मुख्य सामग्रीवर वगळा

वनपाल व वनरक्षक यांच्या बेजबाबदार पणामुळे होत आहे बेसुमार वृक्षांची कत्तल बिलोली प्रतिनिधी (वैभव घाटे)

 






बिलोली प्रतिनिधी (वैभव घाटे) 

बिलोली तालुक्यात  बेसुमार वृक्षांची कत्तल होत असून, प्रतिदिनी मोठ्या प्रमाणात कत्तल केलेल्या वृक्षांची निर्यात अनेक वाहनांद्वारे शेजारील तेलंगाना राज्यात केल्या जात आहे. सदरील प्रकरणाकडे मात्र वन विभाग हेतू परस्पर  दुर्लक्ष करीत असून वन विभागाचा एक कर्मचारी लाकडांची वाहतुक करणा-या वाहनधारकां कडून एंट्री वसूल करत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यावरून वनविभागाचा "वृक्षवल्ली आम्हा सोयरे" चा नारा कागदोपत्रीच दिसत असल्याची बाब स्पष्ट होत आहे. वन विभागा मार्फत सन १९८३ पासून तालुक्यात प्लानटेशन वेगवेगळ्या जातीच्या वृक्षाच्या रोपाची लागवड करण्यात आली. परंतु आज पर्यंत तालुक्यातील वनविभागात झाडे दिसत नाही. पण शेतक-यांच्या बांधावर हजारो झाडे दिसतात.बेसुमार वृक्ष तोडीमुळे निसर्गावर होणारा दुष्परिणाम आज देशाला भोगावा लागत आहे. एकेकाळी उन्हाळ्यात ४०% तापमान असतांना आज घाडीला ४५ % वर तापमानावर येवून ठेपले आहे. तालुक्यात बेसुमार वृक्ष तोडीमुळे वन उद्ध्वस्त होत आहेत. वन विभागाकडून एकी कडे " झाडे लावा झाडे जगवा"  असा संदेश दिला  जात असतांना मात्र तेलंगाना सिमेवरील बिलोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोडीचा प्रकार निदर्शनास येत आहे. येथून साईजचा माल विक्रीस तेलंगणा राज्यात जात असतांना चेकपोष्ट वरुन जात असतांना अधिकारी बघ्याची भुमीका घेत आहेत.  त्यावरून झाडे तोडा... तुम्ही जगा अन् आम्हाला जगवा अशी उलट परिस्थिती वन विभागाच्या बाबतीत पहावयास मिळत आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांची आवश्यकता असून राज्यात कु-हाड बंदीचा नियम लागु करण्याची मागणी  होत असून जिल्हा प्रशानाने याकडे गांभिर्याने घेणे गरजेचे आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बिलोली तहसिलचा सैराट कारभार सुरुच.

बिलोली तहसिलचा सैराट कारभार सुरुच.  बिलोली प्रतिनिधी- वैभव घाटे  गेल्या अनेक दिवसांपासून बिलोली तहसिल कार्यालयातील कर्मचारी निवासी न राहता नांदेड सारख्या शहरात राहून येजा करीत असल्याने तहसिल कार्यालयाचे अनेक कामे वेळेत होत नसल्यामुळे जनतेची कामे खोळंबत असल्याने पत्रकार  संरक्षण समिती  बिलोली च्या वतिने विभागीय अधिकारी बिलोली यांना निवेदन देण्यात आले. बिलोली तहसिल कार्यालयाचे तहसिलदार विनोद गुंडमवार हे बिलोली तहसिल येथे रुजू झाल्यापासून आजतागायत तहसील कार्यालयात नांदेड येथून ये-जा करीत आहेत. याचेच अनुकरण नायब तहसीलदार हे देखील नांदेड येथून ये-जा करित असुन मुख्यालया राहत नसूनही शासनाकडून घरभाडे उचल करीत शासनाची दिशाभूल करीत आहेत याचाच अर्थ उंटावरुन शेळ्या हाकण्यासारखा कारभार सदरील तहसील कर्मच्यार्यांचा झाला आहे. यामुळे तालुक्यातील निराधार, विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर व बिलोली तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीचा प्रसंग उद्भवल्यास याला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न तहसिलदार ये-जा करीत आसल्या कारणांमुळे अनेक कामे खोळंबत असल्याने जनतेची गैरसोय होत आहे.  बिलोली तालुक्यातील जनतेची गैरसोय दुर क

