मुख्य सामग्रीवर वगळा

बिलोली सेवा सहकारी सोसायटीच्या संचालिका श्रीमती मुंडकर न्यायालयात जाणार...! बिलोली तालुक्यातील शेतकरी पिक विमा योजनेच्या लाभापासून वंचित -------------------------------------------------------- बिलोली प्रतिनिधी. नागेश इबितवार

 

खरीप हंगामातील मुग,उडिद,सोयाबीन सह अन्य पिकांचे सततच्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना फटका बसला असला तरी पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळेल ही आशा होती.माञ नुकसान होऊनही तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा अद्याप लाभ मिळाला नाही.अतिवृष्टीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक विम्याची रक्कम मिळावी अन्यथा यासाठी सेवा सहकारी सोसायटी बिलोलीच्या जेष्ठ संचालीका श्रीमती भागरथबाई बसवंतराव मुंडकर या न्यायालयात जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

                              या वर्षीच्या सुरूवातीपासूनच कोरोना विषाणूच्या संक्रमनामुळे शासनाने सर्वत्र लाँकडाऊन केले होते.कोरोनाच्या भितीने सर्वसामान्यासह सर्वच उद्योग धंदे भितीने बंद असताना जगाचा पोशिंदा शेतकरी राजा माञ कोरोनाची तमा न बाळगता अगदी पुर्वी प्रमाणे शेती कामात व्यस्त होता.मृग नक्षञातील पावसानंतर शेतकऱ्यांनी आर्थिक संकटात असतानाही उधार उसनवारी करून आपल्या शेतात विविध पिकांच्या बियाणांची पेरणी केली.  शासनाच्या आवाहनानुसार पिक विमा योजनेचे फाँम भरून पिक विमा कंपनीकडे विमा हप्ता जमा ही केला.खरीप हंगामातील मुग,उडीद,सोयाबीन सह अन्य पिके डोलात असताना तालुक्यासह सर्वञ झालेल्या मुसळधार पावसामुळे हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.झालेल्या नुकसानीबाबत महसुल व कृषी विभागाच्यावतीने पंचनामे करण्यात आले.तर पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे नुकसानीची माहिती देण्याचे सांगण्यात आले,नुकसानीची विमा कंपनीला माहिती देण्यासाठी कंपनीच्यावतीने एक अँप तयार करण्यात आले होते माञ या अँपचे सर्वर योग्य नसल्यामुळे या अँपचा अनेकांना मानसिक त्रास झाला .मग शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक व ई मेल द्वारे पिकाच्या नुकसानीची विमा कंपनीला सविस्तर माहिती दिली.हाता तोंडाशी आलेले पिक अतिवृष्टीने हिरावल्यानंतर पिक विमा योजनेतुन मिळणाऱ्या रक्कमेचा रब्बी हंगामातील पेरणीला उपयोग होईल या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीनेने दगा दिला आहे.रब्बी हंगामाच्या पेरण्या होऊन जवळपास २५ दिवस लोटले असले तरी अध्याप पर्यंत खरीप हंगामातील पिकांच्या झालेल्या नुकसानीचा विमा शेतकऱ्यांना अद्याप प्राप्त झाला नाही. हक्काचे पैसे वेळेवर प्राप्त होत नसतील तर प्रसंगी पिक विमा कंपनी विरोधात न्यायालयात जाणार असल्याची माहिती बिलोली येथील सेवा सहकारी सोसायटीच्या जेष्ठ संचालीका श्रीमती भागरथबाई बसवंतराव मुंडकर यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _______

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _________________________ मुंबई  - नंदु नाईक सांगलीत ऐन दिवाळीमध्ये ट्रक उलटून झालेल्या अपघातात दहा मजुरांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्तकेली जात आहे. एसटीच्या संपामुळे खाजगी वाहतुकीने प्रवास करणं मजुरांच्या जीवावर बेतल्याचं म्हटलं जात आहे. तासगांव-कवठेमहांकाळ मार्गावर योगेवाडी गावाजवळ पहाटे 2 ते 3 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. एसटी कर्मचाऱ्यांनी सकाळी संप मागे घेतला, मात्र काल एसटी बंद असल्यामुळे खाजगी ट्रक मधून कर्नाटक मधील काही मजूर कराडकडे मजुरीसाठी जात होते. योगेवाडी गावाजवळ चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक उलटला. ट्रकमधील फरशीखाली सापडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी आहेत. जखमींना मिरजेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताच्या वेळी ट्रक मध्ये 18 ते 20 प्रवासी होते. त्यामुळे ट्रकखाली आणखी काही प्रवासी अडकल्याची  भीती व्यक्त केली जात आहे.

आंदोलकांवर दाखल केलेली गुन्हे तात्काळ मागे घ्या-इंडियन पँथर् सेना..!

बिलोली प्रतिनिधी - वैभव घाटे भीमाकोरेगाव येथे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या व असावध असलेल्या भिमसैनिकांवर काही मनुवादी पिलावळीच्या लोकांकडून जीवघेणा भ्याड हल्ला झाला.यात एका भीमसैनिकाचा जागीच म्रुत्यू झाला तर हजारो लोकांना किरकोळ जखमा झाल्या.याचा निषेध म्हणून भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.बाळासाहेब आंबेडकरांनी 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली.        काही ठिकाणचा अपवाद वगळता हा बंद शांततेत झाला.तरी पोलीसांकडून अतिसंवे दनशील भागात कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले.आणि यात हजारो निष्पाप तरुण व महिलांना घरात शिरून मारण्यात आल.यात हदगाव येथील जाधव कुटुंबाने आपला 15 वर्षाचा मुलगा गमावला.सरकारच्या सांगण्यावरून पोलीस प्रशासन भीम सैनिकांच्या जीवावर बेतले असून कल्याण कोळसेवाडी येथील 48 व इतर 92 आंदोलकांवर कलम 307 हा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला.यावेळी पत्रकारांशी बोलतांना संविधान दुगाने म्हणाले की,मला पोलीस प्रशासनाने याचे उत्तर द्यावे की 2012 पासून आज पर्यंत किती बंद पाळण्यात आले?आजपर्यंत किती आंदोलकांवर गुन्हे दाखल ...
गुत्तेदार व बांधकाम विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात बिलोली तहसील समोर दुगाने चे  अमरण उपोषण सुरु. बिलोली प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड अंतर्गत चालू असलेल्या बिलोली ते देगलूर दरम्यान रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम विलास पाटील टाकळीकर यांच्या लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कडून गेल्या अनेक महिन्यांपासून चालू आहे.मात्र हे काम पूर्णपणे बोगस व निकृष्ट दर्जाचे होत आहे.याची कल्पना तीन महिन्यापूर्वी पासून उपोषणकर्ते  संविधान दुगाने यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला लेखी तक्रार देऊन रस्त्यांच्या चौकशीची मागणी केली होती.मात्र या तक्रारी अर्जाला केराची टोपली दाखवत बांधकाम विभागाने संबधित गूत्तेदाराला पाठीशी घातल्याचा आरोप दुगाणेनी केला आहे.      एकीकडे खड्डेमुक्त रस्ते  व अपघाताचे प्रमाण कमी करू पाहणाऱ्या महाराष्ट्र शासन व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना आगामी दोन वर्षासाठीे खड्डेमुक्त रस्ता हे अभियान राबवावे लागेल यात शंका नाही.कारण बिलोली- देगलूर हा राज्य महामार्ग असून हा रस्ता आंध्र,तेलंगण व कर्नाटक राज्यांना जोड़न...