मुख्य सामग्रीवर वगळा

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा विशेष उपक्रम - बार्टी तर्फे चितोडिया समाजातील शाळाबाह्य मुलांना शाळेत प्रवेश देऊन कृतिशील पद्धतीने विद्यार्थी दिवस साजरा ...प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा विशेष उपक्रम -

बार्टी तर्फे चितोडिया समाजातील शाळाबाह्य मुलांना शाळेत प्रवेश देऊन कृतिशील पद्धतीने विद्यार्थी दिवस साजरा ...प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे 

बिलोली प्रतिनिधी 


डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेच्या समतादूत प्रकल्पातर्फे शासन निर्णयानुसार जि.प.हायस्कूल,लोहगाव येथे विद्यार्थी दिवस साजरा करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे कि राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन म्हणजे ०७ नोव्हेंबर १९०० असून या दिवशी खऱ्या अर्थाने माणसाला माणूस म्हणून जगता यावे यासाठी माणसाच्या प्रतिष्ठेकरता लढणार्या एका क्रांतीची,युगांतराची सुरुवात  झाली.याअनुषंगाने त्यांचा शाळा प्रवेश दिन हा विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात आला.
याचाच एक भाग म्हणून लोहगाव परिसरात बऱ्याच वर्षांपासून चितोडिया समाज वास्तव्यास आहे पण शिक्षण प्रवाहापासून वंचित आहे असे बार्टीतर्फे समतादूत इर्शाद शेख आणि समतादूत पांडुरंग मामीडवार यांनी  केलेल्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणांती  निदर्शनास आले व या शाळाबाह्य मुलांना शिक्षणप्रवाहात आणावे यासाठी पालकांना मार्गदर्शन करून शिक्षणाचे महत्व पटवून देण्यात आले.आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीमय  शाळाप्रवेश दिनी म्हणजे ०७ नोव्हेंबर रोजी जि.प.हायस्कूल लोहगाव या शाळेच्या सहकार्याने  येथील शाळेत सदर शाळाप्रवेश कार्यक्रमाचे नियोजन करून शाळाबाह्य मुलांना प्रवेश देऊन  विद्यार्थी दिवस साजरा करण्यात आला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर याना मान्यवरांच्या हस्ते अभिवादन  करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून  मुख्याध्यापक गिरी  व  प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे, शिक्षणविस्तार अधिकारी सौ.भैरवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते दिलीप पांढरे, उपसरपंच शंकरराव राखे,  ग्रामपंचायत सदस्य कांबळे,शा.व्य.समितीचे अध्यक्ष  संतोष स्वामी,काँग्रेस सर्कल प्रमुख प्रल्हाद वानोळे, दै.पुण्यनगरीचे प्रतिनिधी गंगासागरे, चितोडिया समाजप्रमुख रघुवीरसिंग यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी शाळाबाह्य मुलांना प्रवेश देऊन वही पेन साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे  प्रास्ताविक सहशिक्षक कोंडावार सर यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे यांनी बाबासाहेबांचा शाळाप्रवेश म्हणजे एक क्रांतीची आणि युगांतराची चाहूल होती. डॉ.बाबासाहेबांचा सर्वानी आदर्श घेऊन वाटचाल करावी आणि स्वतःचा  व समाजाचा जीवनमान उंचावण्यासाठी सतत  प्रयत्नरत राहावे असे प्रतिपादन केले.शिक्षण विस्तार अधिकारी सौ भैरवाड यांनी चितोडिया समाजातील या सर्व मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिला जाईल असे आश्वासन दिले आणि  दिलीप पांढरे  यांनी बार्टीच्या या उपक्रमाचे कौतुक करून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा सर्व विद्यार्थ्यांनी आदर्श घेऊन प्रचंड अभ्यास करून यशोशिखरावर जावे यासाठी  शालेय विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.शाळेचे मुख्याध्यापक गिरी आणि समतादूत पांडुरंग मामीडवार यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे एक  आदर्श विद्यार्थी व आजिवन  विद्यार्थी होते याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी शाळेचे सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांची  लक्षणीय उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  सहशिक्षक पांचाळ यांनी केले तर आभार समतादूत इर्शाद शेख यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _______

