मुख्य सामग्रीवर वगळा

बिलोली-देगलूर मार्गावरील लक्ष्मी कन्स्ट्रक्शन चे काम त्वरीत थांबविन्याची मागणी....! 13 नोव्हेंबर पासून बेमूदत आमरण उपोषण.. 🏻बिलोली प्रतिनिधी- वैभव घाटे


बिलोली-देगलूर मार्गावरील लक्ष्मी कन्स्ट्रक्शन चे काम त्वरीत थांबविन्याची मागणी....!
13 नोव्हेंबर पासून बेमूदत आमरण उपोषण..

🏻बिलोली प्रतिनिधी- वैभव घाटे

महाराष्ट्र कर्नाटक या दोन राज्यांना जोडणाऱ्या बिलोली देगलूर मार्गावर लक्ष्मी कन्स्ट्रक्शन अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण व पूल बांधणी चे काम 16 किमी अंतरावर बऱ्याच दिवसापासून चालू आहे.पण हे काम एकदम निकृष्ट पद्धतीचे होत असून रस्त्याच्या रुंदीकरनासाठी मुरुमाएवजी काळी मातीचा तसेच डष्टरहित गिट्टिचा वापर मोठ्याप्रमात केला जात आहे.तर पूलाच्या कामासाठी सीमेंट कोन्क्रेट ऐवजी मोठ-मोठ्या दगडांचा वापर करून वर-वरून सीमेंट चा लेप देऊन पुलाचे काम पूर्ण करत असल्याचे निदर्शनास आल्याने वारणेचा वाघ सामाजिक संघटनेच्या संविधान दुगाने यांनी दि.13/7/2017 रोजी बिलोली तहसीलदार विनोद गुंडमवार यांना लेखी तक्रार देऊन रस्त्याच्या कामांची चौकशी करण्याची  मागणी केली होती.निवेदनाची दखल घेत  तहसीलदारानी चौकशीसाठी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग नांदेड यांना पत्र पाठविले खरे पण आम्हाला पत्रच मिळाले नाही,तुम्ही देगलूर बांधकाम विभागाकडे जाऊन विचारपूस करा तिथे पत्र गेले असेल असे उडवा उडविची उत्तर देत नांदेड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याने या बाबींवर पडदा टाकला मात्र यांच्या नावाने काढलेले पत्र देगलूर ला कसे जाईल असा प्रश्न निर्माण होतो.कार्यकारी अभियंता नांदेड यांच्या सांगण्यावरून देगलूर बांधकाम विभागात ही विचारपूस केली असता तिथे पत्र आले नसल्याचे तेथील अभियंत्याने सांगितले.या संबंध बाबींवरुन बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह उपस्तिथ होत आहे.असे तक्रारदार संविधान दुगाणे चे म्हणणे आहे.
    नांदेड बांधकाम विभाग प्रशासन श्री.विलास पाटील टाकळीकर या गूत्तेदाराला पाठीशी घालून सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळत आहे.कारण ह्या रस्त्याच्या कामात काळी मातीचा वापर केल्यामुळे हा रस्ता जास्त काळ टिकणार नसून पूल सुद्धा लवकरच ढासाळतील.रस्त्यावर खड्डे पडून अपघात व जीवितहानि होण्याची संभावना नाकारता येणार नाही.या कामांची वरीष्ट शासकीय अभियंत्याकडून चौकशी करावी.
  संबधित कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करून रस्त्याचे काम त्वरीत थांबवावे.रस्ता जर टिकावू बनवायचा असेल तर ते काम शासकीय कंत्राटदाराकडून पूर्ण करून घ्यावे.गेल्या चार महिन्यापासून या गंभीर बाबिकडे लक्ष देण्यासाठी प्रशासनाकडे वेळ नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासन नांदेड च्या निषेधार्थ दि 13/10/17 पासून बिलोली तहसील कार्यालयासमोर बेमूदत आमरण उपोषण करीत असल्याचे संविधान दुगाणे यांनी निवेदनात नमूद केले आहे..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _______

