मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

बिलोली-देगलूर मार्गावरील लक्ष्मी कन्स्ट्रक्शन चे काम त्वरीत थांबविन्याची मागणी....! 13 नोव्हेंबर पासून बेमूदत आमरण उपोषण.. 🏻बिलोली प्रतिनिधी- वैभव घाटे

बिलोली-देगलूर मार्गावरील लक्ष्मी कन्स्ट्रक्शन चे काम त्वरीत थांबविन्याची मागणी....! 13 नोव्हेंबर पासून बेमूदत आमरण उपोषण.. 🏻बिलोली प्रतिनिधी- वैभव घाटे महाराष्ट्र कर्नाटक या दोन राज्यांना जोडणाऱ्या बिलोली देगलूर मार्गावर लक्ष्मी कन्स्ट्रक्शन अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण व पूल बांधणी चे काम 16 किमी अंतरावर बऱ्याच दिवसापासून चालू आहे.पण हे काम एकदम निकृष्ट पद्धतीचे होत असून रस्त्याच्या रुंदीकरनासाठी मुरुमाएवजी काळी मातीचा तसेच डष्टरहित गिट्टिचा वापर मोठ्याप्रमात केला जात आहे.तर पूलाच्या कामासाठी सीमेंट कोन्क्रेट ऐवजी मोठ-मोठ्या दगडांचा वापर करून वर-वरून सीमेंट चा लेप देऊन पुलाचे काम पूर्ण करत असल्याचे निदर्शनास आल्याने वारणेचा वाघ सामाजिक संघटनेच्या संविधान दुगाने यांनी दि.13/7/2017 रोजी बिलोली तहसीलदार विनोद गुंडमवार यांना लेखी तक्रार देऊन रस्त्याच्या कामांची चौकशी करण्याची  मागणी केली होती.निवेदनाची दखल घेत  तहसीलदारानी चौकशीसाठी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग नांदेड यांना पत्र पाठविले खरे पण आम्हाला पत्रच मिळाले नाही,तुम्ही देगलूर बांधकाम विभागाकडे जाऊन विचारपूस कर...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा विशेष उपक्रम - बार्टी तर्फे चितोडिया समाजातील शाळाबाह्य मुलांना शाळेत प्रवेश देऊन कृतिशील पद्धतीने विद्यार्थी दिवस साजरा ...प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा विशेष उपक्रम - बार्टी तर्फे चितोडिया समाजातील शाळाबाह्य मुलांना शाळेत प्रवेश देऊन कृतिशील पद्धतीने विद्यार्थी दिवस साजरा ...प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे  बिलोली प्रतिनिधी  डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेच्या समतादूत प्रकल्पातर्फे शासन निर्णयानुसार जि.प.हायस्कूल,लोहगाव येथे विद्यार्थी दिवस साजरा करण्यात आला. सविस्तर वृत्त असे कि राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन म्हणजे ०७ नोव्हेंबर १९०० असून या दिवशी खऱ्या अर्थाने माणसाला माणूस म्हणून जगता यावे यासाठी माणसाच्या प्रतिष्ठेकरता लढणार्या एका क्रांतीची,युगांतराची सुरुवात  झाली.याअनुषंगाने त्यांचा शाळा प्रवेश दिन हा विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात आला. याचाच एक भाग म्हणून लोहगाव परिसरात बऱ्याच वर्षांपासून चितोडिया समाज वास्तव्यास आहे पण शिक्षण प्रवाहापासून वंचित आहे असे बार्टीतर्फे समतादूत इर्शाद शेख आणि समतादूत पांडुरंग मामीडवार यांनी  केलेल्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणांती  निदर्शनास आले व या शाळाबाह...

बिलोली तहसिलचा सैराट कारभार सुरुच.

