मुख्य सामग्रीवर वगळा

*लाच घेणा-या महिला गृहपालास रंगेहाथ पकडले

*लाच घेणा-या महिला गृहपालास रंगेहाथ पकडले* 


 *नांदेड :-  वैभव घाटे* 

मेसचे बिल मंजूर करण्यासाठी गृहपाल किशोरी अलोने यांना २० हजाराची लाच स्वीकारताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. हदगाव येथील समाज कल्याण विभागाच्या मुलीच्या वसतिगृहात त्या कार्यरत

असून याच ठिकाणी त्यांना पकडण्यात आले.
    हदगाव येथे समाज कल्याण विभागाचे मुलींचे वसतिगृह आहे. येथे ८ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थिनी राहत असून किशोरी अलोने या गृहपाल आहेत. वसतिगृहात कार्यरत असलेल्या खानावळीचे बिल काढताना विद्यार्थिनी उपस्थिती योग्य भरावी भरावी लागते. हि बाब लक्षात घेऊन अलोने यांनी मेस चालकाची अडवणूक करत विद्यार्थिनी उपस्थिती योग्य भरण्यासाठी २० हजार रुपयाची मागणी केली. यानंतर मेस चालकाने याबाबत नांदेड एसीबी कडे तक्रार केली. तक्रारीची शहानिशा करत आज सकाळी ११ वाजता नांदेड एसीबी ने शासकीय वसतिगृह परिसरात सापळा रचला. यावेळी अलोने या मेस चालकाकडून २० हजाराची लाच स्वीकारताना एसिबी च्या जाळ्यात अडकल्या.
    याप्रकरणात हदगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा सापळा पोलीस अधीक्षक संजय लाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक संजय कुलकर्णी, निरीक्षक कपिल शेळके, दयानंद सरवदे, हेड कॉन्स्टेबल नामदेव सोनकांबळे, शेख चांद, आशा गायकवाड, शेख मुजीब यांनी यशस्वी केला.

टिप्पण्या

  1. मौजे गंजगाव येथे निराधार महीलाना साड्याचे वाटप.

    निराधार महीलेना मिळाला माणुसकीचा आधार



    नांदेड प्रतिनिधी

    बिलोली तालुक्यातील मौजे गंजगाव येथे दि. 18 मार्च रोजी सकाळी ठिक 10 वाजता ग्रामपंचायतीच्या सभागृहामध्ये आमा नाना सेवाभावी चरीटेबल ट्रस्ट बोधन च्या संचालकाकडुन साडी व चोळीचे वाटप करण्यात आले आहे हे संस्था गेल्या दहा वर्षापासुन समाजातील गरिब निराधार महीलाना मदतीचा हात देत आनेक महीलान संस्थेने आधार दिला आहे . संस्थेच्या माध्यमातुन आनेक लोकभिमुख कार्य करत महाराष्ट्र तेलगांणा राज्यात आनेक कार्य चालु आहेत. संस्थेचे संचालक श्रीनिवास येलुरी यांच्या हस्ते साड्याचे वाटप करण्यात आले आहे . या कार्यक्रमाला सरपंच सौ. साविञाबाई माधवराव घाटे , ग्रा.पं. सदस्य वैभव घाटे , पो.पा. रामराव हिवराळे सोसायटी चेअरमन एम.बी. बासरे.बसवंत पाटील माधवराव घाटे ग्रामसेवक पि.डी.वाघमारे इत्यादीची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सेवक परिश्रम घेतले आहे .

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _______

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _________________________ मुंबई  - नंदु नाईक सांगलीत ऐन दिवाळीमध्ये ट्रक उलटून झालेल्या अपघातात दहा मजुरांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्तकेली जात आहे. एसटीच्या संपामुळे खाजगी वाहतुकीने प्रवास करणं मजुरांच्या जीवावर बेतल्याचं म्हटलं जात आहे. तासगांव-कवठेमहांकाळ मार्गावर योगेवाडी गावाजवळ पहाटे 2 ते 3 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. एसटी कर्मचाऱ्यांनी सकाळी संप मागे घेतला, मात्र काल एसटी बंद असल्यामुळे खाजगी ट्रक मधून कर्नाटक मधील काही मजूर कराडकडे मजुरीसाठी जात होते. योगेवाडी गावाजवळ चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक उलटला. ट्रकमधील फरशीखाली सापडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी आहेत. जखमींना मिरजेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताच्या वेळी ट्रक मध्ये 18 ते 20 प्रवासी होते. त्यामुळे ट्रकखाली आणखी काही प्रवासी अडकल्याची  भीती व्यक्त केली जात आहे.

आंदोलकांवर दाखल केलेली गुन्हे तात्काळ मागे घ्या-इंडियन पँथर् सेना..!

बिलोली प्रतिनिधी - वैभव घाटे भीमाकोरेगाव येथे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या व असावध असलेल्या भिमसैनिकांवर काही मनुवादी पिलावळीच्या लोकांकडून जीवघेणा भ्याड हल्ला झाला.यात एका भीमसैनिकाचा जागीच म्रुत्यू झाला तर हजारो लोकांना किरकोळ जखमा झाल्या.याचा निषेध म्हणून भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.बाळासाहेब आंबेडकरांनी 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली.        काही ठिकाणचा अपवाद वगळता हा बंद शांततेत झाला.तरी पोलीसांकडून अतिसंवे दनशील भागात कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले.आणि यात हजारो निष्पाप तरुण व महिलांना घरात शिरून मारण्यात आल.यात हदगाव येथील जाधव कुटुंबाने आपला 15 वर्षाचा मुलगा गमावला.सरकारच्या सांगण्यावरून पोलीस प्रशासन भीम सैनिकांच्या जीवावर बेतले असून कल्याण कोळसेवाडी येथील 48 व इतर 92 आंदोलकांवर कलम 307 हा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला.यावेळी पत्रकारांशी बोलतांना संविधान दुगाने म्हणाले की,मला पोलीस प्रशासनाने याचे उत्तर द्यावे की 2012 पासून आज पर्यंत किती बंद पाळण्यात आले?आजपर्यंत किती आंदोलकांवर गुन्हे दाखल ...
गुत्तेदार व बांधकाम विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात बिलोली तहसील समोर दुगाने चे  अमरण उपोषण सुरु. बिलोली प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड अंतर्गत चालू असलेल्या बिलोली ते देगलूर दरम्यान रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम विलास पाटील टाकळीकर यांच्या लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कडून गेल्या अनेक महिन्यांपासून चालू आहे.मात्र हे काम पूर्णपणे बोगस व निकृष्ट दर्जाचे होत आहे.याची कल्पना तीन महिन्यापूर्वी पासून उपोषणकर्ते  संविधान दुगाने यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला लेखी तक्रार देऊन रस्त्यांच्या चौकशीची मागणी केली होती.मात्र या तक्रारी अर्जाला केराची टोपली दाखवत बांधकाम विभागाने संबधित गूत्तेदाराला पाठीशी घातल्याचा आरोप दुगाणेनी केला आहे.      एकीकडे खड्डेमुक्त रस्ते  व अपघाताचे प्रमाण कमी करू पाहणाऱ्या महाराष्ट्र शासन व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना आगामी दोन वर्षासाठीे खड्डेमुक्त रस्ता हे अभियान राबवावे लागेल यात शंका नाही.कारण बिलोली- देगलूर हा राज्य महामार्ग असून हा रस्ता आंध्र,तेलंगण व कर्नाटक राज्यांना जोड़न...