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _________________________ मुंबई  - नंदु नाईक सांगलीत ऐन दिवाळीमध्ये ट्रक उलटून झालेल्या अपघातात दहा मजुरांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्तकेली जात आहे. एसटीच्या संपामुळे खाजगी वाहतुकीने प्रवास करणं मजुरांच्या जीवावर बेतल्याचं म्हटलं जात आहे. तासगांव-कवठेमहांकाळ मार्गावर योगेवाडी गावाजवळ पहाटे 2 ते 3 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. एसटी कर्मचाऱ्यांनी सकाळी संप मागे घेतला, मात्र काल एसटी बंद असल्यामुळे खाजगी ट्रक मधून कर्नाटक मधील काही मजूर कराडकडे मजुरीसाठी जात होते. योगेवाडी गावाजवळ चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक उलटला. ट्रकमधील फरशीखाली सापडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी आहेत. जखमींना मिरजेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताच्या वेळी ट्रक मध्ये 18 ते 20 प्रवासी होते. त्यामुळे ट्रकखाली आणखी काही प्रवासी अडकल्याची  भीती व्यक्त केली जात आहे.

वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण प्रकरणी संस्कृती संवर्धन मंडळाच्या चेअरमनवर गुन्हा दाखल

वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण प्रकरणी संस्कृती संवर्धन मंडळाच्या चेअरमनवर गुन्हा दाखल *पहिल्याच टप्प्यात पाच एकर जमीन ताब्यात* बिलोली-  (शिवराज भायनुरे )  बिलोली तालुक्यात नावलौकिक असलेल्या सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळाच्या चेअरमनवर वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण केल्याच्या कारणावरून वन विभागाने गुन्हा दाखल करून 5 एकर जमीन ताब्यात घेतली आहे वन विभागाच्या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे संस्कृती संवर्धन मंडळाकडून वन अधिकार्‍यांवर राज्य पातळीवरील तबाव टाकण्याचा प्रकार चालू असल्याची माहिती समोर येत आहे बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील सर्वे नंबर 530 मध्ये वन विभागाची जवळपास 171 हेक्टर जमीन असल्याची माहिती आहे वन विभागाच्या जवळपास 15 एकर जमिनीवर अतिक्रमण केले असल्याचे स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आहेत संस्कृती संवर्धन शिक्षण मंडळाने येथील वन विभागाच्या जमीनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असल्याची बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष शंकर महाजन यांनी लेखी तक्रारीद्वारे वन विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती एकीकडे 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' चा नारा देत ...

त्यात्या वंचित शेतकऱ्यांसाठी आ. कडुंना दिले निवेदन लेंडी प्रकल्पावर विस्तृत केली चर्चा मुखेड प्रतिनिधी :-०३

            मुखेड  प्रतिनिधी :- बिलोली टाईम्स न्युज नेटवर्क                     परीसरातील अनेक गावातील सन२०१६-१७ यामध्ये ४०० च्या जवळपास शेतकऱ्यांनी स्टेट बँक आँफ इंडिया या बँकेत रितसर पध्दतीने प्रधानमंञी पिकविमा योजना भरले होते . पण अध्यापर्यत त्या वंचित शेतकऱ्यांचा पिकविम्याचा लाभ मिळालाच नाही . या वंचित शेतकऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटुन आपले व्यथा मांडले , याच अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दि२४ रोजी लाक्षणिक उपोषण केले. तरी या मुजोर प्रशासनाने कोणतेच उत्तर देत नाही. यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आ. बच्चु कडू यांची भेट घेऊन मुखेड तालुका प्रमुख मन्मथ खंकरे, ता.सरचिटणीस निखील कोयलकोंडेवार , निखील गोगा, अविनाश जाधव यांनी भेट घेऊन विस्तृत चर्चा केली...            मुक्रमाबाद येथील गेल्या ३५ ते ४० वर्षापासुन  रखडीत असलेल्या लेंडी धरणा संदर्भात , अगोदर पुणर्वसन नंतर धरण , व परीसरातील अनेक गावांचे झालेले पुणर्वसन संदर्भात यासह अ...