बिलोली तहसिलचा सैराट कारभार सुरुच.  बिलोली प्रतिनिधी- वैभव घाटे  गेल्या अनेक दिवसांपासून बिलोली तहसिल कार्यालयातील कर्मचारी निवासी न राहता नांदेड सारख्या शहरात राहून येजा करीत असल्याने तहसिल कार्यालयाचे अनेक कामे वेळेत होत नसल्यामुळे जनतेची कामे खोळंबत असल्याने पत्रकार  संरक्षण समिती  बिलोली च्या वतिने विभागीय अधिकारी बिलोली यांना निवेदन देण्यात आले. बिलोली तहसिल कार्यालयाचे तहसिलदार विनोद गुंडमवार हे बिलोली तहसिल येथे रुजू झाल्यापासून आजतागायत तहसील कार्यालयात नांदेड येथून ये-जा करीत आहेत. याचेच अनुकरण नायब तहसीलदार हे देखील नांदेड येथून ये-जा करित असुन मुख्यालया राहत नसूनही शासनाकडून घरभाडे उचल करीत शासनाची दिशाभूल करीत आहेत याचाच अर्थ उंटावरुन शेळ्या हाकण्यासारखा कारभार सदरील तहसील कर्मच्यार्यांचा झाला आहे. यामुळे तालुक्यातील निराधार, विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर व बिलोली तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीचा प्रसंग उद्भवल्यास याला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न तहसिलदार ये-जा करीत आसल्या कारणांमुळे अनेक कामे खोळंबत असल्याने जनतेची गैरसोय होत आहे.  बिलोली तालुक्य...

जास्त नफा मिळवण्यासाठी सीताफळ प्रक्रिया करणे गरजेचे - सौ. श्रद्धा रोहित देशमुख संचालिका

जास्त नफा मिळवण्यासाठी सीताफळ प्रक्रिया करणे गरजेचे - सौ. श्रद्धा रोहित देशमुख संचालिका             विभागीय सीताफळ कार्यशाळेत सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळाचा सहभाग बिलोली प्रतिनिधी   औरंगाबाद येथील तापडिया नाट्यगृह येथे दि. ३० ऑक्टोबर २०१७ रोजी,  पहिली “विभागीय सीताफळ कार्यशाळा” महाराष्ट्र शासन व चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अग्रीकल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली. या कार्यशाळेसाठी यशस्वी प्रक्रिया महिला उद्योजक म्हणून संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी येथील उत्कर्ष अॅग्रो इंडस्ट्रीज आणि ट्रेनिंग सेन्टरच्या संचालिका सौ. श्रद्धा रोहित देशमुख यांना आमंत्रित केले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन मा. डॉ. पुरुषोत्तम भापकर, विभागीय आयुक्त, औरंगाबाद आणि श्री नवलकिशोर राम, जिल्हाधिकारी, औरंगाबाद यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी सौ. श्रद्धा रोहित देशमुख यांनी त्यांच्या उत्कर्ष अॅग्रो इंडस्ट्रीज आणि ट्रेनिंग सेन्टरची स्थापना व वाटचाल याबद्दल सविस्तर अनुभव सांगितले तसेच प्रक्रिया उद्योगातील त्यांचे अनुभव कथन केले. सध्याच्या काळात ज...
बिलोलीचे एकात्मीक बाल विकास प्रकल्प कार्यालय वा-यावर    बिलोली - वैभव घाटे        येथील एकात्मीक बाल विकास प्रकल्प कार्यालय निव्वळ शोभेचे वस्तू बनले आहे.येथे केवळ एका चतुर्थ श्रेणी कर्मचा-यावर कार्यालयाचे काम सुरू आहे.तालुक्यातील १५ हजार बालक बालिकांसाठी १८५ अंगणवाडी कर्मचारी आणि कामकाज सध्या वा-यावर आहे.एकही अधिकारी वा कार्यप्रणव कर्मचा-याशिवाय या विभागाचे कामकाज सुरू आहे.    बिलोली येथील एकात्मीक बाल विकास प्रकल्प कार्यालय निव्वळ नावालाच कार्यरत आहे.या महत्वपुर्ण कार्यालयाकडे एकाही अधिकारी वा पदाधिकारी यांचे लक्ष असल्याचे दिसून येत नाही.बालक आणि बालिका सदृढ आणि सक्षम घडविण्यासाठी भावी भारत मजबूत बनविण्यासाठी कार्यरत असलेला हा विभाग सध्या उपेक्षित आहे.     या कार्यालयाचे एकात्मीक बाल विकास प्रकल्प अधिकारी पद रिक्त आहे.हे पद एका प्रामाणिक पण आजारग्रस्त व्यक्तीला अतिरिक्तपणे देण्यात आला.धर्माबाद येथून ये - जा करणाऱ्या बजाज नामक साह्यक गट विकास अधिका-यास येथील प्रमुख पद देवून आजारग्रस्त कार्यालयाला मरणासन्न करण्यात आले आहे.   ...

