मुख्य सामग्रीवर वगळा

सगरोळीत बजरंग दल भरती आभियानास उत्सुर्फत प्रतिसाद

सगरोळीत बजरंग दल भरती आभियानास उत्सुर्फत प्रतिसाद
तालुका प्रतिनिधी 
बिलोली- देविदास कोंडलाडे
दि.22 नोव्हेंबर रोजी बिलोली तालुक्यातील सगरोळी विश्व हिंदू परिषद - बजरंग दल भरती आभियानास मराठवाड्यात प्रारंभ झाला असून या आभियानास दि.19 नोव्हें ते 6 डिंसे 2017 पर्यत चालणार आहे.तरी सगरोळीत आभियानास प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याची माहीती विहिप धर्म प्रसार जिल्हा प्रमुख विठ्ठल तुकडेकर यांनी दिली.
प्रसिद्धीस दिलेल्या पञकात म्हटले की, 1964 साली विविध पंथ - संप्रदायाच्या धर्माचार्यानी एकत्र येऊन हिंदू समाजाला संघटित करण्यासाठी विश्व हिंदू  परिषदेची स्थापना झाली.1980 नंतर सुरू झालेले अयोध्येच्या रामजन्मभुमी मुक्तीचे आंदोलन हा विश्व हिंदू परिषदेच्या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा होता.त्या दरम्यान अनेक संघर्षाचे प्रसंगही उध्वभू लागले त्या प्रसंगाना सामोरे जाण्यासाठी अर्थातच युवाशक्ती संघटित होणे आवश्यक होते. त्यामुळे रामजन्मभुमी मुक्ती आंदोलनात सहभागी असलेल्या युवकांनी संतांच्या मार्गदर्शनाखाली 1984 साली बजरंग दलाची स्थापना केली.
    अखिल भारतीय अधिवेशनात गाय नही फटने देंगें, देश नही फटने देंगेंच्या जयघोषात बजरंग दलाच्या शाखा देशभर सर्व प्रांतात सुरू करण्याचे ठरले व त्यानुसार महाराष्ट्रातही बजरंग दल कार्यरत असल्याची माहीती देण्यात आली. बजरंग दलाचे कार्यकर्ते गोवंशाच्या रक्षणासाठी प्राणांची बाजू काम करीत असतात. धर्मांतर थांबविण्याठी काम करत असतात व आपल्या समाजाची सेवा करणे हे आपले कर्तव्यच असल्याचे समजून रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे व विविध कार्यक्रम राबवित असतात देशाच्या आखंतेसाठी, मठ - मंदिराच्या सेवाकामे करीत रक्षणासाठी, युवकांमधे राष्ट्रभक्ती जाणवून भारतमातेला विश्वगुरू बनविण्यासाठी बजरंग दलाच्या कामात सहभागी होतात. या कार्यक्रमात प्रमोदराव  देशमुख व भरडे सावकार यांनी बजरंगदलाच्या विविध कार्यक्रम - उपक्रमात सहभागी कार्यकत्यांना एकत्र  होऊन देश व धर्मा आधारित मार्गदर्शन केले. याप्रसंगी कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे  व्यंकटराव भरडे,सतिष गौड, आडकेश्वर गोपाळ,शिवसेना उपजिल्हा प्रमुख विश्वनाथ समन पा.यांची उपस्थिती होती.विश्व हिंदू परिषद धर्म प्रसार जिल्हा प्रमुख विठ्ठल तुकडेकर,बजरंग दलाचे जिल्हा संयोजक गजानन पांचाळ, अध्यक्ष - मनोहर देगलूरे, ता.प्रमुख नागु महाराज,बजरंग दल ता. संयोजक अनिल,बजरंग दल शाखा सगरोळी ता.संयोजक भगत ठाकुर, भुमा वांगेवाड, सचिन बोईनवाड,सगरोळीचे युवा कार्यकर्ते स्वरूप जाधव पा.आदी कार्यकर्ते उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _______

