मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जिल्हाअध्यक्षपदी गिरीष कुरुडे

सगरोळी  प्रतिनिधी (वैभव घाटे) बिलोली तालुक्यातील बामणी (बु.) येथिल वनपरिक्षेञाचे वनरक्षक गिरीष कुरुडे यांची प्रादेशिक विभाग औरंगाबाद अंतर्गत येत असलेल्या कास्ट्राईब वनविभाग संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नांदेड येथिल वनविभाग कार्यालयात विभागीय अध्यक्ष सुमीत भुईगळ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत कुरुडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.या निवडीबद्दल वनपरिक्षेञ अधिकारी शिवानंद कोळी,मारोती मानगरवाड,बाळासाहेब कांबळे,प्रदीप चारसे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

कोल्हेबोरगाव ग्रामपंचायत सदस्यांचा राजीनामा बिलोली प्रतिनिधी (विजय सुर्यवंशी)

कोल्हेबोरगाव ग्रामपंचायत सदस्यांचा राजीनामा बिलोली प्रतिनिधी (विजय सुर्यवंशी) कोल्हेबोरगाव येथील ग्रामपंचायत सदस्य  अरविंद कांबळे यांनी  सत्तत ग्रामपंचायतीला पाठपुरावा करुण सुध्दा सन 2015 ते 2020 या काळात दलित वस्तीमध्ये एक हि विकास कामे केलेले नाहीत सरपंच व ग्रामसेवक सदास्यांना विश्वासात न घेता त्यांची मनमानी कारभार करत आसतात पंचायत राज्य व्यवस्थेमध्ये ग्रामिण भागात ग्रामपंचायत खुप महत्वाची भुमिका बजवतात पण येथिल सरपंच ग्रामसेवक यांच्या एकमुठी धोरणामुळे थेथिल जनता ञास झाली आहे शासन दलित वस्तीचा विकास कामासाठी लाखो रुपये निधी देतो  पण ग्रामसेवकांच्या भ्रष्टाचारामुळे निधीची व्हिलेवाट लावतात ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून कोलेहेबोरगाव येथिल ग्रा.पं.सदस्य अरविंद कांबळे यांनी  गटविकास अधिकाऱ्यांकडे सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहेत. सरपंच व ग्रामसेवकांकडून त्यांच्या प्रभागात कामे केली जात नसल्याने नागरिकांची नाराजी वाढत असल्याने हे राजीनामे देण्यात आले आहेत.कोल्हेबोरगाव येथील ग्रामपंचायतीची निवडणूक 2015 ला झाली असून   सरपंच व ग्रामसेवक विविध योजना ...

रोगराई टाळण्यासाठी बेटमोगरा ग्राम पंचायत च्या वतीने गावभर केली जांतूनाशेक फवारणी.

मुखेड प्रतिनिधी / भारत सोनकांबळे  तालुक्यातील बेटमोगरा येथील ग्राम पंचायत कार्यालय च्या माध्यमातून गावचे सरपंच सौ. पद्मजा खुशालराव पाटील, ग्रामसेवक श्री.स्वामी व ग्राम पंचायतच्या सर्व सदस्यांच्या मार्फत गावातील रोगराई टाळण्यासाठी तिन पावर स्प्रेव्दारे औषधीची फवारणी सोमवार (ता.३०) रोजी केली असल्याचे सरपंच प्रतिनिधी खुशाल जी पाटील यांनी माहिती दिली आहे.   मुखेड तालुक्यातील मौजे बेटमोगरा येथे कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी व तसेच रोगराई टाळण्यासाठी गाव स्वच्छ ठेवा रोगराई पळवा हे ब्रिद वाक्य घेऊन बेटमोगरा येथे ग्राम पंचायत कार्यालय यांच्या माध्यमातून गावात रोगराईला वेळीच प्रतिबंध घालण्यासाठी गावचे सरपंच सौ पद्मजा खुशालराव पाटील यांनी पुढाकार घेत पावर स्प्रे पंपा व्दारे सोडियम हायपोक्लाराईडची (पावडर) फवारणी केली आहे. ग्राम पंचायत कार्यालय यांच्या या उपक्रमाचे बेटमोगरा येथील शिवलिंग बादशहा मठाचे मठाधिपती श्री.सिध्द दयाळ शिवाचार्य महाराज,गावातील प्रतिष्ठित व्यक्ती श्री. चिनू पाटील,शिवाजी माधवराव पाटील,ग्रा.पं. सदस्या लालिताबाई सोनकांबळे,कृ.उ.बाजार समितीचे संचालक दत्तात्...
गंजगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंती उत्सहात साजरी करण्यात आली बिलोली - गंजगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे महात्मा बसवेश्वर महाराजां...

आंदोलकांवर दाखल केलेली गुन्हे तात्काळ मागे घ्या-इंडियन पँथर् सेना..!

बिलोली प्रतिनिधी - वैभव घाटे भीमाकोरेगाव येथे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या व असावध असलेल्या भिमसैनिकांवर काही मनुवादी पिलावळीच्या लोकांकडून जीवघेणा भ्याड हल्ला झाला.यात एका भीमसैनिकाचा जागीच म्रुत्यू झाला तर हजारो लोकांना किरकोळ जखमा झाल्या.याचा निषेध म्हणून भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.बाळासाहेब आंबेडकरांनी 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली.        काही ठिकाणचा अपवाद वगळता हा बंद शांततेत झाला.तरी पोलीसांकडून अतिसंवे दनशील भागात कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले.आणि यात हजारो निष्पाप तरुण व महिलांना घरात शिरून मारण्यात आल.यात हदगाव येथील जाधव कुटुंबाने आपला 15 वर्षाचा मुलगा गमावला.सरकारच्या सांगण्यावरून पोलीस प्रशासन भीम सैनिकांच्या जीवावर बेतले असून कल्याण कोळसेवाडी येथील 48 व इतर 92 आंदोलकांवर कलम 307 हा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला.यावेळी पत्रकारांशी बोलतांना संविधान दुगाने म्हणाले की,मला पोलीस प्रशासनाने याचे उत्तर द्यावे की 2012 पासून आज पर्यंत किती बंद पाळण्यात आले?आजपर्यंत किती आंदोलकांवर गुन्हे दाखल ...

नागरिकांनो महाराष्ट्र पोलीस सिटीझन पोर्टल ॲपचा वापर करा - धबडगे

बिलोली :- वैभव घाटे ‘महाराष्ट्र पोलीस सिटीझन पोर्टल ॲप’ मुळे सामान्य नागरिक अधिक सक्षम तर पोलीस प्रशासनास काम करण्यास मोठी मदत मिळणार आहे त्यामुळे नागरिकांनी आपल्या स्मार्ट फोनमध्ये हा अँप डाऊनलोड करून या अँपच्या माध्यमातून गुन्हे विषयक कोणताही रेकार्ड ऑनलाईन पाहणे, ऑनलाईन तक्रार दाखल करणे, तपासाची स्थिती जाणून घेणे या बाबी सहज उपलब्ध होणार आहेत त्यामुळे या अँप चा मोठ्या प्रमाणात प्रसार करावे असे आदेश पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मिना यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय  पोलिस कार्यालय व पोलिस ठाणे यांना पत्रकाद्वारे कळविले होते. पोलिस अधिक्षकांनी दिलेल्या आदेशाचे पालन करत बिलोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे व पोलिस अधिक्षक यांनी या अँपचे जास्तीतजास्त नागरिकांनी "महाराष्ट्र पोलिस सिटीझन पोर्टल अँप" चा वापर करावे असे अवाहन केले आहे. महाराष्ट्रात गुन्ह्यांचा आलेख कमी करण्यासाठी पोलीस प्रशासन वेगवेगळया उपाययोजना राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे मोबाईल ॲप पोलीस विभागाने विकसित केले आहे. महाराष्ट्र सारख्या मोठया राज्यासाठी हे काम अतिशय कठीण होते. मात्र पोलीस विभागाच...

बिलोली तहसिल कार्यालयात मौखिक आरोग्य तपासणी शिबीर संपन्न बिलोलीच्या ग्रामीण रूग्णालयना राबविली मोहीम

  बिलोली :- वैभव घाटे तालुक्यातील ग्रामीण रूग्णालय बिलोलीच्या वतिने आज शुक्रवार दि २९ डिसेंबर रोजी बिलीली तहसिल कार्यालयात मौखिक आरोग्य तपासणी शिबीर राबविण्यात आली. या शिबीरात तहसिल कार्यालयात सर्व कर्मचा-यांची दंत तपासणी सह इतर आजारांची तपासणी करण्यात आली. मौखिक आरोग्य तपासणीतून पुढील उपचाराची गरज भासणऱ्यांची स्वतंत्र यादी करून संदर्भसेवा उपलब्ध करून दिली जाणार असून अशा रूग्णांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात येणार असल्याचे डाँ पुजा भाकरे यांनी यावेळी सांगितले. तर शासकिय अधिकारी व्यसनापासून दूर राहिल्यास कर्मचा-यांवर प्रभाव असू शकतो त्यामुळे शक्यतो शासकिय कर्मचा-यांनी धुम्रपान करू नये अशी सुचना करत तहसिल कार्यालय परिसरात धुम्रपान जनजागृती चे फलक लावले जावे असे बिलोली ग्रामीण रूग्णालयाचे अधिक्षक डाँ नागेश लखमावाड यांनी सुचविले. यावेळी उपविभागीय अधिकारी निवृत्ती गायकवाड , तहसिलदार विनोद गुंडमवार , नायब तहसिलदार नागमवाड ,  ओमप्रकाश गौड , चव्हाण साहेब , नरावाड साहेब ,  डाँ शामला ढवळे , दिनेश तळणे यांच्यासह अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते.