मुख्य सामग्रीवर वगळा

**आमदार अंतापुरकर पाहा ह्या रस्ताचे बेहाल**


बिलोली प्रतिनिधी - नागेश इबितवार 

बिलोली तालुक्यातील मौजे. अंजनी ते बामणी  रस्त्याची अतिशय दुरवस्था झालेली असून मागील पाच वर्षा पासून अंजनी फाटा ते बामणी फाट्यापर्यंत  कंट्रक्सनचे काम चालू असुन अंजनी फाटा ते अंजनी पर्यंत डांबरी करणाचे काम झाले आहे परंतु ते काम अतिशय निकृष्ट  दर्जाचे झाले आहे।  सदरील कामाचे गुतेदार स्वत:इंजिनिअर असलेल्याने सहा महिन्यातच ते काम उखडून गिटी वर निघाली आहे याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने का पाटफिरविले आहे असा प्रश्न जनता उपस्थित करत आहे। तसेच अंजनी ते बामणी पर्यंत रोडवर पावसाळ्यात गिटी व मुरुम थातुर माथुर करून टाकण्यात आले होते परंतु ते गिटी उकळून निघाली आहे। त्यामुळे नवतरुण व तालुक्याला जाणाऱ्या प्रवाशांना काटेवरची कसरत व जीवघेणा प्रवास करावा लागत आहे अंजनी ते बामणी पर्यंत गिटी आजूबाजूला पसरल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन  करावा लागतोपोखर्णी फाटा ते बिलोली रस्त्याचे धुळीचे साम्राज्य मोठ्याप्राणावर पसरले असल्याने नागरिकांसह वाहन चालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.बिलोली तालुक्यातील पोखर्णी फाटा ते बिलोली हा ३ किलोमीटरचा अंतर असून या रस्त्याचे काम झाले नसल्यामुळे खड्यात रस्ता शोधावे लागत आहे। गुतेदार व इंजिनिअर यांच्या हातमिळवणी केल्याने  या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे यावर कोणत्याच  प्रकारची व्यवस्थितरीत्या मुरूम व गिटीचा पुरेपूर वापर करण्यात आले नाही।  लाल माती मिश्रीत मुरूम आणि गिटीचा वापर करून  रस्त्याची दबई करण्यात आली असल्याने सद्या या मार्गावर रस्त्यात खडे व खड्यात रस्ता शोधावा लागत आहे त्यामुळे अनावधानाणे या रस्त्यावरील होणारी जिवीत हानी टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग बिलोली यांनी ही बाब गांभीर्याने लक्षात घेऊन रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी जनतेला मधुन होत आहे  रोडवरील  वाहनांमुळे  मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या बाजूला धुळीचे साम्राज्य  पसरल्याने रस्त्यावरील   दुचकीस्वार यांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे।

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _______

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _________________________ मुंबई  - नंदु नाईक सांगलीत ऐन दिवाळीमध्ये ट्रक उलटून झालेल्या अपघातात दहा मजुरांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्तकेली जात आहे. एसटीच्या संपामुळे खाजगी वाहतुकीने प्रवास करणं मजुरांच्या जीवावर बेतल्याचं म्हटलं जात आहे. तासगांव-कवठेमहांकाळ मार्गावर योगेवाडी गावाजवळ पहाटे 2 ते 3 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. एसटी कर्मचाऱ्यांनी सकाळी संप मागे घेतला, मात्र काल एसटी बंद असल्यामुळे खाजगी ट्रक मधून कर्नाटक मधील काही मजूर कराडकडे मजुरीसाठी जात होते. योगेवाडी गावाजवळ चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक उलटला. ट्रकमधील फरशीखाली सापडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी आहेत. जखमींना मिरजेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताच्या वेळी ट्रक मध्ये 18 ते 20 प्रवासी होते. त्यामुळे ट्रकखाली आणखी काही प्रवासी अडकल्याची  भीती व्यक्त केली जात आहे.

आंदोलकांवर दाखल केलेली गुन्हे तात्काळ मागे घ्या-इंडियन पँथर् सेना..!

बिलोली प्रतिनिधी - वैभव घाटे भीमाकोरेगाव येथे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या व असावध असलेल्या भिमसैनिकांवर काही मनुवादी पिलावळीच्या लोकांकडून जीवघेणा भ्याड हल्ला झाला.यात एका भीमसैनिकाचा जागीच म्रुत्यू झाला तर हजारो लोकांना किरकोळ जखमा झाल्या.याचा निषेध म्हणून भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.बाळासाहेब आंबेडकरांनी 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली.        काही ठिकाणचा अपवाद वगळता हा बंद शांततेत झाला.तरी पोलीसांकडून अतिसंवे दनशील भागात कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले.आणि यात हजारो निष्पाप तरुण व महिलांना घरात शिरून मारण्यात आल.यात हदगाव येथील जाधव कुटुंबाने आपला 15 वर्षाचा मुलगा गमावला.सरकारच्या सांगण्यावरून पोलीस प्रशासन भीम सैनिकांच्या जीवावर बेतले असून कल्याण कोळसेवाडी येथील 48 व इतर 92 आंदोलकांवर कलम 307 हा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला.यावेळी पत्रकारांशी बोलतांना संविधान दुगाने म्हणाले की,मला पोलीस प्रशासनाने याचे उत्तर द्यावे की 2012 पासून आज पर्यंत किती बंद पाळण्यात आले?आजपर्यंत किती आंदोलकांवर गुन्हे दाखल ...
गुत्तेदार व बांधकाम विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात बिलोली तहसील समोर दुगाने चे  अमरण उपोषण सुरु. बिलोली प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड अंतर्गत चालू असलेल्या बिलोली ते देगलूर दरम्यान रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम विलास पाटील टाकळीकर यांच्या लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कडून गेल्या अनेक महिन्यांपासून चालू आहे.मात्र हे काम पूर्णपणे बोगस व निकृष्ट दर्जाचे होत आहे.याची कल्पना तीन महिन्यापूर्वी पासून उपोषणकर्ते  संविधान दुगाने यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला लेखी तक्रार देऊन रस्त्यांच्या चौकशीची मागणी केली होती.मात्र या तक्रारी अर्जाला केराची टोपली दाखवत बांधकाम विभागाने संबधित गूत्तेदाराला पाठीशी घातल्याचा आरोप दुगाणेनी केला आहे.      एकीकडे खड्डेमुक्त रस्ते  व अपघाताचे प्रमाण कमी करू पाहणाऱ्या महाराष्ट्र शासन व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना आगामी दोन वर्षासाठीे खड्डेमुक्त रस्ता हे अभियान राबवावे लागेल यात शंका नाही.कारण बिलोली- देगलूर हा राज्य महामार्ग असून हा रस्ता आंध्र,तेलंगण व कर्नाटक राज्यांना जोड़न...