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _________________________ मुंबई  - नंदु नाईक सांगलीत ऐन दिवाळीमध्ये ट्रक उलटून झालेल्या अपघातात दहा मजुरांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्तकेली जात आहे. एसटीच्या संपामुळे खाजगी वाहतुकीने प्रवास करणं मजुरांच्या जीवावर बेतल्याचं म्हटलं जात आहे. तासगांव-कवठेमहांकाळ मार्गावर योगेवाडी गावाजवळ पहाटे 2 ते 3 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. एसटी कर्मचाऱ्यांनी सकाळी संप मागे घेतला, मात्र काल एसटी बंद असल्यामुळे खाजगी ट्रक मधून कर्नाटक मधील काही मजूर कराडकडे मजुरीसाठी जात होते. योगेवाडी गावाजवळ चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक उलटला. ट्रकमधील फरशीखाली सापडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी आहेत. जखमींना मिरजेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताच्या वेळी ट्रक मध्ये 18 ते 20 प्रवासी होते. त्यामुळे ट्रकखाली आणखी काही प्रवासी अडकल्याची  भीती व्यक्त केली जात आहे.

आंदोलकांवर दाखल केलेली गुन्हे तात्काळ मागे घ्या-इंडियन पँथर् सेना..!

बिलोली प्रतिनिधी - वैभव घाटे भीमाकोरेगाव येथे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या व असावध असलेल्या भिमसैनिकांवर काही मनुवादी पिलावळीच्या लोकांकडून जीवघेणा भ्याड हल्ला झाला.यात एका भीमसैनिकाचा जागीच म्रुत्यू झाला तर हजारो लोकांना किरकोळ जखमा झाल्या.याचा निषेध म्हणून भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.बाळासाहेब आंबेडकरांनी 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली.        काही ठिकाणचा अपवाद वगळता हा बंद शांततेत झाला.तरी पोलीसांकडून अतिसंवे दनशील भागात कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले.आणि यात हजारो निष्पाप तरुण व महिलांना घरात शिरून मारण्यात आल.यात हदगाव येथील जाधव कुटुंबाने आपला 15 वर्षाचा मुलगा गमावला.सरकारच्या सांगण्यावरून पोलीस प्रशासन भीम सैनिकांच्या जीवावर बेतले असून कल्याण कोळसेवाडी येथील 48 व इतर 92 आंदोलकांवर कलम 307 हा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला.यावेळी पत्रकारांशी बोलतांना संविधान दुगाने म्हणाले की,मला पोलीस प्रशासनाने याचे उत्तर द्यावे की 2012 पासून आज पर्यंत किती बंद पाळण्यात आले?आजपर्यंत किती आंदोलकांवर गुन्हे दाखल ...
गुत्तेदार व बांधकाम विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात बिलोली तहसील समोर दुगाने चे  अमरण उपोषण सुरु. बिलोली प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड अंतर्गत चालू असलेल्या बिलोली ते देगलूर दरम्यान रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम विलास पाटील टाकळीकर यांच्या लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कडून गेल्या अनेक महिन्यांपासून चालू आहे.मात्र हे काम पूर्णपणे बोगस व निकृष्ट दर्जाचे होत आहे.याची कल्पना तीन महिन्यापूर्वी पासून उपोषणकर्ते  संविधान दुगाने यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला लेखी तक्रार देऊन रस्त्यांच्या चौकशीची मागणी केली होती.मात्र या तक्रारी अर्जाला केराची टोपली दाखवत बांधकाम विभागाने संबधित गूत्तेदाराला पाठीशी घातल्याचा आरोप दुगाणेनी केला आहे.      एकीकडे खड्डेमुक्त रस्ते  व अपघाताचे प्रमाण कमी करू पाहणाऱ्या महाराष्ट्र शासन व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना आगामी दोन वर्षासाठीे खड्डेमुक्त रस्ता हे अभियान राबवावे लागेल यात शंका नाही.कारण बिलोली- देगलूर हा राज्य महामार्ग असून हा रस्ता आंध्र,तेलंगण व कर्नाटक राज्यांना जोड़न...