मुख्य सामग्रीवर वगळा

बिलोली तालुका बनला अवैध धंद्याचे माहेर घर.

बिलोली तालुका बनला अवैध धंद्याचे माहेर घर.


नांदेड- वैभव घाटे

बिलोली तालुक्यातील गंजगाव परिसरामध्ये अवैध धंद्याचे मोठ्या प्रमाणात उत आला आहे तसेच गंजगाव परिसरामध्ये विना परवाना देशी दारु मोठ्या प्रमाणात विकली जात आहे. तरी संबधितांनी या प्रकरणी कठोर पाउल उचलणे गरजेचे आहे. गंजगाव माचनुर या गावामध्ये देशी दारु विक्रीचा परवाना कोणत्याही विक्रेत्याकडे नसुन खुले आम पणे दारु विक्रीचा व्यवसाय जोमात चालु आहे बिलोली तालुक्यात हातपंपाना कमी पाणी येत आसेल पण तालुक्यात दारु त्यापेक्षाही जास्त विकली जात आहे. यांचा मोठा परिणाम गावातील तरुण वर्गावर होत आहे . यांचा सर्वात जास्त ञास महिलांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे . गल्लो गल्ली मोठ्या प्रमाणात वाठ झाल्याने गावातील शांतता लोप पावत आहे. या दारुड्या लोकांमुळे गल्लो गल्लीत गोंधळाचे वातावरण राहात असल्याने त्यांच्या बालकांच्या मनावर विपरित परिणाम होत आहे. महिलांना या गोष्टींचा नाहक ञास मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. या गोष्टींकडे राज्य उत्पादन शुल्क विभाग अर्थपुर्ण दुर्लक्ष करित आहे
तरी संबंधित विभागाचे अधिकारी गांभिर्याने दखल घेवुन परिसरातील सर्व ठिकाणची दारु विक्री बंद करुन गावात सुख शांती नांदेल या दृष्टीने प्रयत्न करावेत अशी गावकर्यानी बिलोली टाईम्स शी बोलताना सांगितले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*लाच घेणा-या महिला गृहपालास रंगेहाथ पकडले

* लाच घेणा-या महिला गृहपालास रंगेहाथ पकडले*   * नांदेड :-  वैभव घाटे*  मेसचे बिल मंजूर करण्यासाठी गृहपाल किशोरी अलोने यांना २० हजाराची लाच स्वीकारताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. हदगाव येथील समाज कल्याण विभागाच्या मुलीच्या वसतिगृहात त्या कार्यरत असून याच ठिकाणी त्यांना पकडण्यात आले.     हदगाव येथे समाज कल्याण विभागाचे मुलींचे वसतिगृह आहे. येथे ८ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थिनी राहत असून किशोरी अलोने या गृहपाल आहेत. वसतिगृहात कार्यरत असलेल्या खानावळीचे बिल काढताना विद्यार्थिनी उपस्थिती योग्य भरावी भरावी लागते. हि बाब लक्षात घेऊन अलोने यांनी मेस चालकाची अडवणूक करत विद्यार्थिनी उपस्थिती योग्य भरण्यासाठी २० हजार रुपयाची मागणी केली. यानंतर मेस चालकाने याबाबत नांदेड एसीबी कडे तक्रार केली. तक्रारीची शहानिशा करत आज सकाळी ११ वाजता नांदेड एसीबी ने शासकीय वसतिगृह परिसरात सापळा रचला. यावेळी अलोने या मेस चालकाकडून २० हजाराची लाच स्वीकारताना एसिबी च्या जाळ्यात अडकल्या.     याप्रकरणात हदगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा सापळा पोलीस अधीक्षक संजय ला

बिलोली तहसिलचा सैराट कारभार सुरुच.

बिलोली तहसिलचा सैराट कारभार सुरुच.  बिलोली प्रतिनिधी- वैभव घाटे  गेल्या अनेक दिवसांपासून बिलोली तहसिल कार्यालयातील कर्मचारी निवासी न राहता नांदेड सारख्या शहरात राहून येजा करीत असल्याने तहसिल कार्यालयाचे अनेक कामे वेळेत होत नसल्यामुळे जनतेची कामे खोळंबत असल्याने पत्रकार  संरक्षण समिती  बिलोली च्या वतिने विभागीय अधिकारी बिलोली यांना निवेदन देण्यात आले. बिलोली तहसिल कार्यालयाचे तहसिलदार विनोद गुंडमवार हे बिलोली तहसिल येथे रुजू झाल्यापासून आजतागायत तहसील कार्यालयात नांदेड येथून ये-जा करीत आहेत. याचेच अनुकरण नायब तहसीलदार हे देखील नांदेड येथून ये-जा करित असुन मुख्यालया राहत नसूनही शासनाकडून घरभाडे उचल करीत शासनाची दिशाभूल करीत आहेत याचाच अर्थ उंटावरुन शेळ्या हाकण्यासारखा कारभार सदरील तहसील कर्मच्यार्यांचा झाला आहे. यामुळे तालुक्यातील निराधार, विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर व बिलोली तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीचा प्रसंग उद्भवल्यास याला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न तहसिलदार ये-जा करीत आसल्या कारणांमुळे अनेक कामे खोळंबत असल्याने जनतेची गैरसोय होत आहे.  बिलोली तालुक्यातील जनतेची गैरसोय दुर क

पत्रकार तोष्णीवाल यांच्यावर झालेल्या हल्याचा बिलोली पञकार संघाच्या वतीने निषेध

पत्रकार तोष्णीवाल यांच्यावर झालेल्या हल्याचा बिलोली पञकार संघाच्या वतीने निषेध -------------------------------------------------------------  बिलोली     हिंगोली जिल्हा मराठी पञकार संघाचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी भ्याड हल्ला केला.या घटनेचा महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघ ता.बिलोलीच्या वतीने जाहिर निषेध करून हल्लेखोरांना तत्काळ अटक करण्याच्या मागणीचे निवेदन तहसिलदार बिलोली यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्याकडे पाठवले आले.    हिंगोलीचे जेष्ठ पञकार व जिल्हा पञकार संघाचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांच्यावर दि.२३ आक्टोंबर रोजी अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक केला.हि घटना घडून ३ दिवस उलटले तरी पोलिसांना आरोपीस पकडण्यात अध्याप अश आले नाही.यामुळे तालुक्यातील पञकारांमध्ये संतापाची लाठ उसळली असून दिलेल्या निवेदनात आपल्या भावना प्रकट करून मा.मुख्यमंञी यांच्याकडे नायब तहसिलदार संजय नागमवाड यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.यावेळी पञकार संघाचे अध्यक्ष  राजेंद्र पा.शिंदे,संघाचे प्रमुख गोविंद मुंडकर,कार्याध्यक्ष बाबूराव इंगळे,उपाध्यक्ष