मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जास्त नफा मिळवण्यासाठी सीताफळ प्रक्रिया करणे गरजेचे - सौ. श्रद्धा रोहित देशमुख संचालिका

जास्त नफा मिळवण्यासाठी सीताफळ प्रक्रिया करणे गरजेचे - सौ. श्रद्धा रोहित देशमुख संचालिका             विभागीय सीताफळ कार्यशाळेत सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळाचा सहभाग बिलोली प्रतिनिधी   औरंगाबाद येथील तापडिया नाट्यगृह येथे दि. ३० ऑक्टोबर २०१७ रोजी,  पहिली “विभागीय सीताफळ कार्यशाळा” महाराष्ट्र शासन व चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अग्रीकल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली. या कार्यशाळेसाठी यशस्वी प्रक्रिया महिला उद्योजक म्हणून संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी येथील उत्कर्ष अॅग्रो इंडस्ट्रीज आणि ट्रेनिंग सेन्टरच्या संचालिका सौ. श्रद्धा रोहित देशमुख यांना आमंत्रित केले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन मा. डॉ. पुरुषोत्तम भापकर, विभागीय आयुक्त, औरंगाबाद आणि श्री नवलकिशोर राम, जिल्हाधिकारी, औरंगाबाद यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी सौ. श्रद्धा रोहित देशमुख यांनी त्यांच्या उत्कर्ष अॅग्रो इंडस्ट्रीज आणि ट्रेनिंग सेन्टरची स्थापना व वाटचाल याबद्दल सविस्तर अनुभव सांगितले तसेच प्रक्रिया उद्योगातील त्यांचे अनुभव कथन केले. सध्याच्या काळात ज...
बिलोलीचे एकात्मीक बाल विकास प्रकल्प कार्यालय वा-यावर    बिलोली - वैभव घाटे        येथील एकात्मीक बाल विकास प्रकल्प कार्यालय निव्वळ शोभेचे वस्तू बनले आहे.येथे केवळ एका चतुर्थ श्रेणी कर्मचा-यावर कार्यालयाचे काम सुरू आहे.तालुक्यातील १५ हजार बालक बालिकांसाठी १८५ अंगणवाडी कर्मचारी आणि कामकाज सध्या वा-यावर आहे.एकही अधिकारी वा कार्यप्रणव कर्मचा-याशिवाय या विभागाचे कामकाज सुरू आहे.    बिलोली येथील एकात्मीक बाल विकास प्रकल्प कार्यालय निव्वळ नावालाच कार्यरत आहे.या महत्वपुर्ण कार्यालयाकडे एकाही अधिकारी वा पदाधिकारी यांचे लक्ष असल्याचे दिसून येत नाही.बालक आणि बालिका सदृढ आणि सक्षम घडविण्यासाठी भावी भारत मजबूत बनविण्यासाठी कार्यरत असलेला हा विभाग सध्या उपेक्षित आहे.     या कार्यालयाचे एकात्मीक बाल विकास प्रकल्प अधिकारी पद रिक्त आहे.हे पद एका प्रामाणिक पण आजारग्रस्त व्यक्तीला अतिरिक्तपणे देण्यात आला.धर्माबाद येथून ये - जा करणाऱ्या बजाज नामक साह्यक गट विकास अधिका-यास येथील प्रमुख पद देवून आजारग्रस्त कार्यालयाला मरणासन्न करण्यात आले आहे.   ...

महाराट्र व तेलंगाणा चे आर.टी.ओ.चे उपकेंद्र बणले हाप्ते वसुलीचे केंद्र

महाराट्र व तेलंगाणा चे आर.टी.ओ.चे उपकेंद्र बणले हाप्ते वसुलीचे केंद्र   बिलोली- वैभव घाटे           महाराट्र व तेलंगाणाच्या सिमेवर असलेले आर. टी. ओ. चे उपकेंद्र बनले हाप्ते  वसुचे केंद्र,        सगरोळी गाव हे तेलंगाणा राज्याच्या सिमेवर वसलेले गाव आहे. सगरोळी या गावावरूण बिलोली, देगलुर, बोधण. निझामाबाद अशी वहातुकीची  नेहमीच वर्दळ असते. बोधण देगलुर बसेस हे महाराट्र च्या बसेस पेक्षा तेलंगाणाचे बसेस जास्त ये जा करतात.       महाराष्ट्रतील  देशी दारू तेलंगाणात सहज व तेलंगाणातील शिंदी ही महाराट्रात सहज दोन्ही राज्या च्या आर. टी. ओ, उपकेद्रातील अधिकारी  यांणा हताशी धरूण तेलंगाणातील शिंदी महाराष्ट्रत सहज वहातुक करूण अणली जात आहे, या कडे येथील अधिकारी अर्थपुर्ण संबंधातुण दोन्ही राज्याचे आर, टी. ओ. चे अधिकारी  निक्रीय ठरत आहेत.       महाराट्रातील देशी दारूला  तेलंगाणात बोधण मंडल मधील बोधण, सालुरा, पोतंगल, मंधरणा, हुस्सा, झाडी, निळा, बडदेपुर, कादेपुर,  आदी ठिकाणी देशी दारूची ...

