मुख्य सामग्रीवर वगळा

भाजपा सरकारला वटणीवर आणण्यासाठी एस टी कामगारांचा स्मार्टसंप राजकीय खेळीतुन काँग्रेसचा पाठींबा ?

भाजपा सरकारला वटणीवर आणण्यासाठी एस टी कामगारांचा स्मार्टसंप राजकीय खेळीतुन काँग्रेसचा पाठींबा ?


नायगाव प्रतिनिधी - माधव पवार
राज्यातले सरकार असो की केंद्रातले सतेवर असल्याच्या नंतर फार मोठी जवाबदारी असते परंतु महाराष्ट्रातील एस टी कामगार दिनांक १६ ऑक्टोंबरच्या मध्यरात्री पासून संपावर गेल्यामुळे नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गासह अन्य ठिकाणच्या रस्त्यावर वहाणाऱ्या एस टी बसेस संपामुळे बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय झालीच परंतु लाखो रुपयाचे नुकसान सुध्दा ऐन दीपावलीच्या मुहूर्तावर झाल्याने त्यांचा फटका अखेर जनतेला बसणार असलातरी सदरच्या संपामुळे भाजपा सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी एस टी कामगाराने स्मार्ट संप पुकारला असल्याचे जनतेतुन बोलल्या जात असून सन २००४ ते २००६ या कालावधीत तत्कालीन परिवहन मंत्री तथा नांदेडचे सध्याचे खासदार अशोकराव चव्हाण हे होते त्यांच्या कार्यकाळात कसल्याच प्रकारचा स्मार्ट संप झाला नसल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष तथा उपसरपंच  घुंगराळा वसंत सुगावे. बालाजी मदेवाड सरपंच ( बरबडा ) माजी सरपंच नागनाथ हांनमते राज्य परिवहन मंडळात एकूण ३२ वर्ष सेवा करणारे सेवा निवृत्त कर्मचारी चालक संभाजी तुरटवाड . तसेच २२ वर्ष सेवा करणारे व्यंकटराव सुगावे यानी असे सांगितले की एस टी महामंडळाचे उत्पन्न कमी असल्याने असाच दोन दिवसांचा संप डिसेंबर २०१६ रोजी होता शासनानी  सातवा वेतन आयोग लागू करत नसल्याचे सांगत सर्वच संघटना मिळून असा संप झाला नसल्याचे त्यांचे म्हणे आहे
    महाराष्ट्र राज्यात भाजपा व शिवसेना युतीचे सरकार . असल्याने राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या काळात ऐन दिवाळीच्या तोंडावर हा एस टी कामगारांचा संप होत असल्याने या स्मार्ट संपामुळे मागे राजकीय खेळीतून संप होत असल्याने सदर स्मार्ट संपाला काँग्रेस पक्षांचा पाठींबा असावा ? असा प्रश्ण ग्रामीण भागातील जनतेला पडला असून नांदेड ते हैद्राबाद राज्य मार्गावर एस टी बसेस संपामुळे बंद पडल्याने दिनांक ऑक्टोबर रोजी सदरील राज्य महामार्गावर खाजगी बसेस व काळीपिवळी जीप . आटो मध्ये प्रवाशी कोंबडया प्रमाणे भरून वाहतूक केल्याचे दिसून आले असले तरी भूत काळात कधी असा संप झाला नाही एस टी कामगारांचा बेमुदत संपामुळे खाजगी वाहन धारकाने प्रवाशां कडून टिकीटा पेक्षाही दुप्पट आकारणी करुन आर्थिक लूट होत दिसून आले तरी हा स्मार्ट संप म्हणजे भाजप युती सरकारला वटनीवर आणण्यासाठी एस टी महामंडळाच्या कामगारने पुकारला असल्याचे . सदररील जनतेतुन बोलल्या जात आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _______

