मुख्य सामग्रीवर वगळा

भारतीय संविधानातच देव सापडेल.!सोनू दरेगावकर*



नायगाव:- प्रतिनिधी
      *तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा दरेगाव येथे 26 नोहेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संविधानाच्या प्रस्ताविकेच वाचन करून संविधान दिन साजरा करण्यात आला.*
*त्यावेळी 26/11 च्या झालेल्या दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.त्यावेळी साहित्यिक सोनू दरेगावकर यांच्याकडून विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून शालेय साहित्य देण्यात आले.*

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सोनू दरेगावकर म्हणाले भारतीय संविधान हे भारत देशाने तर मान्य केलेच आहे परंतु आज जगाला सुध्दा भारतीय संविधानाची गरज पडत आहे.कारण माणूस हा माणूस म्हणून जगला पाहिजे त्याच्या पुढे कुठली जात येता कामा नये.
एखादया माणसावर जर अन्याय झाला तर तो अन्याय त्याच्यावरचा दूर होण्यास संविधानाची गरज भासते म्हणून भारतीय संविधान प्रत्येक नागरिकांनी वाचले पाहीजे. संविधानातच देव सापडेल असेही सोनू दरेगावकर म्हणाले.
पुढे प्रस्ताविकात शाळेचे मुख्याध्यापक माधव मोरे सर म्हणाले की, लाखो दलित दिनदुबळ्याना जे मान-सन्मान  मिळतो.ते केवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे संविधान हे प्रत्येक नागरिकांनी वाचले पाहीजे असेही मोरे सर म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष दरेगावचे सरपंच प्रदीप पा.शिंदे तर प्रमुख पाहुणे तंटामुक्तिचे अध्यक्ष भगवान आमनवाड,भोपाळे मँडम, बाळाजी चिंतेवाड, दत्ता बैलकवाड, माधव आमनवाड, किशन बैलके, राजेश शिंदे यांची उपस्थिती होती.
*कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अंगरोड सर यांनी केले तर आभार फूलारी  सर यांनी मांडले.*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _______

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _________________________ मुंबई  - नंदु नाईक सांगलीत ऐन दिवाळीमध्ये ट्रक उलटून झालेल्या अपघातात दहा मजुरांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्तकेली जात आहे. एसटीच्या संपामुळे खाजगी वाहतुकीने प्रवास करणं मजुरांच्या जीवावर बेतल्याचं म्हटलं जात आहे. तासगांव-कवठेमहांकाळ मार्गावर योगेवाडी गावाजवळ पहाटे 2 ते 3 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. एसटी कर्मचाऱ्यांनी सकाळी संप मागे घेतला, मात्र काल एसटी बंद असल्यामुळे खाजगी ट्रक मधून कर्नाटक मधील काही मजूर कराडकडे मजुरीसाठी जात होते. योगेवाडी गावाजवळ चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक उलटला. ट्रकमधील फरशीखाली सापडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी आहेत. जखमींना मिरजेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताच्या वेळी ट्रक मध्ये 18 ते 20 प्रवासी होते. त्यामुळे ट्रकखाली आणखी काही प्रवासी अडकल्याची  भीती व्यक्त केली जात आहे.

आंदोलकांवर दाखल केलेली गुन्हे तात्काळ मागे घ्या-इंडियन पँथर् सेना..!

बिलोली प्रतिनिधी - वैभव घाटे भीमाकोरेगाव येथे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या व असावध असलेल्या भिमसैनिकांवर काही मनुवादी पिलावळीच्या लोकांकडून जीवघेणा भ्याड हल्ला झाला.यात एका भीमसैनिकाचा जागीच म्रुत्यू झाला तर हजारो लोकांना किरकोळ जखमा झाल्या.याचा निषेध म्हणून भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.बाळासाहेब आंबेडकरांनी 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली.        काही ठिकाणचा अपवाद वगळता हा बंद शांततेत झाला.तरी पोलीसांकडून अतिसंवे दनशील भागात कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले.आणि यात हजारो निष्पाप तरुण व महिलांना घरात शिरून मारण्यात आल.यात हदगाव येथील जाधव कुटुंबाने आपला 15 वर्षाचा मुलगा गमावला.सरकारच्या सांगण्यावरून पोलीस प्रशासन भीम सैनिकांच्या जीवावर बेतले असून कल्याण कोळसेवाडी येथील 48 व इतर 92 आंदोलकांवर कलम 307 हा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला.यावेळी पत्रकारांशी बोलतांना संविधान दुगाने म्हणाले की,मला पोलीस प्रशासनाने याचे उत्तर द्यावे की 2012 पासून आज पर्यंत किती बंद पाळण्यात आले?आजपर्यंत किती आंदोलकांवर गुन्हे दाखल ...

वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण प्रकरणी संस्कृती संवर्धन मंडळाच्या चेअरमनवर गुन्हा दाखल

वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण प्रकरणी संस्कृती संवर्धन मंडळाच्या चेअरमनवर गुन्हा दाखल *पहिल्याच टप्प्यात पाच एकर जमीन ताब्यात* बिलोली-  (शिवराज भायनुरे )  बिलोली तालुक्यात नावलौकिक असलेल्या सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळाच्या चेअरमनवर वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण केल्याच्या कारणावरून वन विभागाने गुन्हा दाखल करून 5 एकर जमीन ताब्यात घेतली आहे वन विभागाच्या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे संस्कृती संवर्धन मंडळाकडून वन अधिकार्‍यांवर राज्य पातळीवरील तबाव टाकण्याचा प्रकार चालू असल्याची माहिती समोर येत आहे बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील सर्वे नंबर 530 मध्ये वन विभागाची जवळपास 171 हेक्टर जमीन असल्याची माहिती आहे वन विभागाच्या जवळपास 15 एकर जमिनीवर अतिक्रमण केले असल्याचे स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आहेत संस्कृती संवर्धन शिक्षण मंडळाने येथील वन विभागाच्या जमीनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असल्याची बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष शंकर महाजन यांनी लेखी तक्रारीद्वारे वन विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती एकीकडे 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' चा नारा देत ...