पत्रकार तोष्णीवाल यांच्यावर झालेल्या हल्याचा बिलोली पञकार संघाच्या वतीने निषेध

पत्रकार तोष्णीवाल यांच्यावर झालेल्या हल्याचा बिलोली पञकार संघाच्या वतीने निषेध -------------------------------------------------------------  बिलोली     हिंगोली जिल्हा मराठी पञकार संघाचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी भ्याड हल्ला केला.या घटनेचा महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघ ता.बिलोलीच्या वतीने जाहिर निषेध करून हल्लेखोरांना तत्काळ अटक करण्याच्या मागणीचे निवेदन तहसिलदार बिलोली यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्याकडे पाठवले आले.    हिंगोलीचे जेष्ठ पञकार व जिल्हा पञकार संघाचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांच्यावर दि.२३ आक्टोंबर रोजी अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक केला.हि घटना घडून ३ दिवस उलटले तरी पोलिसांना आरोपीस पकडण्यात अध्याप अश आले नाही.यामुळे तालुक्यातील पञकारांमध्ये संतापाची लाठ उसळली असून दिलेल्या निवेदनात आपल्या भावना प्रकट करून मा.मुख्यमंञी यांच्याकडे नायब तहसिलदार संजय नागमवाड यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.यावेळी पञकार संघाचे अध्यक्ष  राजेंद्र पा.शिंदे,संघाचे प्रमुख गोविंद मुंडकर,का...

प्रधानमंञी आवास योजनेमुळे गंजगावच्या नागरिकांसाठी अच्छे दिन..!

प्रधानमंञी आवास योजनेमुळे गंजगावच्या नागरिकांसाठी अच्छे दिन ..!   बिलोली प्रतिनिधी - वैभव घाटे महाराष्ट्र आणि तेंलगाणाच्या सिमेवर असलेल्या गंजगाव येथिल प्रधानमंञी आवास योजने अंतर्गत सन 2016 -17 या वर्षात येथिल कार्यक्षम व जबाबदार सरपंच मुळे या गावात 136 घरकुल मंजुर झाली असुन हे गाव या योजनेचा लाभ घेण्यात बिलोली तालुक्यात पहील्या क्रमांकावर आहे. येथिल ग्रामपंचायतीच्या सर्व कामकाजावर येथिल जनता समाधानी असुन नरेंद्र मोदीच्या या योजनेमुळेही नागरिक अनंदीत आहेत .136 पैकी 104 लाभार्थाच्या बँक खातेवर थेट अनुदान प्राप्त झाले आहे. या गावातील अनेक नागरिक निवार्या पासुन वंचित होते. परंतु येथिल सरपंच सौ. साविञाबाई माधवराव घाटे यांनी या योजनेत जातीने लक्ष घालुन शासनाला वेळोवेळी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे या गावात मोठ्या संख्येने घरकुल मंजुर झाले आहेत . येथिल जनता नरेंद्र मोदीच्या सब का साथ सबका विकास या घोषणेला साथ दिली होती. आणि आता त्यांना अच्छे दिन आल्यासारखे वाटत आहे. अनेकांचा निवार्याचा प्रश्न मिटल्यामुळे सर्व नागरिक भाजप सरकार वर  समाधानी आहेत. या योजनेच्या पाठपुराव्यात ग...

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _______

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यु. _________________________ मुंबई  - नंदु नाईक सांगलीत ऐन दिवाळीमध्ये ट्रक उलटून झालेल्या अपघातात दहा मजुरांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्तकेली जात आहे. एसटीच्या संपामुळे खाजगी वाहतुकीने प्रवास करणं मजुरांच्या जीवावर बेतल्याचं म्हटलं जात आहे. तासगांव-कवठेमहांकाळ मार्गावर योगेवाडी गावाजवळ पहाटे 2 ते 3 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. एसटी कर्मचाऱ्यांनी सकाळी संप मागे घेतला, मात्र काल एसटी बंद असल्यामुळे खाजगी ट्रक मधून कर्नाटक मधील काही मजूर कराडकडे मजुरीसाठी जात होते. योगेवाडी गावाजवळ चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक उलटला. ट्रकमधील फरशीखाली सापडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी आहेत. जखमींना मिरजेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताच्या वेळी ट्रक मध्ये 18 ते 20 प्रवासी होते. त्यामुळे ट्रकखाली आणखी काही प्रवासी अडकल्याची  भीती व्यक्त केली जात आहे.

भाजपा सरकारला वटणीवर आणण्यासाठी एस टी कामगारांचा स्मार्टसंप राजकीय खेळीतुन काँग्रेसचा पाठींबा ?

भाजपा सरकारला वटणीवर आणण्यासाठी एस टी कामगारांचा स्मार्टसंप राजकीय खेळीतुन काँग्रेसचा पाठींबा ? नायगाव प्रतिनिधी - माधव पवार राज्यातले सरकार असो की केंद्रातले सतेवर असल्याच्या नंतर फार मोठी जवाबदारी असते परंतु महाराष्ट्रातील एस टी कामगार दिनांक १६ ऑक्टोंबरच्या मध्यरात्री पासून संपावर गेल्यामुळे नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गासह अन्य ठिकाणच्या रस्त्यावर वहाणाऱ्या एस टी बसेस संपामुळे बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय झालीच परंतु लाखो रुपयाचे नुकसान सुध्दा ऐन दीपावलीच्या मुहूर्तावर झाल्याने त्यांचा फटका अखेर जनतेला बसणार असलातरी सदरच्या संपामुळे भाजपा सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी एस टी कामगाराने स्मार्ट संप पुकारला असल्याचे जनतेतुन बोलल्या जात असून सन २००४ ते २००६ या कालावधीत तत्कालीन परिवहन मंत्री तथा नांदेडचे सध्याचे खासदार अशोकराव चव्हाण हे होते त्यांच्या कार्यकाळात कसल्याच प्रकारचा स्मार्ट संप झाला नसल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष तथा उपसरपंच  घुंगराळा वसंत सुगावे. बालाजी मदेवाड सरपंच ( बरबडा ) माजी सरपंच नागनाथ हांनमते राज्य परिवहन मंडळात एकूण ३२ वर्ष से...