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _________________________ मुंबई  - नंदु नाईक सांगलीत ऐन दिवाळीमध्ये ट्रक उलटून झालेल्या अपघातात दहा मजुरांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्तकेली जात आहे. एसटीच्या संपामुळे खाजगी वाहतुकीने प्रवास करणं मजुरांच्या जीवावर बेतल्याचं म्हटलं जात आहे. तासगांव-कवठेमहांकाळ मार्गावर योगेवाडी गावाजवळ पहाटे 2 ते 3 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. एसटी कर्मचाऱ्यांनी सकाळी संप मागे घेतला, मात्र काल एसटी बंद असल्यामुळे खाजगी ट्रक मधून कर्नाटक मधील काही मजूर कराडकडे मजुरीसाठी जात होते. योगेवाडी गावाजवळ चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक उलटला. ट्रकमधील फरशीखाली सापडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी आहेत. जखमींना मिरजेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताच्या वेळी ट्रक मध्ये 18 ते 20 प्रवासी होते. त्यामुळे ट्रकखाली आणखी काही प्रवासी अडकल्याची  भीती व्यक्त केली जात आहे.

आंदोलकांवर दाखल केलेली गुन्हे तात्काळ मागे घ्या-इंडियन पँथर् सेना..!

बिलोली प्रतिनिधी - वैभव घाटे भीमाकोरेगाव येथे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या व असावध असलेल्या भिमसैनिकांवर काही मनुवादी पिलावळीच्या लोकांकडून जीवघेणा भ्याड हल्ला झाला.यात एका भीमसैनिकाचा जागीच म्रुत्यू झाला तर हजारो लोकांना किरकोळ जखमा झाल्या.याचा निषेध म्हणून भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.बाळासाहेब आंबेडकरांनी 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली.        काही ठिकाणचा अपवाद वगळता हा बंद शांततेत झाला.तरी पोलीसांकडून अतिसंवे दनशील भागात कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले.आणि यात हजारो निष्पाप तरुण व महिलांना घरात शिरून मारण्यात आल.यात हदगाव येथील जाधव कुटुंबाने आपला 15 वर्षाचा मुलगा गमावला.सरकारच्या सांगण्यावरून पोलीस प्रशासन भीम सैनिकांच्या जीवावर बेतले असून कल्याण कोळसेवाडी येथील 48 व इतर 92 आंदोलकांवर कलम 307 हा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला.यावेळी पत्रकारांशी बोलतांना संविधान दुगाने म्हणाले की,मला पोलीस प्रशासनाने याचे उत्तर द्यावे की 2012 पासून आज पर्यंत किती बंद पाळण्यात आले?आजपर्यंत किती आंदोलकांवर गुन्हे दाखल ...
गुत्तेदार व बांधकाम विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात बिलोली तहसील समोर दुगाने चे  अमरण उपोषण सुरु. बिलोली प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड अंतर्गत चालू असलेल्या बिलोली ते देगलूर दरम्यान रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम विलास पाटील टाकळीकर यांच्या लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कडून गेल्या अनेक महिन्यांपासून चालू आहे.मात्र हे काम पूर्णपणे बोगस व निकृष्ट दर्जाचे होत आहे.याची कल्पना तीन महिन्यापूर्वी पासून उपोषणकर्ते  संविधान दुगाने यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला लेखी तक्रार देऊन रस्त्यांच्या चौकशीची मागणी केली होती.मात्र या तक्रारी अर्जाला केराची टोपली दाखवत बांधकाम विभागाने संबधित गूत्तेदाराला पाठीशी घातल्याचा आरोप दुगाणेनी केला आहे.      एकीकडे खड्डेमुक्त रस्ते  व अपघाताचे प्रमाण कमी करू पाहणाऱ्या महाराष्ट्र शासन व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना आगामी दोन वर्षासाठीे खड्डेमुक्त रस्ता हे अभियान राबवावे लागेल यात शंका नाही.कारण बिलोली- देगलूर हा राज्य महामार्ग असून हा रस्ता आंध्र,तेलंगण व कर्नाटक राज्यांना जोड़न...