मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

दिवसेंदिवस सोशल मीडियाचा वापर वाढत आहे हे विचार करुणआम्ही हा न्यूज ब्लाॅग सुरू केला आहे

बिलोली तालुका ग्रामसेवक संघटनेच्या सचिव पदी अरुण जमदाडे यांची निवड* बिलोली तालुका प्रतिनिधी/नागेश इबितवार

बिलोली तालुका प्रतिनिधी/नागेश इबितवार येथिल पंचायत समितीच्या सभागृहात आज दि.२ डिसेंबर रोजी तालुका ग्रामसेवक संघटनेच्या महत्वपुर्ण प्रलंबित  पदाच्या नुतन कार्यकारणी निवडी संदर्भात जिल्हाकार्यध्यक्ष धनजय पाटील वडजे यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक  आयोजीत करण्यात आली होती .सदर बैठकीत  सर्वानुमते  नुतन तालुका कार्यकारणीची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आसुन यामध्ये तालुका  सचिव पदी अरुण जमदाडे याची तर  कार्याध्यक्षपदी मुरली उत्तरवाड व उपाध्यक्ष  तानाजी पाटील हांडे , उपाध्यक्ष सौ. कनकावार मॕडम , संघटक - सुवर्णकार तर कोषाध्यक्ष पदी  " निवडी करण्यात आल्या आसुन या वेळी ग्रामसेवक जि.व्ही. ईबिते , देवराव हंबिरे ,सुनिल हाळदेवाड, शिवाजी शिंदे , संदिप मोरे , झरे,श्रीहरी खतगावे , यु.टी.जाधव, किनवाड , डि.एल. वाघमारे , व्हि.वडजे ,बोधले ,हाणमंत  आंबेराव  यांच्यासह आनेकांची उपस्थिती होती.गेल्या काही महीण्यापुर्वी  श्रिनिवास पाटील मुगावे यांची तालुका अध्यक्ष म्हणुन बिनविरोध निवड करण्यात आली होती.तर उर्वरीत नुतन कार्यकारणी निवडी  काही कारणास्तव प्रलंबित होत्या  त्या प्रलबित पदाच्या निवडी आज दि.२ डिसेंब
अलीकडील पोस्ट

शासनाने बाबऴी बंधार्यावर लीफ्ट बसवुन जमीन ओलीता खाले आणावी...!नगराध्यक्षा : सौ.सुरेखा जिठ्ठावार..! कुंडलवाडी प्रतिनिधी :

शासनाने बाबऴी बंधार्यावर लीफ्ट बसवुन जमीन ओलीता खाले आणावी...!नगराध्यक्षा : सौ.सुरेखा जिठ्ठावार..!  कुंडलवाडी प्रतिनिधी :  कुंडलवाडी शहरापासुन पाच ते आठ कि.मी.अंतरावर बांधण्यात आलेल्या बंधारा पाण्यावर लीफ्ट बसवुन जर हजारो एकर जमीन ओलीताखाले आणल्या गेल्यास खर्या अर्थाने इकडील शेतकरी हा सक्षम होईल व कर्जबाजारी राहणार नाही.याचा फायदा अनेक धर्माबादच्या तालुक्यातील काही व बिलोली तालुक्यातील काही अशा अनेक गावाचा पाण्याचा प्रश्न मिटुन हा भाग सुजलाम् सफलाम् होईल. आणी शेतकर्यासह मजुर दारही समाधी जीवन जगेल, शासनाने बाभळी बंधाऱ्यावर लिफ्ट बसवले तर कुंडलवाडी शहर व परिसरातील खेड्यातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याच्या व शेती सिचनांचा प्रश्न मार्गी लागेल. कुंडलवाडी  सोसायटीच्या अतंर्गत च्या लिफ्ट चे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून बाभळी बंधारा परिसरात नवीन  लिफ्ट बसून  बिलोली ,धर्माबाद तालुक्यातील  शेतकऱ्यांच्या शेती सिचनासाठी व जनतेच्या  पिण्याच्या पाण्याच्या कायमचा प्रश्न शासनाने सोडवावा - साईनाथ गोविंदू उत्तरवार -चेअरमन ,विविध कार्यकारी सोसायटी कुंडलवाडी, शासनाने बाभळी बंधाऱ्यावर लिफ्ट बसवले तर कॅनॉल द्व

बिलोली सेवा सहकारी सोसायटीच्या संचालिका श्रीमती मुंडकर न्यायालयात जाणार...! बिलोली तालुक्यातील शेतकरी पिक विमा योजनेच्या लाभापासून वंचित -------------------------------------------------------- बिलोली प्रतिनिधी. नागेश इबितवार

  खरीप हंगामातील मुग,उडिद,सोयाबीन सह अन्य पिकांचे सततच्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना फटका बसला असला तरी पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळेल ही आशा होती.माञ नुकसान होऊनही तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा अद्याप लाभ मिळाला नाही.अतिवृष्टीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक विम्याची रक्कम मिळावी अन्यथा यासाठी सेवा सहकारी सोसायटी बिलोलीच्या जेष्ठ संचालीका श्रीमती भागरथबाई बसवंतराव मुंडकर या न्यायालयात जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.                               या वर्षीच्या सुरूवातीपासूनच कोरोना विषाणूच्या संक्रमनामुळे शासनाने सर्वत्र लाँकडाऊन केले होते.कोरोनाच्या भितीने सर्वसामान्यासह सर्वच उद्योग धंदे भितीने बंद असताना जगाचा पोशिंदा शेतकरी राजा माञ कोरोनाची तमा न बाळगता अगदी पुर्वी प्रमाणे शेती कामात व्यस्त होता.मृग नक्षञातील पावसानंतर शेतकऱ्यांनी आर्थिक संकटात असतानाही उधार उसनवारी करून आपल्या शेतात विविध पिकांच्या बियाणांची पेरणी केली.  शासनाच्या आवाहनानुसार पिक विमा योजनेचे फाँम भरून पिक विम

**आमदार अंतापुरकर पाहा ह्या रस्ताचे बेहाल**

बिलोली प्रतिनिधी - नागेश इबितवार  बिलोली तालुक्यातील मौजे. अंजनी ते बामणी  रस्त्याची अतिशय दुरवस्था झालेली असून मागील पाच वर्षा पासून अंजनी फाटा ते बामणी फाट्यापर्यंत  कंट्रक्सनचे काम चालू असुन अंजनी फाटा ते अंजनी पर्यंत डांबरी करणाचे काम झाले आहे परंतु ते काम अतिशय निकृष्ट  दर्जाचे झाले आहे।  सदरील कामाचे गुतेदार स्वत:इंजिनिअर असलेल्याने सहा महिन्यातच ते काम उखडून गिटी वर निघाली आहे याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने का पाटफिरविले आहे असा प्रश्न जनता उपस्थित करत आहे। तसेच अंजनी ते बामणी पर्यंत रोडवर पावसाळ्यात गिटी व मुरुम थातुर माथुर करून टाकण्यात आले होते परंतु ते गिटी उकळून निघाली आहे। त्यामुळे नवतरुण व तालुक्याला जाणाऱ्या प्रवाशांना काटेवरची कसरत व जीवघेणा प्रवास करावा लागत आहे अंजनी ते बामणी पर्यंत गिटी आजूबाजूला पसरल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन  करावा लागतोपोखर्णी फाटा ते बिलोली रस्त्याचे धुळीचे साम्राज्य मोठ्याप्राणावर पसरले असल्याने नागरिकांसह वाहन चालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.बिलोली तालुक्यातील पोखर्णी फाटा ते बिलोली हा ३ किलोमीटरचा अंतर असून या रस्त्याचे

वनपाल व वनरक्षक यांच्या बेजबाबदार पणामुळे होत आहे बेसुमार वृक्षांची कत्तल बिलोली प्रतिनिधी (वैभव घाटे)

  बिलोली प्रतिनिधी (वैभव घाटे)  बिलोली तालुक्यात  बेसुमार वृक्षांची कत्तल होत असून, प्रतिदिनी मोठ्या प्रमाणात कत्तल केलेल्या वृक्षांची निर्यात अनेक वाहनांद्वारे शेजारील तेलंगाना राज्यात केल्या जात आहे. सदरील प्रकरणाकडे मात्र वन विभाग हेतू परस्पर  दुर्लक्ष करीत असून वन विभागाचा एक कर्मचारी लाकडांची वाहतुक करणा-या वाहनधारकां कडून एंट्री वसूल करत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यावरून वनविभागाचा "वृक्षवल्ली आम्हा सोयरे" चा नारा कागदोपत्रीच दिसत असल्याची बाब स्पष्ट होत आहे. वन विभागा मार्फत सन १९८३ पासून तालुक्यात प्लानटेशन वेगवेगळ्या जातीच्या वृक्षाच्या रोपाची लागवड करण्यात आली. परंतु आज पर्यंत तालुक्यातील वनविभागात झाडे दिसत नाही. पण शेतक-यांच्या बांधावर हजारो झाडे दिसतात.बेसुमार वृक्ष तोडीमुळे निसर्गावर होणारा दुष्परिणाम आज देशाला भोगावा लागत आहे. एकेकाळी उन्हाळ्यात ४०% तापमान असतांना आज घाडीला ४५ % वर तापमानावर येवून ठेपले आहे. तालुक्यात बेसुमार वृक्ष तोडीमुळे वन उद्ध्वस्त होत आहेत. वन विभागाकडून एकी कडे " झाडे लावा झाडे जगवा"  असा संदेश दिला  जात असतांना मात्र तेलं

जिल्हाअध्यक्षपदी गिरीष कुरुडे

सगरोळी  प्रतिनिधी (वैभव घाटे) बिलोली तालुक्यातील बामणी (बु.) येथिल वनपरिक्षेञाचे वनरक्षक गिरीष कुरुडे यांची प्रादेशिक विभाग औरंगाबाद अंतर्गत येत असलेल्या कास्ट्राईब वनविभाग संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नांदेड येथिल वनविभाग कार्यालयात विभागीय अध्यक्ष सुमीत भुईगळ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत कुरुडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.या निवडीबद्दल वनपरिक्षेञ अधिकारी शिवानंद कोळी,मारोती मानगरवाड,बाळासाहेब कांबळे,प्रदीप चारसे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

कोल्हेबोरगाव ग्रामपंचायत सदस्यांचा राजीनामा बिलोली प्रतिनिधी (विजय सुर्यवंशी)

कोल्हेबोरगाव ग्रामपंचायत सदस्यांचा राजीनामा बिलोली प्रतिनिधी (विजय सुर्यवंशी) कोल्हेबोरगाव येथील ग्रामपंचायत सदस्य  अरविंद कांबळे यांनी  सत्तत ग्रामपंचायतीला पाठपुरावा करुण सुध्दा सन 2015 ते 2020 या काळात दलित वस्तीमध्ये एक हि विकास कामे केलेले नाहीत सरपंच व ग्रामसेवक सदास्यांना विश्वासात न घेता त्यांची मनमानी कारभार करत आसतात पंचायत राज्य व्यवस्थेमध्ये ग्रामिण भागात ग्रामपंचायत खुप महत्वाची भुमिका बजवतात पण येथिल सरपंच ग्रामसेवक यांच्या एकमुठी धोरणामुळे थेथिल जनता ञास झाली आहे शासन दलित वस्तीचा विकास कामासाठी लाखो रुपये निधी देतो  पण ग्रामसेवकांच्या भ्रष्टाचारामुळे निधीची व्हिलेवाट लावतात ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून कोलेहेबोरगाव येथिल ग्रा.पं.सदस्य अरविंद कांबळे यांनी  गटविकास अधिकाऱ्यांकडे सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहेत. सरपंच व ग्रामसेवकांकडून त्यांच्या प्रभागात कामे केली जात नसल्याने नागरिकांची नाराजी वाढत असल्याने हे राजीनामे देण्यात आले आहेत.कोल्हेबोरगाव येथील ग्रामपंचायतीची निवडणूक 2015 ला झाली असून   सरपंच व ग्रामसेवक विविध योजना राबविण्यासाठी पुढाकार घेत नसल