चिटमोगरा येथील मातंग समाजातील पिराजी जळबा शेळके या शेतकरी तरुणाला साहेबराव जाधव पाटील यांच्याकडून जबर मारहाण, वारणेचा वाघ सामाजिक संघटनेच्या पुढाकाराने अखेर अट्रोसिटी एक्ट नुसार गुन्हा दाखल
बिलोली प्रतिनिधी
बिलोली तालुक्यातील मौजे चिटमोगरा येथील रहिवासी पिराजी शेळके या शेतकरी तरुणास शेताच्या धुऱ्याच्या भांडणावरून जबर मारहाण व जातिवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याचि धमकी दिल्याने घाबरलेल्या फीर्यादीने रामतीर्थ पोलीस स्टेशनला धाव घेऊन गुन्हा दाखल करून घेण्याची विनवणी केली. मात्र काल पासून गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ होत असल्याचे समजताच वारणेचा वाघ सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौतम भालेराव,संस्थापक सचिव संविधान दुगाने यांनी फिर्यादिचि भेट घेऊन बिलोली चे पोलीस उपाधिक्षक विशाल खांबे यांना दूरध्वनीवरून संपर्क करून घटनास्थळी उपस्थित राहाण्यास सांगितल असता मी शासकीय कामाकरीता नांदेड ला गेल्याचे सांगितले.आणि पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांना एफआयआर नोंदवून घेण्यास सांगितले..
यावेळी दैनिक सम्राटचे ता.प्रतिनिधि भास्कर भेदेकर यांनी सुद्धा सदरील पीड़ित व्यक्तिस न्याय मिळावा यासाठी सतत प्रयत्नशील राहिले आहेत.अखेर अट्रोसिटी एक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीआय दिलीप गाडे हे आरोपी साहेबराव जाधव यांना सायंकाळ पर्यंत अटक करण्याचे आश्वासन दिले आहे.
या बाबींमुळे घाबरलेल्या शेळके कुटुंबास धीर मिळाला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा