मुख्य सामग्रीवर वगळा

जास्त नफा मिळवण्यासाठी सीताफळ प्रक्रिया करणे गरजेचे - सौ. श्रद्धा रोहित देशमुख संचालिका

जास्त नफा मिळवण्यासाठी सीताफळ प्रक्रिया करणे गरजेचे - सौ. श्रद्धा रोहित देशमुख संचालिका           

विभागीय सीताफळ कार्यशाळेत सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळाचा सहभाग


बिलोली प्रतिनिधी 

 औरंगाबाद येथील तापडिया नाट्यगृह येथे दि. ३० ऑक्टोबर २०१७ रोजी,  पहिली “विभागीय सीताफळ कार्यशाळा” महाराष्ट्र शासन व चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अग्रीकल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली. या कार्यशाळेसाठी यशस्वी प्रक्रिया महिला उद्योजक म्हणून संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी येथील उत्कर्ष अॅग्रो इंडस्ट्रीज आणि ट्रेनिंग सेन्टरच्या संचालिका सौ. श्रद्धा रोहित देशमुख यांना आमंत्रित केले होते.
या कार्यशाळेचे उद्घाटन मा. डॉ. पुरुषोत्तम भापकर, विभागीय आयुक्त, औरंगाबाद आणि श्री नवलकिशोर राम, जिल्हाधिकारी, औरंगाबाद यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी सौ. श्रद्धा रोहित देशमुख यांनी त्यांच्या उत्कर्ष अॅग्रो इंडस्ट्रीज आणि ट्रेनिंग सेन्टरची स्थापना व वाटचाल याबद्दल सविस्तर अनुभव सांगितले तसेच प्रक्रिया उद्योगातील त्यांचे अनुभव कथन केले. सध्याच्या काळात जास्त नफा मिळवण्यासाठी सीताफळ प्रक्रिया करणे गरजेचे आहे हे देखील उपस्थित शेतकऱ्यांना पटवून सांगितले.  या सोबतच प्रा. माधुरी रेवनवार गृह विज्ञान विषयतज्ञ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी यांनी उत्कर्ष अॅग्रो इंडस्ट्रीजच्या उत्पादनांची माहिती मान्यवरांना तसेच शेतकऱ्यांना प्रदर्शनामध्ये दिली. यामध्ये सीताफळाचा गर आणि त्यापासून तयार केलेला मिल्कशेक विक्रीसाठी ठेवण्यात आला. त्यात शेतकऱ्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला.
या प्रसंगी  श्री ज्ञानेश्वर नमाणे (संचालक सीताफळ संघ, सासवड), डॉ. एम बी पाटील (प्रभारी अधिकारी, फळ संशोधन केंद्र, हिमायतबाग, औरंगाबाद), श्री नवनाथ कसपटे (अध्यक्ष, आखिल भारतीय सीताफळ संघ), श्री फरसुले (उद्योजक, औरंगाबाद), श्री संजय मोरे (शेतीनिष्ट पुरस्कार प्राप्त शेतकरी) आणि श्री संजय पडवळ (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी औरंगाबाद ) हे व्यासपीठावर उपस्थित होतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _______

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _________________________ मुंबई  - नंदु नाईक सांगलीत ऐन दिवाळीमध्ये ट्रक उलटून झालेल्या अपघातात दहा मजुरांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्तकेली जात आहे. एसटीच्या संपामुळे खाजगी वाहतुकीने प्रवास करणं मजुरांच्या जीवावर बेतल्याचं म्हटलं जात आहे. तासगांव-कवठेमहांकाळ मार्गावर योगेवाडी गावाजवळ पहाटे 2 ते 3 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. एसटी कर्मचाऱ्यांनी सकाळी संप मागे घेतला, मात्र काल एसटी बंद असल्यामुळे खाजगी ट्रक मधून कर्नाटक मधील काही मजूर कराडकडे मजुरीसाठी जात होते. योगेवाडी गावाजवळ चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक उलटला. ट्रकमधील फरशीखाली सापडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी आहेत. जखमींना मिरजेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताच्या वेळी ट्रक मध्ये 18 ते 20 प्रवासी होते. त्यामुळे ट्रकखाली आणखी काही प्रवासी अडकल्याची  भीती व्यक्त केली जात आहे.

आंदोलकांवर दाखल केलेली गुन्हे तात्काळ मागे घ्या-इंडियन पँथर् सेना..!

बिलोली प्रतिनिधी - वैभव घाटे भीमाकोरेगाव येथे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या व असावध असलेल्या भिमसैनिकांवर काही मनुवादी पिलावळीच्या लोकांकडून जीवघेणा भ्याड हल्ला झाला.यात एका भीमसैनिकाचा जागीच म्रुत्यू झाला तर हजारो लोकांना किरकोळ जखमा झाल्या.याचा निषेध म्हणून भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.बाळासाहेब आंबेडकरांनी 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली.        काही ठिकाणचा अपवाद वगळता हा बंद शांततेत झाला.तरी पोलीसांकडून अतिसंवे दनशील भागात कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले.आणि यात हजारो निष्पाप तरुण व महिलांना घरात शिरून मारण्यात आल.यात हदगाव येथील जाधव कुटुंबाने आपला 15 वर्षाचा मुलगा गमावला.सरकारच्या सांगण्यावरून पोलीस प्रशासन भीम सैनिकांच्या जीवावर बेतले असून कल्याण कोळसेवाडी येथील 48 व इतर 92 आंदोलकांवर कलम 307 हा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला.यावेळी पत्रकारांशी बोलतांना संविधान दुगाने म्हणाले की,मला पोलीस प्रशासनाने याचे उत्तर द्यावे की 2012 पासून आज पर्यंत किती बंद पाळण्यात आले?आजपर्यंत किती आंदोलकांवर गुन्हे दाखल ...
गुत्तेदार व बांधकाम विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात बिलोली तहसील समोर दुगाने चे  अमरण उपोषण सुरु. बिलोली प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड अंतर्गत चालू असलेल्या बिलोली ते देगलूर दरम्यान रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम विलास पाटील टाकळीकर यांच्या लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कडून गेल्या अनेक महिन्यांपासून चालू आहे.मात्र हे काम पूर्णपणे बोगस व निकृष्ट दर्जाचे होत आहे.याची कल्पना तीन महिन्यापूर्वी पासून उपोषणकर्ते  संविधान दुगाने यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला लेखी तक्रार देऊन रस्त्यांच्या चौकशीची मागणी केली होती.मात्र या तक्रारी अर्जाला केराची टोपली दाखवत बांधकाम विभागाने संबधित गूत्तेदाराला पाठीशी घातल्याचा आरोप दुगाणेनी केला आहे.      एकीकडे खड्डेमुक्त रस्ते  व अपघाताचे प्रमाण कमी करू पाहणाऱ्या महाराष्ट्र शासन व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना आगामी दोन वर्षासाठीे खड्डेमुक्त रस्ता हे अभियान राबवावे लागेल यात शंका नाही.कारण बिलोली- देगलूर हा राज्य महामार्ग असून हा रस्ता आंध्र,तेलंगण व कर्नाटक राज्यांना जोड़न...