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _________________________ मुंबई  - नंदु नाईक सांगलीत ऐन दिवाळीमध्ये ट्रक उलटून झालेल्या अपघातात दहा मजुरांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्तकेली जात आहे. एसटीच्या संपामुळे खाजगी वाहतुकीने प्रवास करणं मजुरांच्या जीवावर बेतल्याचं म्हटलं जात आहे. तासगांव-कवठेमहांकाळ मार्गावर योगेवाडी गावाजवळ पहाटे 2 ते 3 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. एसटी कर्मचाऱ्यांनी सकाळी संप मागे घेतला, मात्र काल एसटी बंद असल्यामुळे खाजगी ट्रक मधून कर्नाटक मधील काही मजूर कराडकडे मजुरीसाठी जात होते. योगेवाडी गावाजवळ चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक उलटला. ट्रकमधील फरशीखाली सापडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी आहेत. जखमींना मिरजेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताच्या वेळी ट्रक मध्ये 18 ते 20 प्रवासी होते. त्यामुळे ट्रकखाली आणखी काही प्रवासी अडकल्याची  भीती व्यक्त केली जात आहे.

आंदोलकांवर दाखल केलेली गुन्हे तात्काळ मागे घ्या-इंडियन पँथर् सेना..!

बिलोली प्रतिनिधी - वैभव घाटे भीमाकोरेगाव येथे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या व असावध असलेल्या भिमसैनिकांवर काही मनुवादी पिलावळीच्या लोकांकडून जीवघेणा भ्याड हल्ला झाला.यात एका भीमसैनिकाचा जागीच म्रुत्यू झाला तर हजारो लोकांना किरकोळ जखमा झाल्या.याचा निषेध म्हणून भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.बाळासाहेब आंबेडकरांनी 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली.        काही ठिकाणचा अपवाद वगळता हा बंद शांततेत झाला.तरी पोलीसांकडून अतिसंवे दनशील भागात कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले.आणि यात हजारो निष्पाप तरुण व महिलांना घरात शिरून मारण्यात आल.यात हदगाव येथील जाधव कुटुंबाने आपला 15 वर्षाचा मुलगा गमावला.सरकारच्या सांगण्यावरून पोलीस प्रशासन भीम सैनिकांच्या जीवावर बेतले असून कल्याण कोळसेवाडी येथील 48 व इतर 92 आंदोलकांवर कलम 307 हा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला.यावेळी पत्रकारांशी बोलतांना संविधान दुगाने म्हणाले की,मला पोलीस प्रशासनाने याचे उत्तर द्यावे की 2012 पासून आज पर्यंत किती बंद पाळण्यात आले?आजपर्यंत किती आंदोलकांवर गुन्हे दाखल ...
गुत्तेदार व बांधकाम विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात बिलोली तहसील समोर दुगाने चे  अमरण उपोषण सुरु. बिलोली प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड अंतर्गत चालू असलेल्या बिलोली ते देगलूर दरम्यान रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम विलास पाटील टाकळीकर यांच्या लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कडून गेल्या अनेक महिन्यांपासून चालू आहे.मात्र हे काम पूर्णपणे बोगस व निकृष्ट दर्जाचे होत आहे.याची कल्पना तीन महिन्यापूर्वी पासून उपोषणकर्ते  संविधान दुगाने यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला लेखी तक्रार देऊन रस्त्यांच्या चौकशीची मागणी केली होती.मात्र या तक्रारी अर्जाला केराची टोपली दाखवत बांधकाम विभागाने संबधित गूत्तेदाराला पाठीशी घातल्याचा आरोप दुगाणेनी केला आहे.      एकीकडे खड्डेमुक्त रस्ते  व अपघाताचे प्रमाण कमी करू पाहणाऱ्या महाराष्ट्र शासन व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना आगामी दोन वर्षासाठीे खड्डेमुक्त रस्ता हे अभियान राबवावे लागेल यात शंका नाही.कारण बिलोली- देगलूर हा राज्य महामार्ग असून हा रस्ता आंध्र,तेलंगण व कर्नाटक राज्यांना जोड़न...