मुख्य सामग्रीवर वगळा

बाबासाहेबांचा लढा हा जातीअंताचा होता...प्रकल्पाधिकारी सुजाता पोहरे.

बाबासाहेबांचा लढा हा जातीअंताचा होता...प्रकल्पाधिकारी सुजाता पोहरे.

बिलोली - वैभव घाटे 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे अंतर्गत समतादूत प्रकल्पाच्या माध्यमातून मौजे चिंचाळा ता.बिलोली येथे धम्मचक्रप्रवर्तन दिन साजरा करण्यात आला.
बार्टीचे महासंचालक डॉ.राजेश धाबरे यांच्या संकल्पनेतून मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे मँडम आणि औरंगाबाद विभागीय प्रकल्प संचालक डॉ.श्रीकांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली धम्मचक्रप्रवर्तन दिन साजरा करण्याबाबत जिल्हानिहाय नियोजन देण्यात आले होते.
बार्टीचे  समतादूत नांदेड जिल्हा प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे मँडम यांच्या उपस्थिती आणि मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत आणि जि.प.प्रा.शाळा यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे सुंदर नियोजन करण्यात आले.बिलोली तालुक्याच्या वतीने कार्यक्रमाची सुरुवात ही  सकाळी समता प्रभातफेरीने झाली.समता प्रभात फेरीच्या माध्यमांतून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म स्वीकारण्यामागची कारणमीमांसा स्पष्ट करण्यात आली.त्यानंतर मुक्ति कोण पथे या पुस्तकांचे वाचन करून बुद्धवंदना घेण्यात आली.
तथागत गौतम बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस युवा नेत्रुत्व तथा सरपंच प्रतिनिधि शैलेश पाटील, प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे,केंद्रप्रमुख डि.टी.वाघमारे,शालेय  व्यवस्थापन समितिचे अध्यक्ष व्यंकटराव पाटील ,मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे ,समतादूत महेश हिगोले यांच्या हस्ते पुष्पांहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तदनंतर मान्यवरांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रनिर्माते आहेत.त्यांचा लढा हा जातीअंताचा शोषणमुक्तिचा होता.माणसाला माणूस म्हणून जगता यावे यासाठीच त्यांचा महत्वपूर्ण संघर्ष होता.राज्यघटनेने समतेच्या तत्वावर आधारित दिलेला मतदानाचा अधिकार कुठल्याही आमिषाला बळी पडून विकु नका.
स्वाभिमान गहाण टाकू नका.संत महापुरुष समाजसुधारक यांची विचारधारा जर खऱ्या अर्थाने आचरणात आणली तर सुंदर समताशील,विवेकी,सात्विक व डोळस समाजाची निर्मिती होईल असे प्रतिपादन त्यानी यावेळी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन समतादूत पांडुरंग मामीडवार यांनी केले तर आलेल्या मान्यवराचे आणि गावकरीचे आभार समतादूत इर्शाद शेख यांनी मानले.कार्यक्रम यशस्वितेसाठी ग्रामपंचायत कार्यालय व जि.प.प्रा.शाळा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाने महत्वपूर्ण परिश्रम घेतले.
यावेळी सहशिक्षक विजय कुराडे,शेख सर, सौ. बचेवार ,सौ.जळपतराव ,समतादूत महेश हिंगोले ,गावकरी ,महिला वर्ग,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळ कार्यकर्ते तसेच  सामाजिक कार्यकर्ते बंडु तोडेराव यांची उपस्थिति होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _______

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _________________________ मुंबई  - नंदु नाईक सांगलीत ऐन दिवाळीमध्ये ट्रक उलटून झालेल्या अपघातात दहा मजुरांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्तकेली जात आहे. एसटीच्या संपामुळे खाजगी वाहतुकीने प्रवास करणं मजुरांच्या जीवावर बेतल्याचं म्हटलं जात आहे. तासगांव-कवठेमहांकाळ मार्गावर योगेवाडी गावाजवळ पहाटे 2 ते 3 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. एसटी कर्मचाऱ्यांनी सकाळी संप मागे घेतला, मात्र काल एसटी बंद असल्यामुळे खाजगी ट्रक मधून कर्नाटक मधील काही मजूर कराडकडे मजुरीसाठी जात होते. योगेवाडी गावाजवळ चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक उलटला. ट्रकमधील फरशीखाली सापडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी आहेत. जखमींना मिरजेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताच्या वेळी ट्रक मध्ये 18 ते 20 प्रवासी होते. त्यामुळे ट्रकखाली आणखी काही प्रवासी अडकल्याची  भीती व्यक्त केली जात आहे.

आंदोलकांवर दाखल केलेली गुन्हे तात्काळ मागे घ्या-इंडियन पँथर् सेना..!

बिलोली प्रतिनिधी - वैभव घाटे भीमाकोरेगाव येथे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या व असावध असलेल्या भिमसैनिकांवर काही मनुवादी पिलावळीच्या लोकांकडून जीवघेणा भ्याड हल्ला झाला.यात एका भीमसैनिकाचा जागीच म्रुत्यू झाला तर हजारो लोकांना किरकोळ जखमा झाल्या.याचा निषेध म्हणून भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.बाळासाहेब आंबेडकरांनी 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली.        काही ठिकाणचा अपवाद वगळता हा बंद शांततेत झाला.तरी पोलीसांकडून अतिसंवे दनशील भागात कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले.आणि यात हजारो निष्पाप तरुण व महिलांना घरात शिरून मारण्यात आल.यात हदगाव येथील जाधव कुटुंबाने आपला 15 वर्षाचा मुलगा गमावला.सरकारच्या सांगण्यावरून पोलीस प्रशासन भीम सैनिकांच्या जीवावर बेतले असून कल्याण कोळसेवाडी येथील 48 व इतर 92 आंदोलकांवर कलम 307 हा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला.यावेळी पत्रकारांशी बोलतांना संविधान दुगाने म्हणाले की,मला पोलीस प्रशासनाने याचे उत्तर द्यावे की 2012 पासून आज पर्यंत किती बंद पाळण्यात आले?आजपर्यंत किती आंदोलकांवर गुन्हे दाखल ...
गुत्तेदार व बांधकाम विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात बिलोली तहसील समोर दुगाने चे  अमरण उपोषण सुरु. बिलोली प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड अंतर्गत चालू असलेल्या बिलोली ते देगलूर दरम्यान रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम विलास पाटील टाकळीकर यांच्या लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कडून गेल्या अनेक महिन्यांपासून चालू आहे.मात्र हे काम पूर्णपणे बोगस व निकृष्ट दर्जाचे होत आहे.याची कल्पना तीन महिन्यापूर्वी पासून उपोषणकर्ते  संविधान दुगाने यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला लेखी तक्रार देऊन रस्त्यांच्या चौकशीची मागणी केली होती.मात्र या तक्रारी अर्जाला केराची टोपली दाखवत बांधकाम विभागाने संबधित गूत्तेदाराला पाठीशी घातल्याचा आरोप दुगाणेनी केला आहे.      एकीकडे खड्डेमुक्त रस्ते  व अपघाताचे प्रमाण कमी करू पाहणाऱ्या महाराष्ट्र शासन व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना आगामी दोन वर्षासाठीे खड्डेमुक्त रस्ता हे अभियान राबवावे लागेल यात शंका नाही.कारण बिलोली- देगलूर हा राज्य महामार्ग असून हा रस्ता आंध्र,तेलंगण व कर्नाटक राज्यांना जोड़न...