मुख्य सामग्रीवर वगळा

बिलोलीत भारीपच्या वतीने संविधान गौरव दिन साजरा. संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करून डॉ.बाबासाहेबांना अभिवादन.....!





बिलोली प्रतिनिधी 
ज्यांना वर्गात बसून शिकण्याची मुभा नव्हती ज्यांच्या सावलीचाही विँटाळ मानला जायचा त्याच युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी भारताला जगातील सर्वश्रेष्ठ संविधान 2 वर्ष 11 महीने आणि 17 दिवसाच्या कालावधीत पूर्ण करून 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाला बहाल केला.तोच दिवस संविधान गौरव दिन म्हणून संपूर्ण देशभरात साजरा करून डॉ.बाबासाहेबांना अभिवादन या दिवशी करतात.
  यावेळी जाणीव पूर्वक प्रशासनातील पदाधिकाऱ्याना पाचारण करण्यात आले होते.यावेळी पोलिस निरीक्षक मा.भगवान धबडगे,सपोनी सोमनाथ शिंदे,नायब तहसीलदार मा.मामिड्वार यांना पाचारण करण्यात आले होते.कारण डॉ.बाबासाहेब म्हणाले होते की,संविधान कितीही चांगले असो ते राबवनाऱ्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते जर प्रामाणिक असतील तर संविधान चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही.पण या उलट जर संविधान राबवणारे जर अप्रामाणिक असतील तर वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही.म्हणून प्रशासनातील अधिकारी व सत्ताधारी लोकाना पाचारण भारीप बहुजन महासंघ ता.बिलोलीने केले होते.
     या कार्यक्रमासाठि भारीपचे जिल्हा प्रवक्ता डॉ.प्रा.बलभीम वाघमारे,बिलोलीचे माजी नगराध्यक्ष भीमराव जेठे,जि.सचिव संजय जाधव,प्रा.धम्मपाल जाधव,ता.अध्यक्ष धम्मदीप गावंडे,वारणेचा वाघ संघटनेचे संविधान दुगाने,ताणूबाई साळवे पत्रकार संघाचे सं.अध्यक्ष वल्लीओद्दीन फारुखी,नगरसेवक आजमद चाउस,तेलंगणचे पांडु अण्णा,पत्रकार रत्नाकर जाधव,भारतीय बौद्ध महासभेचे ता.अध्यक्ष बालाजी नरहरे,लक्ष्मण जाधव,बौद्धाचार्य गौलवाड सर,प्रा.मारोती भदरगे,संपादक यादव लोकडे,सम्राटचे ता.प्रतिनिधि भास्कर भेदेकर,पाशा पटेल ,शहर अध्यक्ष संघपाल जाधव,किशोर पोवाडे,मुन्ना पोवाडे,धम्मपाल भुसावळे, सुनिल प्रचंड,कुणाल सोनकांबळे,भारीप धर्माबादचे गंगाधर हानमंत्ते,शिवाजी विचारे,माधव बावलगावे,व आदि संविधान प्रेमी व सामाजिक कार्यकर्ते,व पत्रकार बांधव यावेळी उपस्तीथ होते.मान्यवर व प्रमुख पाहून्याच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तद्नंतर प्रा.डॉ बलभीम वाघमारे,माजी नगराध्यक्ष भीमराव जेठे,पाशाभाई पटेल यांनी मनोगत व्यक्त केले.
  या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्तावीक  संविधान दुगाने यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.धम्मपाल जाधव केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _______

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _________________________ मुंबई  - नंदु नाईक सांगलीत ऐन दिवाळीमध्ये ट्रक उलटून झालेल्या अपघातात दहा मजुरांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्तकेली जात आहे. एसटीच्या संपामुळे खाजगी वाहतुकीने प्रवास करणं मजुरांच्या जीवावर बेतल्याचं म्हटलं जात आहे. तासगांव-कवठेमहांकाळ मार्गावर योगेवाडी गावाजवळ पहाटे 2 ते 3 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. एसटी कर्मचाऱ्यांनी सकाळी संप मागे घेतला, मात्र काल एसटी बंद असल्यामुळे खाजगी ट्रक मधून कर्नाटक मधील काही मजूर कराडकडे मजुरीसाठी जात होते. योगेवाडी गावाजवळ चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक उलटला. ट्रकमधील फरशीखाली सापडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी आहेत. जखमींना मिरजेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताच्या वेळी ट्रक मध्ये 18 ते 20 प्रवासी होते. त्यामुळे ट्रकखाली आणखी काही प्रवासी अडकल्याची  भीती व्यक्त केली जात आहे.

आंदोलकांवर दाखल केलेली गुन्हे तात्काळ मागे घ्या-इंडियन पँथर् सेना..!

बिलोली प्रतिनिधी - वैभव घाटे भीमाकोरेगाव येथे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या व असावध असलेल्या भिमसैनिकांवर काही मनुवादी पिलावळीच्या लोकांकडून जीवघेणा भ्याड हल्ला झाला.यात एका भीमसैनिकाचा जागीच म्रुत्यू झाला तर हजारो लोकांना किरकोळ जखमा झाल्या.याचा निषेध म्हणून भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.बाळासाहेब आंबेडकरांनी 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली.        काही ठिकाणचा अपवाद वगळता हा बंद शांततेत झाला.तरी पोलीसांकडून अतिसंवे दनशील भागात कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले.आणि यात हजारो निष्पाप तरुण व महिलांना घरात शिरून मारण्यात आल.यात हदगाव येथील जाधव कुटुंबाने आपला 15 वर्षाचा मुलगा गमावला.सरकारच्या सांगण्यावरून पोलीस प्रशासन भीम सैनिकांच्या जीवावर बेतले असून कल्याण कोळसेवाडी येथील 48 व इतर 92 आंदोलकांवर कलम 307 हा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला.यावेळी पत्रकारांशी बोलतांना संविधान दुगाने म्हणाले की,मला पोलीस प्रशासनाने याचे उत्तर द्यावे की 2012 पासून आज पर्यंत किती बंद पाळण्यात आले?आजपर्यंत किती आंदोलकांवर गुन्हे दाखल ...
गुत्तेदार व बांधकाम विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात बिलोली तहसील समोर दुगाने चे  अमरण उपोषण सुरु. बिलोली प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड अंतर्गत चालू असलेल्या बिलोली ते देगलूर दरम्यान रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम विलास पाटील टाकळीकर यांच्या लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कडून गेल्या अनेक महिन्यांपासून चालू आहे.मात्र हे काम पूर्णपणे बोगस व निकृष्ट दर्जाचे होत आहे.याची कल्पना तीन महिन्यापूर्वी पासून उपोषणकर्ते  संविधान दुगाने यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला लेखी तक्रार देऊन रस्त्यांच्या चौकशीची मागणी केली होती.मात्र या तक्रारी अर्जाला केराची टोपली दाखवत बांधकाम विभागाने संबधित गूत्तेदाराला पाठीशी घातल्याचा आरोप दुगाणेनी केला आहे.      एकीकडे खड्डेमुक्त रस्ते  व अपघाताचे प्रमाण कमी करू पाहणाऱ्या महाराष्ट्र शासन व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना आगामी दोन वर्षासाठीे खड्डेमुक्त रस्ता हे अभियान राबवावे लागेल यात शंका नाही.कारण बिलोली- देगलूर हा राज्य महामार्ग असून हा रस्ता आंध्र,तेलंगण व कर्नाटक राज्यांना जोड़न...