मुख्य सामग्रीवर वगळा

सलग चार वर्षापासुन बामणी बु शाळेचे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात यश



बिलोली प्रतिनिधी
गटसाधन केंद्र बिलोली यांच्या वतीने आंतरभारती माध्यमिक विद्यालय बिलोली येथे 43 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन बिलोली येथे आयोजन करण्यात आले होते
तालुक्यातील 31 शाळेनी यात सहभागी घेतला
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा आमदार श्री पटणे साहेब प्रमुख पाहुणे श्री लखमावाड साहेब(वैद्यकीय अधीक्षक बिलोली)श्री कुलकर्णी साहेब(गटशिक्षणाधिकारी  बिलोली)सौ पटणे मॅडम(मु अ)आणि परीक्षक  म्हणून श्री शेख सर, आणि सहकारी
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण म्हणजे ग्रामीण भागातून आलेले जी प प्रा शाळा बामणी बु चे विद्यार्थी सायकल वर चालणारी इको फ्रेंडली वाशिंग मशीन या प्रयोगाचे सादरीकरण  श्री बरबडे सर यांच्या मार्गदर्शनाने  भूषण दुधारे,पांडुरंग धानके, मुस्कान सय्यद, सुदर्शन बत्तुलवार,महेश्वरी बिरकुरे या विद्यार्थिनी अतिशय उकृष्ट पणे केले आणि या उपक्रमाला प्राथमिक विभागात  प्रथम क्रमांक
 तसेच लोकसंख्या शिक्षण या विषयामध्ये आपली चूक सुधारा  या विषयाचे सादरीकरण  श्री बरबडे सर यांनी केले त्यांचे पण प्रथम क्रमांक विज्ञान प्रदर्शनात निघाले,,,, जि प प्रा शाळेचे असे दुहेरी यश सर्वांच्या कौतुकाचा विषय झाला
बामणी बु येथील  जि प प्रा शाळा गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासावर भर देणारी ग्रामीण भागातील उत्तकृष्ट शाळा म्हणून नावलौकिक होत आहे कारण या शाळेचे मागच्या 4 वर्षातून प्रगती खरच वाखाणण्याजोगे आहे
सलग चार वर्षांपासून विज्ञान प्रदर्शनात शिक्षक आणि विद्यार्थी प्रयोग सादरीकरणात यश आणि तालुकास्तरीय सांस्कृतीक कार्यक्रमात  प्रथम क्रमांक ,शाळेत अनेक नाविन्य पूर्ण उपक्रम आयोजन
इ लर्निंग सुविधा,क्षेत्र भेट,पालक मेळावा,
अशा सर्व उपक्रमाचे यशस्वी रित्या  आयोजन केले जाते
शाळेचे मु अ श्री .घोनशेट्टे सर श्री गोरकवाड सर, सौ मुळावकर मॅडम,श्री बरबडे सर  सौ कांबळे मॅडम, कु बोडगमवार मॅडम  यांनी  विज्ञानप्रदर्शनाच्या यशा मध्ये सातत्य राखण्यासाठी मेहनत घेतली  श्री कुलकर्णी साहेब(गटशिक्षण अधिकारी)सौ भैरवाड मॅडम(शि वि अ) श्री वाघमारे सर(के प्र) श्री सोनकांबळे सर(के मु अ) सौ गोंड मॅडम आणि बामणी बु  गावचे सरपंच उपसरपंच, सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य व गावकरी मंडळींनी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांचे अभिनंदन केले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _______

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _________________________ मुंबई  - नंदु नाईक सांगलीत ऐन दिवाळीमध्ये ट्रक उलटून झालेल्या अपघातात दहा मजुरांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्तकेली जात आहे. एसटीच्या संपामुळे खाजगी वाहतुकीने प्रवास करणं मजुरांच्या जीवावर बेतल्याचं म्हटलं जात आहे. तासगांव-कवठेमहांकाळ मार्गावर योगेवाडी गावाजवळ पहाटे 2 ते 3 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. एसटी कर्मचाऱ्यांनी सकाळी संप मागे घेतला, मात्र काल एसटी बंद असल्यामुळे खाजगी ट्रक मधून कर्नाटक मधील काही मजूर कराडकडे मजुरीसाठी जात होते. योगेवाडी गावाजवळ चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक उलटला. ट्रकमधील फरशीखाली सापडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी आहेत. जखमींना मिरजेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताच्या वेळी ट्रक मध्ये 18 ते 20 प्रवासी होते. त्यामुळे ट्रकखाली आणखी काही प्रवासी अडकल्याची  भीती व्यक्त केली जात आहे.

आंदोलकांवर दाखल केलेली गुन्हे तात्काळ मागे घ्या-इंडियन पँथर् सेना..!

बिलोली प्रतिनिधी - वैभव घाटे भीमाकोरेगाव येथे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या व असावध असलेल्या भिमसैनिकांवर काही मनुवादी पिलावळीच्या लोकांकडून जीवघेणा भ्याड हल्ला झाला.यात एका भीमसैनिकाचा जागीच म्रुत्यू झाला तर हजारो लोकांना किरकोळ जखमा झाल्या.याचा निषेध म्हणून भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.बाळासाहेब आंबेडकरांनी 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली.        काही ठिकाणचा अपवाद वगळता हा बंद शांततेत झाला.तरी पोलीसांकडून अतिसंवे दनशील भागात कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले.आणि यात हजारो निष्पाप तरुण व महिलांना घरात शिरून मारण्यात आल.यात हदगाव येथील जाधव कुटुंबाने आपला 15 वर्षाचा मुलगा गमावला.सरकारच्या सांगण्यावरून पोलीस प्रशासन भीम सैनिकांच्या जीवावर बेतले असून कल्याण कोळसेवाडी येथील 48 व इतर 92 आंदोलकांवर कलम 307 हा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला.यावेळी पत्रकारांशी बोलतांना संविधान दुगाने म्हणाले की,मला पोलीस प्रशासनाने याचे उत्तर द्यावे की 2012 पासून आज पर्यंत किती बंद पाळण्यात आले?आजपर्यंत किती आंदोलकांवर गुन्हे दाखल ...
गुत्तेदार व बांधकाम विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात बिलोली तहसील समोर दुगाने चे  अमरण उपोषण सुरु. बिलोली प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड अंतर्गत चालू असलेल्या बिलोली ते देगलूर दरम्यान रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम विलास पाटील टाकळीकर यांच्या लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कडून गेल्या अनेक महिन्यांपासून चालू आहे.मात्र हे काम पूर्णपणे बोगस व निकृष्ट दर्जाचे होत आहे.याची कल्पना तीन महिन्यापूर्वी पासून उपोषणकर्ते  संविधान दुगाने यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला लेखी तक्रार देऊन रस्त्यांच्या चौकशीची मागणी केली होती.मात्र या तक्रारी अर्जाला केराची टोपली दाखवत बांधकाम विभागाने संबधित गूत्तेदाराला पाठीशी घातल्याचा आरोप दुगाणेनी केला आहे.      एकीकडे खड्डेमुक्त रस्ते  व अपघाताचे प्रमाण कमी करू पाहणाऱ्या महाराष्ट्र शासन व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना आगामी दोन वर्षासाठीे खड्डेमुक्त रस्ता हे अभियान राबवावे लागेल यात शंका नाही.कारण बिलोली- देगलूर हा राज्य महामार्ग असून हा रस्ता आंध्र,तेलंगण व कर्नाटक राज्यांना जोड़न...