*लाच घेणा-या महिला गृहपालास रंगेहाथ पकडले

* लाच घेणा-या महिला गृहपालास रंगेहाथ पकडले*   * नांदेड :-  वैभव घाटे*  मेसचे बिल मंजूर करण्यासाठी गृहपाल किशोरी अलोने यांना २० हजाराची लाच स्वीकारताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. हदगाव येथील समाज कल्याण विभागाच्या मुलीच्या वसतिगृहात त्या कार्यरत असून याच ठिकाणी त्यांना पकडण्यात आले.     हदगाव येथे समाज कल्याण विभागाचे मुलींचे वसतिगृह आहे. येथे ८ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थिनी राहत असून किशोरी अलोने या गृहपाल आहेत. वसतिगृहात कार्यरत असलेल्या खानावळीचे बिल काढताना विद्यार्थिनी उपस्थिती योग्य भरावी भरावी लागते. हि बाब लक्षात घेऊन अलोने यांनी मेस चालकाची अडवणूक करत विद्यार्थिनी उपस्थिती योग्य भरण्यासाठी २० हजार रुपयाची मागणी केली. यानंतर मेस चालकाने याबाबत नांदेड एसीबी कडे तक्रार केली. तक्रारीची शहानिशा करत आज सकाळी ११ वाजता नांदेड एसीबी ने शासकीय वसतिगृह परिसरात सापळा रचला. यावेळी अलोने या मेस चालकाकडून २० हजाराची लाच स्वीकारताना एसिबी च्या जाळ्यात अडकल्या.     याप्रकरणात हदगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा सापळा पोलीस अधीक्षक संजय ला

नागरिकांनो महाराष्ट्र पोलीस सिटीझन पोर्टल ॲपचा वापर करा - धबडगे

बिलोली :- वैभव घाटे ‘महाराष्ट्र पोलीस सिटीझन पोर्टल ॲप’ मुळे सामान्य नागरिक अधिक सक्षम तर पोलीस प्रशासनास काम करण्यास मोठी मदत मिळणार आहे त्यामुळे नागरिकांनी आपल्या स्मार्ट फोनमध्ये हा अँप डाऊनलोड करून या अँपच्या माध्यमातून गुन्हे विषयक कोणताही रेकार्ड ऑनलाईन पाहणे, ऑनलाईन तक्रार दाखल करणे, तपासाची स्थिती जाणून घेणे या बाबी सहज उपलब्ध होणार आहेत त्यामुळे या अँप चा मोठ्या प्रमाणात प्रसार करावे असे आदेश पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मिना यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय  पोलिस कार्यालय व पोलिस ठाणे यांना पत्रकाद्वारे कळविले होते. पोलिस अधिक्षकांनी दिलेल्या आदेशाचे पालन करत बिलोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे व पोलिस अधिक्षक यांनी या अँपचे जास्तीतजास्त नागरिकांनी "महाराष्ट्र पोलिस सिटीझन पोर्टल अँप" चा वापर करावे असे अवाहन केले आहे. महाराष्ट्रात गुन्ह्यांचा आलेख कमी करण्यासाठी पोलीस प्रशासन वेगवेगळया उपाययोजना राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे मोबाईल ॲप पोलीस विभागाने विकसित केले आहे. महाराष्ट्र सारख्या मोठया राज्यासाठी हे काम अतिशय कठीण होते. मात्र पोलीस विभागाच