याण कोळसेवाडी येथील 48 व इतर 92 आंदोलकांवर कलम 307 हा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला.यावेळी पत्रकारांशी बोलतांना संविधान दुगाने म्हणाले की,मला पोलीस प्रशासनाने याचे उत्तर द्यावे की 2012 पासून आज पर्यंत किती बंद पाळण्यात आले?आजपर्यंत किती आंदोलकांवर गुन्हे दाखल ...
गुत्तेदार व बांधकाम विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात बिलोली तहसील समोर दुगाने चे  अमरण उपोषण सुरु. बिलोली प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड अंतर्गत चालू असलेल्या बिलोली ते देगलूर दरम्यान रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम विलास पाटील टाकळीकर यांच्या लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कडून गेल्या अनेक महिन्यांपासून चालू आहे.मात्र हे काम पूर्णपणे बोगस व निकृष्ट दर्जाचे होत आहे.याची कल्पना तीन महिन्यापूर्वी पासून उपोषणकर्ते  संविधान दुगाने यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला लेखी तक्रार देऊन रस्त्यांच्या चौकशीची मागणी केली होती.मात्र या तक्रारी अर्जाला केराची टोपली दाखवत बांधकाम विभागाने संबधित गूत्तेदाराला पाठीशी घातल्याचा आरोप दुगाणेनी केला आहे.      एकीकडे खड्डेमुक्त रस्ते  व अपघाताचे प्रमाण कमी करू पाहणाऱ्या महाराष्ट्र शासन व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना आगामी दोन वर्षासाठीे खड्डेमुक्त रस्ता हे अभियान राबवावे लागेल यात शंका नाही.कारण बिलोली- देगलूर हा राज्य महामार्ग असून हा रस्ता आंध्र,तेलंगण व कर्नाटक राज्यांना जोड़न...