महाराट्र व तेलंगाणा चे आर.टी.ओ.चे उपकेंद्र बणले हाप्ते वसुलीचे केंद्र

महाराट्र व तेलंगाणा चे आर.टी.ओ.चे उपकेंद्र बणले हाप्ते वसुलीचे केंद्र   बिलोली- वैभव घाटे           महाराट्र व तेलंगाणाच्या सिमेवर असलेले आर. टी. ओ. चे उपकेंद्र बनले हाप्ते  वसुचे केंद्र,        सगरोळी गाव हे तेलंगाणा राज्याच्या सिमेवर वसलेले गाव आहे. सगरोळी या गावावरूण बिलोली, देगलुर, बोधण. निझामाबाद अशी वहातुकीची  नेहमीच वर्दळ असते. बोधण देगलुर बसेस हे महाराट्र च्या बसेस पेक्षा तेलंगाणाचे बसेस जास्त ये जा करतात.       महाराष्ट्रतील  देशी दारू तेलंगाणात सहज व तेलंगाणातील शिंदी ही महाराट्रात सहज दोन्ही राज्या च्या आर. टी. ओ, उपकेद्रातील अधिकारी  यांणा हताशी धरूण तेलंगाणातील शिंदी महाराष्ट्रत सहज वहातुक करूण अणली जात आहे, या कडे येथील अधिकारी अर्थपुर्ण संबंधातुण दोन्ही राज्याचे आर, टी. ओ. चे अधिकारी  निक्रीय ठरत आहेत.       महाराट्रातील देशी दारूला  तेलंगाणात बोधण मंडल मधील बोधण, सालुरा, पोतंगल, मंधरणा, हुस्सा, झाडी, निळा, बडदेपुर, कादेपुर,  आदी ठिकाणी देशी दारूची ...

पत्रकार तोष्णीवाल यांच्यावर झालेल्या हल्याचा बिलोली पञकार संघाच्या वतीने निषेध

पत्रकार तोष्णीवाल यांच्यावर झालेल्या हल्याचा बिलोली पञकार संघाच्या वतीने निषेध -------------------------------------------------------------  बिलोली     हिंगोली जिल्हा मराठी पञकार संघाचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी भ्याड हल्ला केला.या घटनेचा महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघ ता.बिलोलीच्या वतीने जाहिर निषेध करून हल्लेखोरांना तत्काळ अटक करण्याच्या मागणीचे निवेदन तहसिलदार बिलोली यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्याकडे पाठवले आले.    हिंगोलीचे जेष्ठ पञकार व जिल्हा पञकार संघाचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांच्यावर दि.२३ आक्टोंबर रोजी अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक केला.हि घटना घडून ३ दिवस उलटले तरी पोलिसांना आरोपीस पकडण्यात अध्याप अश आले नाही.यामुळे तालुक्यातील पञकारांमध्ये संतापाची लाठ उसळली असून दिलेल्या निवेदनात आपल्या भावना प्रकट करून मा.मुख्यमंञी यांच्याकडे नायब तहसिलदार संजय नागमवाड यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.यावेळी पञकार संघाचे अध्यक्ष  राजेंद्र पा.शिंदे,संघाचे प्रमुख गोविंद मुंडकर,का...